"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*15/08/24 गुरूवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15. ऑगस्ट:: गुरूवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.१०, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~दशमी,नक्षत्र ~ज्येष्ठा,
योग ~वैधृति, करण ~गर,
सूर्योदय-06:09, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━

15. *उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

15.  *हपापाचा माल गपापा –*
  ★अर्थ ::~लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15. *न मातु: परं दैवतम् ।*
         ⭐अर्थ ::~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

    🛡 ★ 15. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ *भारताचा स्वातंत्र्यदिन*
★ हा या वर्षातील २२७ वा (लीप वर्षातील २२८ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९८८ : पंतप्रधान राजीव गांधी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणानंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा‘ हे गाणे दूरदर्शनवरुन पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले.
●१९८२ : भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
●१९४७ : ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली.
●१९४७ : भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान
◆१९२९ : उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
◆१९२२ : वामनदादा कर्डक –  लोककवी
◆१८७२ : योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (मृत्यू: ५ डिसेंबर १९५० - पाँडिचेरी)
◆१७६९ : नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
●१९७५ : शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली.
●१९७४ : स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली
●१९४२ : महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

15.  *✸ ध्वजगीत ✸*
     ●●●●●००००००●●●●●
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।

सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला,

वीरों को हरषाने वाला,
मातृभूमि का तन-मन सारा।। झंडा...।

स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में,

कांपे शत्रु देखकर मन में,
मिट जाए भय संकट सारा।। झंडा...।

इस झंडे के नीचे निर्भय,
लें स्वराज्य यह अविचल निश्चय,

बोलें भारत माता की जय,
स्वतंत्रता हो ध्येय हमारा।। झंडा...।

आओ! प्यारे वीरो, आओ।
देश-धर्म पर बलि-बलि जाओ,

एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा।। झंडा...।

शान न इसकी जाने पाए,
चाहे जान भले ही जाए,

विश्व-विजय करके दिखलाएं,
तब होवे प्रण पूर्ण हमारा।। झंडा...।

विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

15. *❂ मंगल देशासाठी ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

15.     *❃❝ स्व-कृतत्व ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
     मक्याच्या शेतात एका पक्षिणीचा खोपा होता. त्यात तिची छोटी छोटी पिलेही होती. मक्याची कापणी होईपर्यंत खोपा सुरक्षित होता.

     एके दिवशी शेतकरी शेतात आला. तो कुणाशी तरी बोलताना म्हणाला की,
       ‘उद्या मी माझ्या नातेवाइकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे.’

      शेतकर्‍यांचे हे संभाषण पक्षिणीसह तिच्या पिलांनी ऐकले. पिले म्हणाली,
       लआई, लवकरात लवकर आपल्याला खोपा सोडावा लागेल.’
       आई म्हणाली, ‘काळजी करू नका. काहीही होणार नाही.’

      दुसर्‍या दिवशी कुणीही मदतीला आले नाही, तेव्हा शेतकरी म्हणाला की, आता मी माझ्या शेजार्‍यांना बोलावीन.

      तिसर्‍या दिवशीही कुणी आले नाही. चौथ्या दिवशीही असेच झाल्यावर तेव्हा शेतकरी म्हणाला,

      इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही. उद्या मी स्वत:च पिकाची कापणी करतो.’

        हे ऐकून पक्षिणीने पिलांना सांगितले,_ ‘उद्या उजाडण्यापूर्वीच आपल्याला खोपा सोडावा लागेल. कारण शेतकर्‍याला स्वत:चे काम स्वत:च करावे लागते, याची जाणीव झाली आहे.’
  
          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
      *आपल्या मदतीसाठी कोणीतरी येईल ही अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

15.  *ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेविते माथा...*

   १५ ऑगस्ट २०२३ भारतात सगळीकडे ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
   बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद...!!

माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
जय हिंद,जय भारत...
भारत माता कि जय... वंदे मातरम्...!!

   सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा ! जय हिंद ! वंदे मातरम !
नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

15. *✿ राष्ट्रीय सामान्यज्ञान ✿*
  ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
*■ भारतातील पहिला अंतराळवीर कोण?*
➡ राकेश शर्मा

*■ अवकाशयात्री पहिली महिला कोण?*
➡ कल्पना चावला

*■ पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?*
➡   ऐश्वर्या रॉय

*■ भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?*
➡   सौ.प्रतिभाताई पाटील

*■ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?*
➡   ९.७ %
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ राष्ट्रध्वज तिरंगा  ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

15. *❒ मी तिरंगा बोलतोय..!! ❒* 
     ━━•●◆●★◆★●◆●•━━
        _ *प्रिय भारतवासीयांनो*_
   🇮🇳मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.
    🔸यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला.
    🔹स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला.
    🔸माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण २:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल.
    🔹मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. जे शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे.
    🔸 माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा.
   🔹माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~15/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment