*15/10/24मंगळवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15.ऑक्टोबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.१३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा,
योग ~वृद्धि, करण ~कौलव,
सूर्योदय-06:32, सूर्यास्त-18:14
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
15. *लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
15. *नाव मोठे लक्षण खोटे –*
*★अर्थ ::~*
कीर्ती मोठी पण कृती छोटी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
15. *न मातु: परं दैवतम् ।*
⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *15. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ *_वाचन प्रेरणा दिवस_*
★ जागतिक अंध दिन
★ हा या वर्षातील २८८ वा (लीप वर्षातील २८९ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना ’बुकर पुरस्कार’ मिळाला.
●१९९३ : अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.
●१९३५ : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली.
●१८८८ : गोपाळ गणेश आगरकरांच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
◆१९३१ : *अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम –* वैज्ञानिक भारताचे ११ वे राष्ट्रपती,
◆१९२६ : नारायण गंगाराम सुर्वे– कवी
◆१५४२ : बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६१ : सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले.
●१९१७ : माता हारी – पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर
●१७८९ : रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
15. *अमुचा भारत देश महान..!*
🇮🇳🔺🇮🇳♦🇮🇳🔺🇮🇳
अमुचा भारत देश महान
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
15. *दीनबंधु तू गोपाला रे*
==••◆◆●★●◆◆••==
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना
चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
15. *❃❝आयुष्यभराची प्रतिष्ठा ❞❃*
━━•●◆●★★●◆●•═━
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले... ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
रुक्मिणीने विचारले.. कोणते पाप.?
कृष्ण म्हणाला.जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.
रुक्मिणीने विचारले... मग कर्णाचे काय.?
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला.व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!*
चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
===••◆◆●★●◆◆◆••===
15. *शिक्षणामुळे नवनिर्मिती होते,*
*नवनिर्मितीतून विचार जन्माला येतात,*
*विचारातून ज्ञानाची कवाडे उघडतात,*
*ज्ञानातून आपण अधिक परिपूर्ण होत जातो...!!*
-ए.पी.जे. अब्दुल कलाम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
15. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ ' सायकल ' चा शोध कोणी लावला ?
➜ मॅकमिलन.
✪ ' क्ष - किरण ' ट्यूब कोणी शोधून काढली ?
➜ रॅटिनजन.
✪ ह्रदयाची स्पंदने मोजण्यासाठी वापरत असलेल्या ' स्टेथोस्कोप ' चा शोध कोणी लावला ?
➜ लायनेक.
✪ शून्याचा शोध कोणत्या देशात लागला ?
➜ भारत.
✪ बोनसायची मूळ कल्पना कोणत्या देशातील आहे ?
➜ चीन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
*15.💠ए.पी.जे. अब्दुल कलाम💠*
┄─┅━▣▣▣━┅─┄
*भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक, भारताचे अकरावे राष्ट्रपती*
◆यांचा आज जन्म दिवस◆
त्यानिमित्त त्यांना
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
~: राष्ट्रपती कार्यकाळ :~
(२५ जुलै२००२ ते २५ जुलै२००७)
*🔅जन्म :~ १५ ऑक्टोबर १९३१*
🔅मृत्यू :~ २७ जुलै, २०१५*
*🚥डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम रामेश्वरम पासून राष्ट्रपती पदापर्यंत अतुलनीय प्रवासात अजात शत्रू असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्रोत आहेत त्यांचे व्यक्तित्व, राष्ट्रनिष्ठा, प्रेम आणि देशाप्रती असणारे समर्पण यामुळे ते वंदनीय ठरतात. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना प्रीत्यर्थ त्यांना शतशः प्रणाम...*
🌹🌹🌻🌹🌻🌹🌹
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे वैज्ञानिक आणि *भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक,* पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण, पद्मविभूषण (१९९०), भारतरत्न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
♦कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे लहान वयातच डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.
🔷शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले.
*माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यात _‘वाचन प्रेरणा दिवस’_ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
♦आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
🔷 भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
🔶 क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
♦ डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार~15/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment