Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15. डिसेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष पोर्णिमा, नक्षत्र ~मृगशीर्ष, 
योग ~शुभ, करण ~बव, 
सूर्योदय-07:04, सूर्यास्त-18:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
15. *स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?*
      *★ अर्थ ::~* 
- जर स्वत:जवळ एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू दुसऱ्यास कशी देणार ?  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15.     *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*
     ⭐अर्थ :: ~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
    🛡 ★ 15. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक चहा दिन
★ हा या वर्षातील ३४९ वा (लीप वर्षातील ३५० वा) दिवस आहे.       
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९८	:	बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक
●१९९१	:	चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
●१९७०	:	व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३५	:	उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
◆१९३२	:	टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
◆१९०५	:	इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ 
◆१९०३	:	स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
     
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८५	:	शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री 
●१९६६	:	वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक 
●१९५०	:	सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न 
●१७४९	:	 छत्रपती शाहू महाराज 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✹अजिंक्य भारतमाता ✹*
        ●●●●●००००००●●●●●
दिशादिशांतुन कोटि मुखांतुन निनाद एकच आता
अजिंक्य आमुची भारतमाता जय जय भारतमाता॥धृ॥
इथे जान्हवी नित्य वहाते घेउन अमृतधारा
इथे झुळझुळे मलयगिरीचा शीतल गंधित वारा
धवल हिमालय या भूमीचा जगात उन्नत माथा॥१॥
इथे जन्मले राम दाविण्या कर्तव्याचा पंथ
कृष्ण सांगती धनंजयाला अमोल गीताग्रंथ
वेदामधुनी इथे वाहती ज्ञानसुधेच्या सरिता॥२॥
बालशिवाही इथे न झुकवी अधमापुढती मान
प्रतापराणा रणराणीचा असे अम्हा अभिमान
इतिहासातुन इथे रंगते पुरुषार्थाची गाथा॥३॥ 
मानवतेची चाड अम्हांपरि दानवतेची चीड
सत्यासाठी मनी न कधिही धरु भीति वा भीड
प्राणदीप हा 4 हासत आम्ही देशाकरिता॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
 15. *❂ हे दयाघना शक्ती दे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
 विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15.  *❃❝ सिंहाचा जावई ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   आपल्या कूवतीबाहेरची एखाद्या गोष्टीची हाव धरली तर स्वत:चाच नाश ओढवतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. कोणत्याही व्यक्तीने आपणाबद्धल काय बोलावे, ही आपल्या नियत्रंणाबाहेरची बाब आहे; परंतु त्याबद्दल आपण किती विचार करायचा ही आपल्या नियंत्रणातील गोष्ट आहे...!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
 ✪  पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे ?
  ➜ मणिपूर.
 ✪  आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
  ➜ पंडित जवाहरलाल नेहरू.
 ✪  महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते ?
  ➜ पुणे.
 ✪  मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?
  ➜बाबर.
 ✪  फिरते न्यायालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
➜ महाराष्ट्र.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━ 
15. *❒ सरदार वल्लभभाई पटेल ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,    
  *भारताचे लोहपुरुष, भारतरत्न..*
   अशा या महान नेत्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
      🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ 	३१ ऑक्टोबर १८७५
(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात) 
*●मृत्यू :~ १५ डिसेंबर १९५०*
●गौरव 	:~ 'भारताचे लोहपुरूष', 'सरदार' या दोन पदव्या
● पुरस्कार :~ भारतरत्न (१९९१) 
      ◆सरदार वल्लभभाई पटेल ◆
      भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
      वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁रविवार~15/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment