"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*15/11/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *15. नोव्हेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक पौर्णिमा, नक्षत्र ~भरणी,
योग ~व्यतीपात, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:45, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

15. *"दुसर्याच्या सुख -दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

15. *चिंती परा ते येई घरा*
      *★ अर्थ ::~*
- दुसऱ्याचे वाईट व्हावे असे चिंतणाऱ्याचेच वाईट होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15. *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*
   ⭐अर्थ ::~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   🛡 ★ 15. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३१९ वा (लीप वर्षातील ३२० वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले.
●१९८९ : सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू
◆१९४८ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक
◆१९२९ : शिरीष पै – कवयित्री
◆१९१७ : दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार
◆१८८५ : गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
◆१८७५ : बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष
●१९९६ : डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
*●१९८२ : आचार्य विनोबा भावे* – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न - १९८३
●१९४९ : नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी
●१९४९ : नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
●१६३० : योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15. ✹विजयी विश्व तिरंगा प्यारा✹
        ●●●●●००००००●●●●●
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
- श्यामलाल गुप्त पार्षद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15. *❂ हे आदिमा हे अंतिमा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांच्छिले ते तू दिले
कल्पद्रुमा

या मातिचे आकाश तू
शिशिरांत या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरुषोत्तमा

देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरीं
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

15.  *❃❝ कोल्ह्याची समस्या ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       एका झाडाच्या ढोलीत काही धनगरांनी आपली भाजी  भाकरी ठेवली होती. एका भुकेलेल्या कोल्हयाने ती पाहिली आणि आत शिरून त्याने ती खाऊन टाकली पण पोट मोठं झाल्या कारणाने त्याला त्या ढोलीतून बाहेर पडता येईना. त्यांच रडणं - ओरडन ऐकून जवळून जाणारा दुसरा एक कोल्हा तेथे आला आणि काय झाल ते विचारू लागला. सगळी हकीकत समजल्यावर तो म्हणाला, "अस्स, मग आता आत जाताना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत तू आत राहा. मग तुला सहज बाहेर पडता येईल. "

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  काही कठीण समस्या केवळ काळानेच सुटू शकतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15.  मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी...
     *इतरांसाठी जगावं लागतं...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

15. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
➜ ५ जून.

✪  महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?
- ताम्हण/जारूळ

✪ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?
➜ पुणे.

✪ 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜ गोंदिया.

✪ आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?
➜ कचारगड.(गोंदिया)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

15. *❒क्रांतिसूर्य बिरसा मुंडा❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक, युवकांचे क्रांतीस्त्रोत बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...
   🙏🌷🌹🌺🌹🌷🙏
  *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
  *तेथे कर माझे जुळती ..!!*
   🙏🥀🌷🌹🌷🥀🙏

●जन्म :~ १५ नोव्‍हेंबर १८७५ 
रांची जवळील लिहतू बिहार
●मृत्यू :~ ९ जून १९००

   ◆ आदिवासी जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा ◆

    भारतीय स्‍वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्‍याला तोड नाही.
त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला.

     सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्‍वातंत्र्यलढा पुकारला.
    
    आपल्‍या २५ वर्षाच्‍या अल्‍पजीवन कालाधीमध्‍ये त्‍यांनी आदिवासींमध्‍ये स्‍वदेशी व भारतीय संस्‍कृतीच्‍या प्रतीजी प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. आजसुद्धा झारखंड, बिहार, ओरिसा, पिश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश मधील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले आदय दैवत मानतो. बिरसा मुंडा यांनी त्रिस्‍तरीय पद्धतीने समाजाच्‍या शोषणाचे मूळ, परकीय राजकीय व्‍यवस्‍थेत असल्‍याची बाब बिरसा मुंडा यांनी ओळखून त्‍याविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी आंदोलन पुकारले. आदिवासी समाजाचा आर्थिक स्‍तर उंचावण्‍यासाठी त्‍यांनी प्रचलित असलेल्‍या जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध लढा पुकारला.
     कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्‍या काळी होतीच. बिरसा मुंडेच्या विद्रोहामध्ये विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. त्‍यामुळे शिक्षण, स्वच्‍छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्‍यांनी समाज प्रबोधन केले. याचाच परिणाम म्‍हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्‍वच्‍छता यांचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला आहे. आजही दबलेल्यांना प्रेरणा देणारा आदिवासींना गुलामीतुन मुक्त करणारा महान क्रांतीकारक “बिरसा मुंडा” युवकांचे क्रांतीस्त्रोत आहेत.
बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...

     सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्‍यांना जेरीस आणले. त्‍यांनी पारंपारिक शस्‍त्रांद्वारे म्‍हणजे धनुष्‍यबाण, भाले इत्‍यादींच्‍या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्‍ये तांगा नदीच्‍या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्‍याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्‍त कुमक आल्‍यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्‍यांना रोखण्‍यात यश मिळवले. त्‍याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्‍ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्‍ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्‍याने हल्ला चढविला व त्‍या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्‍यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्‍यांची रवानगी करण्‍यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसाने जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होत. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला. बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी धेतली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शुक्रवार ~15/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment