*16/01/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16.जानेवारी:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.6, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~षष्ठी,
नक्षत्र ~उत्तराभाद्रपद,
योग ~परिघ, करण ~कौलव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:21,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
16. *आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
16. *तोंड दाबून बुक्क्यांचा मार –*
★ अर्थ ::~ विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━
16. *गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।*
⭐अर्थ ::~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *16. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील १६ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२००८ : टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण
◆१९७८ : रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
◆१६८१ : छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९४६ : कबीर बेदी – चित्रपट अभिनेते
●१९२६ : ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार
●१९२० : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९८८ : डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,
◆१९५४ : बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’
◆१९३८ : शरदचंद्र चट्टोपाध्याय – ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती.
◆१९०९ : *न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
16. *राष्ट्रीय एकात्मता*
●●●●००००००●●●●
धगधगता एकात्मते चा वारा वाहतो आहॆ.
या आपुल्या भारत भूमीच्या मातीवरती,
विविधतेने नटलेला ,हा भारतदेश असे आपुला.
हिंदू , शीख , बुद्ध, इसाई,
अन राहतात कोणी बेगडे,
भाषा असती अनेक बहुती,
असती अनेक त्यांची चाली- रीती.
कोणी लढती भारत भू च्या रक्षणासाठी आणि कोणी पर भूमीच्या बुजऱ्या लोकांसाठी,
कुठे सांडते रक्त देश सेवेसाठी अन कोणी काढी तो रक्त कोणी पर भूमीच्या स्वार्थी लोकांसाठी ,
कुठे गुलाब, पुष्प बरसते अन कुठे दगडांचे घाव लागती,
कोणी ठोकिती गोळी कुणा देश रक्षणा साठी अन कोणी ठोकिती गोळी आपुल्याच लोकांवरती,
राष्ट्रासाठी कोणी झेलतो दगडांची हि मार,
अन स्वार्थासाठी कोणी घालतो पैशाची हि माळ,
हवा आता बदल असा , राष्ट्रीय एकात्मते मध्ये ,
आपुल्या पुन्हा सूर वाहवा आपुल्या राष्ट्रीय गीतेचा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━
16. *✹ मन विजय करें ✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना..
भेदभाव, भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके,
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सकें,
झूठ से बचे रहें, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना …
मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
16. *बेडूक आणि उंदीर*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एक उंदीर आणि एक बेडुक एकमेकांचे मित्र होते. बेडूक उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहुणचार घेत असे. त्याने उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु वाटेत पाणी असल्याने 'मी येऊ शकत नाही,' असे सांगून उंदीर ते टाळीत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला व त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाले.
वाटेत बेडकाच्या मनात आलं की, उंदराला पाण्यात बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडून धडपड करू लागला. त्याचा आवाज ऐकून, आकाशातली एक घार खाली आली आणि उंदराला तोंडात धरून उंच उडाली. उंदराच्या पायाला बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले.
*_🌀तात्पर्य_ ::~*
*विश्वासघात करणार्या माणसाला प्रायश्चित्त हे मिळतेच*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
16. *हळूहळू वय निघून जातं...*
*जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं...*
*कधी कुणाची आठवण खूप सतावते...*
*कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते...*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत...*
*पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत........*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो. पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत ...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
➜ रविंद्रनाथ टागोर.
✪ विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते ?
➜ ओहम.
✪ महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात ?
➜ एकोणवीस.
✪ छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
➜ तोरणा.
✪ राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे ?
➜ सामर्थ्याचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
16. *❒ महादेव गोविंद रानडे ❒*
━━•●◆●★●◆●•═━
*न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे*
समाजसुधारक, धर्मसुधारक,
अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
अशा या महान नेत्यास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ १८ जानेवारी १८४२
*●मृत्यू :~ १६ जानेवारी १९०१*
🔷 हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.
🔶महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत.
🔷त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.
🔶काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.
⚜ सार्वजनिक कार्य
🔷ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्र्याच्या
प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याच्या कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
🔶समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना *‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’*, असेही म्हटले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁मंगळवार ~16/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment