"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*16/03/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16.मार्च:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.7, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~प्रीति, करण ~गर,
सूर्योदय-07:06, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

16. *शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

16. *चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे--*      *★ अर्थ ::~*
  - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

16.    *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
               ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★16. मार्च★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ७५ वा (लीप वर्षातील ७६ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान
●२००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर
●१९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार
◆१९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
◆१६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका
●१९९० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक
●१९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक
●१९४५ : गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣━┅━

16.  *✸ देशभक्ती ✸*
       ●●●००००००●●●
वेदमंत्राहून आम्हां वंद्य ’वंदे मातरम्‌’
वंद्य वंदे मातरम्‌

माउलीच्या मुक्‍ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ’वंदे मातरम्’

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभे शस्त्र ’वंदे मातरम्’

निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ’वंदे मातरम्‌’
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

16.  *❂ हरि ॐ प्रणव ओंकार ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हरि ॐ हरि ॐ !
प्रणव ओंकार शिवा
हृदयांत उजळू दे सूर्यदेवा
हरि ॐ हरि ॐ !

स्वरचक्र उलगडे तानांचे
हे बोल खोल मम प्राणांचे
प्रतिभेचा हुंकार नवा
हरि ॐ हरि ॐ !

तिमिरांत सभोंती गगनप्रभा
ज्योतीर्मय त्यातून दिव्य सभा
विलसू दे रुपेरी चंद्रथवा
हरि ॐ हरि ॐ !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵=●••

16. *❃ राक्षसी प्रवृत्त्ती ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एक राक्षस होता. त्‍याला आपल्‍या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्‍याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्‍याला सतत धमकावत असे. कामात त्‍याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्‍या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्‍याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्‍याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्‍याला सुस्‍ती येऊ लागली. त्‍याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्‍याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्‍या धमकीने माणूस घाबरला. त्‍याच्‍या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्‍याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्‍युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्‍याच्‍या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्‍हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्‍याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्‍हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्‍याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   रोजच्या जीवनातही बरेच राक्षस घाबरवत असतातच पण त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते. ज्या दिवशी आपल्यातील भीती सोडून आपण चालु तेव्हा ही राक्षसी प्रवुत्ती आपोआप गप्प बसते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

16. *प्रयत्न करा की कोणीही ,*
*आपल्यावर रुसू नये ..!*
*जिवलगाची सोबत कधीही ,*
*सुटू नये ...!!*

         *नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे ,*
         *असे निभवा की ..!**
         *त्या नात्याचे बंध ,*
         *आयुष्यभर तुटू नये ...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  औष्णिक वीज प्रकल्पातून कोणता वायू बाहेर पडतो ?
➜ सल्फर डाय ऑक्साईड.

  ✪ कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात येते ?
➜ सातारा.

✪  ताजमहल कोणी निर्माण केला ?
➜ मुघल शासक शहाजहान.

✪  विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?
➜ अर्थोपोडा.

✪  महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜ पुणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵=●••

16.  *❒मा.भास्कर चंदावरकर ❒* 
   ━═•●◆●★●◆●•═━━
*●जन्म :~ १६ मार्च १९३६*
●मृत्यू :~ २६ जुलै २००९

ज्येष्ठ संगीतकार मा. भास्कर चंदावरकर...

    भास्कर चंदावरकर यांनी रवी शंकर यांच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी केलं. विशेष म्हणजे प्रभा मराठेंच्या दोन नृत्य नाटिकांसाठी दोन तासांचं दिलेलं संगीत चांगलंच गाजलं. त्यांनी ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल या नाटकालाही संगीत दिलं. यानंतर एक उत्तम संगीतकार म्हणून ते प्रकाशझोतात आले. संगीतकार म्हणून घाशीराम कोतवालच्या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर त्यांचा सामना हा सिनेमा चांगलाच गाजला. सामनामधली त्यांची गाजलेली गाणी रसिक श्रोते कधीच विसरू शकणार नाहीत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे याच सिनेमातलं गाणं. भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. 'घाशिराम कोतवाल’ हे नाटक, ‘सामना’ , ‘सिंहासन’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे. मा. भास्कर चंदावरकर यांचे २६ जुलै २००९ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~16/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment