"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*16/04/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16.एप्रिल:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

🟢🔵🟣
चैत्र शु.8, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~पुष्य,
योग ~धृति, करण ~बव,
सूर्योदय-06:22, सूर्यास्त-18:56,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

16. *वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *भिंतीला कान असतात*-
   *★ अर्थ ::~* कोणतीही गोष्ट लपून राहत नाही; ती कधीतरी माहित होतेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
              ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 *★16. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ World Voice Day
★ हा या वर्षातील १०६ वा (लीप वर्षातील १०७ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी
●१९९५ : देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान
●१९४८ : राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना
●१९२२ : मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : लारा दत्ता – मॉडेल, हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती, मिस युनिव्हर्स (२०००)
◆१८८९ : चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते.
◆१८६७ : विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू,
●१९९५ : रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध
●१८५० : मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *✸ कर चले हम फिदा ✸*
       ●●●●●००००००●●●●●
कर चले हम फिदा जानो तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियों ll धृ ll

साँस थमती गई नब्ज जमती गई
फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया
कट गये सर हमारे तो कुछ गम नहीं
सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते मरते रहा बांकपन साथियों ll१ ll

जिंदा रहने के मौसम बहुत हैं मगर
जान देने की रूत रोज आती नहीं
हुस्न और इश्क दोनों को रूसवा करे
वह जवानी जो खूं में नहाती नहीं
आज धरती बनी हैं, दुल्हन साथियोंll२l

राह कुरबानियों की न वीरान हो
तुम सजाते ही रहना नए काफ़ीले
फतह का जश्न इस जश्न के बाद हैं
जिंदगी मौत से मिल रही हैं गले
बाँधलो अपने सरसे कफन साथियोंll३

खींच दो अपने खूं से जमीं पर लकीर
इस तरफ आने पाए न रावण कोई
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे
छूने पाए न सीता का दामन कोई
राम हीतुम तुम्ही लक्ष्मण साथियों ll४ l
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *❂ तनमनाच्या मंदिरी या ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❃❝ निर्णय क्षमता ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

     तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास...!!"

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   मित्रांनो, "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल..."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.  *स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्शा उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्शेशिवाय कर्तृत्व घडत नाही.*

        जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!*
      *गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?
➜ दहा वर्षांनी.

✪ भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?
➜ गुजरात.

✪  तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?
➜ दिल्ली.

✪ देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?
➜ गुजरात व महाराष्ट्र.

✪ भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?
➜ छोटा नागपूर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *❒ ♦बाळ गंगाधर खेर♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   ♦हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.

     🔶बाळासाहेब खेरांचा जन्म रत्नागिरी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण कुंदगोळ (त्या काळातील जमखंडी) येथे गेले. नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आज्ञेवरून त्यांनी आपले शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. विल्सन कॉलेज, मुंबई येथून १९०८ साली त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. तेव्हा त्यांना संस्कृतामध्ये प्रथम आल्याबद्दल 'भाऊ दाजी लाड पुरस्कार' मिळाला. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले.

     🔷मुंबईतूनच १९२२ साली त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांची हुशारी, वक्तव्य आणि विचार यांच्या जोरावर पदार्पणातच त्यांना स्वराज्य पक्षाचे सचिवपद बहाल करण्यात आले. असहकार चळवळीच्या वेळी १९३० आणि १९३२ साली त्यांनी पहिल्यांदा आठ महिने आणि त्यानंतर दोन वर्षे कारावास भोगला.

     🔶 ब्रिटिशांनी १९३५ साली कायद्यात काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काही अंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. नव्या मुंबई प्रांतात निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही ठिकाणी पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले. सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सन १९४० नंतर परत एकदा ते भातीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले.

       🔷स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आणि नंतर १९५२ सालापर्यंत ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिले. याच काळात ते शिक्षणमंत्रीही होते. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय (उदा० शालेय वर्ष जून ते मे ऐवजी एप्रिल ते मार्च करणे, शाळेत पाचवीपासून इंग्रजी न शिकवता ते आठवीपासून शिकवणे, वगैरे) त्यांना एकतर मागे घ्यावे लागले किंवा पुढच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकाने ते रद्द केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार - भारत सरकारने (इ.स. १९५४) दिला.

      🔶बाळासाहेबांना त्यांच्या साध्या आणि विनयशील स्वभावामुळे सज्जन म्हटले जात असे. त्यांच्या सज्जनपणामुळे त्यांनी महात्मा गांधींसहित काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मने जिंकली होती. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणात खुसखुशीतपणा असायचा. एरवी बोलतानाही ते मिस्कील टीका-टिप्पणी करण्यात प्रसिद्ध होते.

    🔷१९५४ साली पहिल्यांदा नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    🔶त्यांच्या शेवटच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेच ८ मार्च १९५७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार~16/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment