"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*16/06/25 सोमवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*

*💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/ZxLiVz
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16. जून:: सोमवार* 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
ज्येष्ठ कृ.५, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~वैधृति, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:00, सूर्यास्त-19:17,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

16. *सुरुवात कशी झाली यावर  बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून  असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *जशी देणावळ तशी खाणावळ*
      *★ अर्थ ::~*  आपण जसे दुसऱ्याचे उपयोगी पडतो , तसेच दूसरे आपल्या उपयोगी पडतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.   *जयतु जयतु भारती ।*
            ⭐अर्थ ::~
    भारतमातेचा विजय असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★16. जून ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६७ वा (लीप वर्षातील १६८ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
२०१३ – उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटीमुळे मोठा पूर आणि भूस्खलन झाले, ज्यात हजारो लोकांचे निधन झाले.
२०१० – भूतान हा तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा जगातील पहिला देश ठरला.
●१९९० : मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्‍चांक गाठला गेला.
●१९६३ : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.
●१९१४ : सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
●१९०३ : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
१७२३ – अ‍ॅडम स्मिथ, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि "द फादर ऑफ इकॉनॉमिक्स" म्हणून ओळखले जातात.

१९१० – सी. एम. पुनाचा, भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि उडीसा व मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल.

१९२० – हेमंत कुमार, प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि गायक.

१९५२ – मिथुन चक्रवर्ती, प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता.

१९६८ – अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक.

१९९४ – आर्या आंबेकर, मराठी गायिका आणि अभिनेत्री.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
●१९७७ : श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
●१९४४ : आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते,
●१९२५ : देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❃❝ राजा आणि महानता ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्‍याच्‍या उदारपणाच्‍या अनेक कथा त्‍याच्‍या राज्‍यापासून अन्‍य राजातही प्रसिद्ध होत्‍या. याच कारणांमुळे तो बहुसंख्‍य लोकांचे श्रद्धास्‍थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्‍वस्‍थ वाटू लागले. तेव्‍हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्‍क्षणी आपल्‍या दिवाणास निमंत्रित करून त्‍याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्‍हा माझी अंत्‍ययात्रा स्‍मशानस्‍थळी घेऊन जाल तेव्‍हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्‍ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्‍छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्‍याने विचारले, महाराज असे करण्‍यासाठी तुम्‍ही का सांगता आहात. राजा म्‍हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्‍या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे की व्‍यक्तिसोबत जे जाते ते त्‍याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  जन्मापासून मृत्य पर्यंत चांगले सत्कर्म व आचरण ठेवावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते...*
*फरक फक्त ...*
*काही जन आपल्या डोळ्यातील अश्रू मध्ये ते दुख लपवतात...*
*अन काही जन आपल्या हास्यामध्ये...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  केदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
➜ उत्तराखंड.

✪  'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?
➜ राजीव गांधी.

✪  ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?
➜ १९२९ मध्ये.

✪  नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?
➜ अरबी समुद्र.

✪  'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
➜ सोडियम हायड्राक्साइड..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❒ आचार्य प्रफुल्लचंद्र रे  ❒* 
     ━━═•●◆★◆★◆●•═━━
●जन्म :~ २ ऑगस्ट १८६१
●मृत्यू :~ १६ जून १९४४

'आचार्य प्रफुल्लचंद्र रे" हे एक प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि इतिहासकार होते.  *भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.

त्यांच्या आयुष्याची ठळक वैशिष्ट्ये:-

वैज्ञानिक योगदान:-

प्रफुल्लचंद्र रे हे "हायपो नायट्रस अॅसिड" या संयुगाच्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या रासायनिक प्रयोग आणि शोध केले.

बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स:-

त्यांनी १९०१ मध्ये ही भारतातील पहिली स्वदेशी रसायन व औषध निर्माण करणारी कंपनी स्थापन केली, जी आजही कार्यरत आहे.

लेखनकार्य:-

त्यांनी "A History of Hindu Chemistry" हे दोन खंडांचे पुस्तक लिहिले, ज्यात प्राचीन भारतातील रसायनशास्त्राचा अभ्यास आहे.

स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग:~

ते महात्मा गांधींच्या विचारांप्रती निष्ठावान होते आणि स्वदेशी चळवळीला प्रोत्साहन देत असत.


सन्मान व पुरस्कार:-
ब्रिटिश सरकारने त्यांना 'CIE' (Companion of the Indian Empire) किताबाने सन्मानित केले होते, पण त्यांनी नेहमी स्वदेशी आणि भारतीय विज्ञानाला प्राधान्य दिले.


निधन:-
   त्यांचे निधन १६ जून १९४४ रोजी झाले. आचार्य प्रफुल्लचंद्र रे हे केवळ वैज्ञानिकच नव्हते, तर ते एक महान विचारवंत, शिक्षक आणि स्वदेशी उद्योगाचे प्रणेते होते. त्यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञानाचा पाया अधिक मजबूत झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ सोमवार ~ 16/06/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment