"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*16/09/19 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃❂❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 16/09/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

      https://goo.gl/eDeLY7
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━●🇲◆🇸◆🇵●═━

 🍥 *16. सप्टेंबर:: सोमवार🍥*
 ━═•●◆❃❂❃◆●•═━
              भाद्रपद कृ. २
      तिथी : कृष्ण पक्ष द्वितिया,
              नक्षत्र : रेवती, 
      योग : व्रुद्धी, करण : गर,
सूर्योदय : 06:26, सूर्यास्त : 18:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂* 
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

16. *जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

16.    मऊ सापडले म्हणून 
     कोपराने खणू नये – 
  ★ अर्थ ::~ एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

16. *वृक्षा: सत्पुरुषा इव ।*
        ⭐अर्थ ::~
 वृक्ष हे सत्पुरुषांप्रमाणे असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

  🛡 *★ 16. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक ओझोन संरक्षण दिन
★ हा या वर्षातील २५९ वा (लीप वर्षातील २६० वा) दिवस आहे.
★ मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९९७ : संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर
◆१९९७ : आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.
◆१९३५ : इंडियन कंपनीज अ‍ॅक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.

     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : *नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर* – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
◆१९१६ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी –विख्यात शास्त्रीय गायिका
◆१९१३ : कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका 
◆१३८६ : हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९९४ : जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. 
◆१९७७ : केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका 
◆१९३२ : सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16. *✸ बहु असोत सुंदर ✸*
   ●●●●००००००●●●●
बहु असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा

शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा

विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

16.  *❃❝ जीवनात सजीवाची उपयुक्तता ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
      कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी जाळे विणणारा कीटक,  हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     *जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वतःला कमी समजू नये.प्रत्येकाचे आपआपल्या परीने कार्य व महत्त्व वेगवेगळ्या स्वरुपात महत्त्वाचे असते.* 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

16.  *“तुमच्या विचारातून तुमचे* 
   *व्यक्तिमत्व झळकत असते,* 
त्याकडे तुमचे *लक्ष* नसले तरी
       इतरांचे लक्ष असते."

  *"प्रत्येक माणसांची गोष्ट* 
       *मनावर घेऊ नका,* 
    कारण माणसे तुम्हाला 
       काय बोलतात त्यावरुन 
*त्यांची पात्रता कळते; तुमची नाही."*              
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

16. *✿ कशास काय म्हणतात ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
●पांढर्या हत्तीचा देश➜
             *थायलंड(सयाम.)*

●मँपल वृक्षाचा देश➜ *कँनडा*.

●मध्यरात्रीचा सुर्य➜ *नार्वे.*

●जगाचे साखरेचे कोठार➜ *क्युबा*

●पाचुंचे बेट➜ *श्रीलंका,आर्यलँड*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

16. *❒ ♦जयवंत दळवी♦❒*  
  ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ १४ ऑगस्ट १९२५
●मृत्यू :~ १६ सप्टेंबर, १९९४

कार्यक्षेत्र :~ साहित्य, पत्रकारिता
साहित्य प्रकार :~ कादंबरी, नाटक,
          विनोदी, संपादकीय

      *जयवंत द्वारकानाथ दळवी* 
   हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

    काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशनसर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्‍न केले.

जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका

         ●चिमण 
(नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी)
        ●डॉ.तपस्वी 
(नाट्यरूपांतर- जयवंत दळवी)
         ● प्रभूची कृपा 
(नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

     'जयवंत दळवी यांची नाटके
   प्रवृत्तिशोध' लेखकः सु.रा. चुनेकर.
'मॅजेस्टिक प्रकाशन'तर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. २०१५ साली दिलेला २०व्या वर्षाचा पुरस्कार संजय पवार यांच्या ‘ठष्ट’ या नाटकाला देण्यात आला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 16/09/2019❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment