16/10/24 बुधवारचा परिपाठ
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16.ऑक्टोबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.१४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी,
नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा,
योग ~ध्रुव, करण ~गर,
सूर्योदय-06:33, सूर्यास्त-18:14
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
16. *अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
16. *जलात राहून माशाशी वैर कशाला ?* *★ अर्थ ::~*
ज्या समाजात राहायचे त्याच्याशी शत्रुत्व करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
16. *बुद्धिर्यस्य बलं तस्य ।*
⭐अर्थ ::~ ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 16. ऑक्टोबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक अन्न दिन
★ हा या वर्षातील २८९ वा (लीप वर्षातील २९० वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स, स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.
●१९६८ : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान
●१९०५ : भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५९ : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
◆१९४८ : हेमा मालिनी – अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक
◆१९०७ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
◆१८९६ : सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक
◆१८९० : अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५१ : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या
●१९४८ : माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═━━
16. *✸ भारत अमुचा असे ✸*
●●●●००००००●●●●
भारत अमुचा असे आम्हाला प्राणाहुनही प्यार
या देशाच्या कणाकणास्तव वाहिल शोणित धार ll धृ ll
🎹 ब्रीद आमुचे जरी शांतीचे
इथे तळपती सूर्य क्रांतिचे
नसात खेळे रक्त शिवाचे
या भूमिवर दानवतेचे
बीज न कधि रुजणार ll १ ll
🎹 ईश्वर अमुचा भोळा शंकर
क्षणात होईल प्रलयंकर
कंपित होईल धरणी अंबर
हिमालयाच्या बर्फातुनही
उफाळेत अंगार ll २ ll
🎹 विश्वबंधुता इथली शिकवण
मानवता हे इथले जीवन
दुष्टांचे परि येथे मर्दन
होतिल त्यांच्या समिधा
जे जे येतिल करण्या वार ll ३ ll
🎹 इतिहासाच्या पानोपानी
इथे स्फूर्तिच्या अक्षय खाणी
दुबळी नच ही भारत जननी
अणू अणुतून इथे शक्तीचा
घडेल आविष्कार ll ४ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
16. *❂ इतनी शक्ति हमें दे न दाता*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
इतनी शक्ति हमें दे न दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...
हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है
सहमा-सहमा-सा हर आदमी है
पाप का बोझ बढ़ता ही जाये
जाने कैसे ये धरती थमी है
बोझ ममता का तू ये उठा ले
तेरी रचना का ये अन्त हो ना...
हम चले...
दूर अज्ञान के हो अन्धेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम
जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसीका किसीसे
भावना मन में बदले की हो ना...
हम चले...
हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाटें सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा को जब तू बहा दे
करदे पावन हर इक मन का कोना...
हम चले...
हम अन्धेरे में हैं रौशनी दे,
खो ना दे खुद को ही दुश्मनी से,
हम सज़ा पाये अपने किये की,
मौत भी हो तो सह ले खुशी से,
कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना...
हम चले नेक रास्ते पे हमसे,
भुलकर भी कोई भूल हो ना...
इतनी शक्ति हमें दे ना दाता,
मनका विश्वास कमज़ोर हो ना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
16. *❃❝ कष्टाचे फळ ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
16. *समजवण्यापेक्षा समजून*
*घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,*
कारण
*समजवण्यासाठी अनुभवाचा कस*
*लागतो,*
*तर समजुन घेण्यासाठी मनाचा*
*मोठेपणा लागतो..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ सिंधू संस्कृतीत कोणती पद्धती अस्तित्वात होती ?
➜ मातृसत्ताक पद्धती.
✪ पल्लव घराण्याचा संस्थापक कोण होता ?
➜ सिंहविष्णू.
✪ छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?
➜ ३७० किल्ले.
✪ बौद्ध धर्माची पहिली धर्मपरिषद महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरली होती ?
➜ राजगीर. ( राजगृह )
✪ भारतापासून ब्रम्हदेशाचा कारभार वेगळा करावा,अशी शिफारस कोणत्या कमिशन-ने केली होती ?
➜ सायमन कमिशन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
16. *❒ सर सय्यद अहमद खान ❒*
━═•●◆●★★●◆●•═━
◆ सर सय्यद अहमद खान ◆
हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.
सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
२७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~16/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment