◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *16. डिसेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~शुक्ल, करण ~कौलव,
सूर्योदय-07:04, सूर्यास्त-18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
16. *जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
16. *नव्याचे नऊ दिवस –*
★ अर्थ ::~ नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
16. *जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।*
⭐अर्थ ::~ आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 16. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
★ हा या वर्षातील ३५० वा (लीप वर्षातील ३५१ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆१९८५ : कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
◆१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
◆१९४६ : थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत(United Nations) प्रवेश
◆१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९१७ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक
●१८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
●१७७० : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
◆२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले.
◆१९६५ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
◆१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
16. *✸ हम होंगे कामयाब ✸*
●●●●००००००●●●●
होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन।
हम चलेंगे साथ-साथ
डाल हाथों में हाथ
हम चलेंगे साथ-साथ, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
हम चलेंगे साथ-साथ एक दिन।
होगी शांति चारों ओर, एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
होगी शांति चारों ओर एक दिन।
नहीं डर किसी का आज एक दिन
मन में है विश्वास, पूरा है विश्वास
नहीं डर किसी का आज एक दिन।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
16. *❂ देह मंदिर, चित्तमंदिर ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनादु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामनावेदना जाणावयाला जागवू संवेदनादुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाजीवनी नवतेज राहो अंतरंगी भावनासुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवनाशौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाभेद सारे मावळू द्या वैर सार्या वासनामानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पनामुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
16.*❃पाण्याचा पैसा पाण्यात ❃* ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका खेडेगावात एक दूधवाला राहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळविला होता. त्याच्या जवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दुध काढून ते तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिऱ्हाइकपर्यंत पोहचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे. आणि ते दुध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिऱ्हा इकाकडून पैश्याची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैश्यातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले . तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दुधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला. " रडू नकोस गिऱ्हा इकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तिच वाहून गेली आहे."
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
चांगल्या मार्गाने मिळविलेली संपत्ती टिकते. तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही..
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
16. समजवण्यापेक्षा समजून
घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी
*मनाचा मोठेपणा लागतो..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
16. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ अनुवंशिकतेची मुळतत्वे कोणी शोधून काढली ?
➜ मेंडेल.
✪ प्रकाश किरणाच्या सप्तरंगी पट्टयात कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वांत कमी आहे ?
➜ जांभळा.
✪ पेनिसीलीनचा शोध कोणी लावला ?
➜ अलेक्झांडर फ्लेमिंग.
✪ महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ?
➜ पुणे.
✪ किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोल कोण तयार करतात ?
➜ यीस्ट.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
16. *❒ ♦नानासाहेब पेशवे♦ ❒*
━━═•●◆●★●◆●•═━━
मराठा साम्राज्याचे पेशवे त्यांच्याच काळात मराठा साम्र्याज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले.
■ मराठी साम्राज्यअधिकारकाळ ■
【 इ.स.१७४० ते इ.स.१७६१ 】
_यांची जयंती निमित्त त्यांचे पवित्र_
*स्मृतीस विनम्र अभिवादन...!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
◆अधिकारारोहण :~ २५ जून १७४०
◆पूर्ण नाव :~ बाळाजी बाजीराव भट (पेशवे)
*●जन्म :~ १६ डिसेंबर, १७२१*
●मृत्यू :~ २३ जून, १७६१
◆उत्तराधिकारी :~थोरले माधवराव पेशवे
◆वडील :~ थोरले बाजीराव पेशवे
◆आई :~ काशीबाई
◆पत्नी :~ गोपिकाबाई
◆संतती :~ विश्वासराव पेशवे, माधवराव पेशवे
★ बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे ★
हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्र्याज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकत होती. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
■ कामगिरी ■
बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाले. शाहूंचा वारस रामराजा हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होते तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
■ समाधी ■
नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे.
■ पुरस्कार ■
पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि अध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म.पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~16/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment