"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*17/02/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17.फेब्रुवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.8, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी , नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~इन्द्र, करण ~बव
सूर्योदय-07:06, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

17. *दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
17. *चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे*.    *★ अर्थ ::~*
     प्रत्येकाच्या अधिकाराचे दिवस बदलतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
17.     *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*
     ⭐अर्थ :: ~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
       🛡 *17. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ४८ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.
●१९६४ : अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
●१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१८७४ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६)
●१८५४ : फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८६ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ
●१९७८ : पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी
●१८८३ : *वासुदेव बळवंत फडके*--
राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
●१८८१ : लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक
●१६०० : सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

17. *✸ एक सुराने गाऊ ✸*
●●●●००००००●●●●
हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिस्तीअन , सीख आपण भाऊ
या देशाचे भविष्य घडवू , एक जुटीने राहू ll धृ ll

काश्मीर ठेवे भाल उंच ते नंदनवन ही साजे
जलधि मधे चरण टाकुनी , कन्याकुमारी विराजे
हिमालयाची ढाल घेवूनी , फडकत ठेवे बाहु ll १ ll
या देशाचे .....

लाल , बाळ अन् पालही लढले , लढली राणी झाशी
लढले गांधी भगतसिंगही , हासत गेले फाशी
जालियनवाला बाग घातली , रक्तामधे न्हावू ll २ ll
या देशाचे .....

कलाम अब्दुल , मनमोहनजी सकलां येथे संथी
महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील , गुजराथ मधले मोदी
मंदिर मस्जिद गुरुद्वारा अन् बौद्ध विहारी जावू ll ३ ll
या देशाचे .....

ऑगस्ट पंधरा घेवून येई , स्वातंत्र्याचा उत्सव
जानेवारीची सव्वीस करते , गणराज्याचा महोत्सव
सर्व धर्म समभाव जागवू ,
एक सुराने गावू ll ४ ll
या देशाचे ...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

17. *❂ देवाजीचं नाव घ्यावं ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
रामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचा
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी

देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी

कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम दारी

फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17.     *❃ परोपकार ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात.
मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "*
*प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✪★◆▣═┅━

17. "डोळे" हे तलाव नाहीत,
             तरीपण भरून येतात.
"अहंकार" हा शरीर नाही,
            तरीपण घायाळ होतो.
"दुश्मनी " ही बीज नाही,
             तरीपण उगवली जाते.
"ओठ " हे कापड नाहीत,
            तरीपण शिवले् जातात.
"निसर्ग" हा बायको नाही,
             तरीपण कधीतरी रुसतो.
"बुध्दी" ही लोखंड नाही,
          तरीपण तिला गंज लागतो.
"माणूस" हा वातावरण नाही,
         तरीपण तो बदलला जातो...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  डोगरा रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
➜ कर्तव्य अन्वात्मा.

✪  भारतातील सर्वांत मोठे सरोवर कोणते आहे ?
➜ वुलर सरोवर.

✪  केंद्रीय ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ लखनऊ.( उत्तरप्रदेश )

✪  रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
➜ स्वामी विवेकानंद.

✪  शहीद-ए-आलम हे प्रचलित नाव कोणाचे आहे ?
➜ भगतसिंग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17.  *❒ वासुदेव बळवंत फडके ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक, क्रांतिकारकांचे मेरुमणी
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🌷🌹🌺🌹🌷🙏

●जन्म :~ ४ नोव्हेंबर १८४५
शिरढोण, पनवेल तालुका, रायगड
*●मृत्यू :~ १७ फेब्रुवारी १८८३*
               एडन, येमेन
◆चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
◆प्रभाव :~ महादेव गोविंद रानडे,
   क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे

          ◆वासुदेव बळवंत फडके◆
    हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
       रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.

            *क्रांतीचा पाया*
   आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.

           ◆ सशस्त्र क्रांती ◆
   यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही. असे सांगून त्यांना निराश केले

    फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.

     ◆ धरपकड, खटला व मृत्यू ◆
   २० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.

   तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शनिवार ~17/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment