"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*17/03/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17. मार्च:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.8, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~मृगशीर्ष,
योग ~आयुष्मान्, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:06, सूर्यास्त-18:38,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

17. *दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17. *आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे –* 
               ★ अर्थ ::~
   अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

17.    त्वमेव माता च पिता त्वमेव
          त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
   त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
   त्वमेव सर्वं मम देव देव ॥
    *⭐अर्थ :: ~* हे परमेश्वरा, तूच माझी आई, तूच माझा पिता, माझा भाऊ, तूच माझा मित्र, तूच विद्या, धन आणि तूच माझे सर्वस्व आहेस.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★17. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७६ वा (लीप वर्षातील ७७ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ
●१९६९ : गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
●१९५८ : ’व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : शर्मन जोशी – अभिनेता
◆१९२७ : ’विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र
◆१९२० : शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष
◆१९०९ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५७ : रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
●१९३७ : ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत.
●१९१० : अनुताई वाघ – समाजसेविका
●१८८२ : विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ’केसरी’चे एक संस्थापक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *✸ आम्ही चालवू हा पुढे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *❂ ⚜ऐ मालिक तेरे बंदे⚜ ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऐ मालिक तेरे बंदे , ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले और बधी से टले
ताकी हँसते हुए निकले दम ll धृ ll

ये अँधेरा घना छा रहा , तेरा इंसान घबरा रहा हैं
हो रहा बेखबर कुछ न आता नजर
सुख का सुरज छिपा जा रहा
हैं तेरी रोशनी मैं वो दम
जो अमावस को कर दे पूनम ll १ ll

जब जुल्मों का हो सामना , तब तू ही हमें थामना
वो बुराई करे , हम भलाई करे
नही बदलेकी हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे गैर का ये भरम ll २ ll

बड़ा कमजोर हैं आदमी , अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा हैं दयालु बड़ा
तेरी कृपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेले हमारे ये गम ll ३ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17.       *❃ महत्व ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एका आश्रमात एक महात्मा राहत होते. सोबत त्यांचे काही शिष्यपण होते. काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा सुरु होती. महात्मा त्या सर्वांचे विचार ऐकत होते आणि आणि आपले विचारही व्यक्त करत होते. या दरम्यान महात्म्याच्या नजरेस काही तरी पडले व ते त्या दिशेने जावू लागले. त्यांनी ती पडलेली वस्तू उचलून घेण्यास एका शिष्याला सांगितले. दुपारी जेंव्हा महात्मा आपल्या कुटीत परत आले तेंव्हा त्यांनी त्या शिष्याला बोलावले व सकाळी उचलून घेतलेल्या कापसाबद्दल त्याला विचारले असता तो शिष्य म्हणाला,"तुम्ही सांगितलेला कापूस मी उचलला खरा पण काही काळाने मी कचरा समजून तो फेकून दिला. आता तो कचराकुंडीत असेल. " *महात्मा म्हणाले,"अरे ! मी या कापसाऐवजी तुला धन किंवा सोने दिले असते तर असेच कचराकुंडीत टाकले असते का*? तो कापूस बाहेर उघड्यावर पडला याचा अर्थ कापूस जिथे ठेवला आहे तेथुन कापूस बाहेर वाऱ्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने बाहेर कसा पडला? शेतकऱ्याने इतक्या कष्टाने तयार केलेल्या कोणत्याही गोष्टी अशा जर थोड्या थोड्याने जर वाया जावू लागल्या तर आपल्या बरोबर समाजाचेहि नुकसान यातून होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फेकून द्यायला लागलो तर त्यातून आपलाच तोटा आहे. कापसाचा तुकडा असेना का पण ज्याने तो कातून ठेवायच्या ऐवजी बाहेर टाकला त्याने कापसाचा तुकडा नाही तर भविष्यात निर्माण होणारे धन फेकून दिले आहे. *लक्षात ठेव ! कष्टाने धन मिळते, पण मिळालेल्या धनाचा योग्य वापर करणे, गुंतवणे हेही तितकेच महत्वाचे आहे."*

         *_🌀तात्पर्य_ ::~*
  धन हे जरी उपभोगासाठी असले तरी ते चुकीच्या मार्गाने व्यर्थ रीतीने खर्चलं जावू नये. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वपूर्ण असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग 'जागा' कोणती ?*
         *तो म्हणाला जी आपण*
       *दुसर्याच्या 'मनात' निर्माण करतो ती महाग जागा......*

  *तिचा भाव करता येऊ शकत नाही.*
*अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळ जवळ अशक्यच असतं....!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?
  ➜ खोपोली.

◆ महाराष्ट्राला लागून किती राज्याच्या सीमा आहे ?
  ➜ सहा.

◆ महाराष्ट्रात तांबे सर्वांत जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडते ?
  ➜ चंद्रपूर.

◆ भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ?
  ➜ प्रवरानगर.

◆ महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
  ➜ नागपूर.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

17. *❒ विष्णुशास्त्री चिपळूणकर ❒*
          ┄─┅•●●★◆★●●•┅─
●जन्म :~ २० मे १८५०
             पुणे, महाराष्ट्र
*●मृत्यू :~ १७ मार्च १८८२*
★कार्यक्षेत्र :~ साहित्य, पत्रकारिता,
          शिक्षण, राजकारण
★चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
★प्रसिद्ध साहित्यकृती :~ निबंधमाला

        *💧विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर*
    🔹हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.

   🔸  विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स.१८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.

     🔹महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी १८७२ ते १८७७ सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ते १८७९ सालांदरम्यान रत्‍नागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले.

     🔸१८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्य जनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. १८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून, १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली.

◆ चिपळूणकरांनी खालील संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला :~
1) चित्रशाळा, पुणे
2) किताबखाना, पुणे
3) आर्यभूषण छापखाना
4) न्यू इंग्लिश स्कूल
5) फर्ग्युसन महाविद्यालय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~17/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment