*17/06/25 मंगळवार चा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*महाराष्ट्र शिक्षक परिवार*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
 *💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    ♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
    🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*
 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
  🔗🔗👇👇🔗🔗
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17. जून:: मंगळवार* 🍥
 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
ज्येष्ठ कृ.६, पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~शतभिषा, 
योग ~विष्कम्भ, करण ~वणिज, 
सूर्योदय-06:00, सूर्यास्त-19:17,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
17. *सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17. *थेंब थेंब तळे साचे*
      *★ अर्थ ::~* 
-थोड्या बचतीमधून मोठा संचय होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17.    *सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।*
⭐अर्थ ::~ दुसर्यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
     🛡 *★17. जून ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६८ वा (लीप वर्षातील १६९ वा) दिवस आहे.
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९१	:	भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
●१९६७	:	चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
●१९६३	:	 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८१	:	शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९७३	:	लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू
◆१९०३	:	बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक
◆१२३९	:	एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा 
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६	:	मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक 
●१९८३	:	शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक 
●१९२८	:	पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक 
●१८९५	:	गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक
●१६७४	:	राजमाता जिजाबाई (जन्म: १२ जानेवारी १५९८)
●१२९७	:	संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली (जन्म: २९ जानेवारी १२७४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17.  *❃ ससाणा आणि कोकीळ ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━  
     एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता त्याला एक कोकीळ सापडला. तो कोकीळ त्याला म्हणाला, 'भाऊ, मला सोड, मी इतका लहान आहे की मला खाल्ल्याने तुझं पोट नक्कीच भरणार नाही, मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल.' ससाणा म्हणाला, 'तू कितीही लहान असलास तरी माझ्यासारख्या भुकलेल्या प्राण्याला तुझ्या मासाचा बराच उपयोग होईल. शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन, मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्याइतका मी नक्कीच मूर्ख नाही.'
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. भलेही स्वतःची प्रगती
    कमी झाली तरी चालेल
    पण माझ्यामुळे कोणाचे  
    नुकसान व्हायला नको,
            ही भावना
     ज्या माणसाजवळ असते  
तोच माणूस योग्य अशा
      प्रगतीच्या वाटेवर असतो..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ *वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन कोणते?*
➜ वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन अॅनीमोमीटर आहे.
■ *उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या मध्ये कुठला कालवा आहे?*
➜ उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या मध्ये पनामा हा कालवा आहे.
■ *अमेरिकेत मोटारीचे कारखाने असलेले शहर कोणते?*
➜ अमेरिकेत मोटारीचे कारखाने असलेले शहर डेट्रॅाइट आहे.
■ *अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून कुठला प्रवाह वाहतो?*
➜ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्रेडोर प्रवाह वाहतो.
■ *पश्चिम जर्मनी या देशाची राजधानी कोणती?*
    ➜ पश्चिम जर्मनी या देशाची राजधानी बॉन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
17. *❒ राजमाता जिजाऊ ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव :~	जिजाबाई शहाजीराजे भोसले
●जन्म :~ १२ जानेवारी १५९८, सिंदखेडराजा,बुलढाणा.
●मृत्यू :~ १७ 	जून १६७४,
पाचाड, रायगडचा पायथा
●वडील :~	लखुजीराव जाधव
●आई	:~ म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
●पती	:~ शहाजीराजे भोसले
   ◆ जिजाबाई शहाजी भोसले◆
    सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई.  जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
  ◆भोसले व जाधवांचे वैर	◆
      पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. 
     दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. 
हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.
हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. 
     या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. 
नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
          ◆ जिजाबाईंची अपत्ये	◆
    जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. 
त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. 
१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
◆ राजांचे संगोपन आणि कुशल कारभार ◆
    शिवाजी १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. 
कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.  
       निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत  नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. 
शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले .
शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
     राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. 
या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. 
एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
    शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धाप
काळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
   जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁ मंगळवार ~ 17/06/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment