"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*17/08/24 शनिवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17. ऑगस्ट:: शनिवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण शु.१२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~प्रीति, करण ~बालव,
सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

17. *शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17. *रात्र थोडी सोंगे फार –*
  ★ अर्थ ::~ काम भरपूर, वेळ कमी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *विद्या राजसु पूज्यते ।*
            ⭐अर्थ ::~
विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 ★ 17. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २२९ वा (लीप वर्षातील २३० वा) दिवस आहे.

         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९७ : उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर
●१९८२ : पहिली सी. डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.
●१९५३ : नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
●१८३६ : जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा 'रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट' ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला.
●१६६६ : आग्र्याहून सुटका – शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतुन पसार झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४९ : निनाद बेडेकर – इतिहास संशोधक
◆१९३२ : व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक
◆१९१६ : डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक
◆१८८८ : गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (१९१८), पुण्याचे महापौर (१९६२)
◆१७६१ : पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८८ : मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
●१९०९ : भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●●००००००●●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *❂ अमुचे जग गाइल जयगान *
          ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17.  *❃❝ विश्वासाला तडा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते.

       शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला.

         शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला.

       दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला.

       शाम रामला म्‍हणाला, ’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’

       रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला.

       दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’

       यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’

         मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे.

          *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17.  *'कष्ट'* आणि *'मेहनत'*
ऐवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या
*'यशाचाच'* घुमला पाहिजे..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
◆ ' सेमीनरी हिल्स ' हे वनोद्यान कोणत्या जिंल्ह्यात आहे ?
  ➜नागपूर.

◆ मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता ?
  ➜निजाम.

◆ वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ठाणे.

◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
  ➜प्रीतिसंगम.

◆ 'वाॅटर अँन्ड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ' कोठे आहे ?
  ➜औरंगाबाद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

17. *❒ ♦मदनलाल धिंग्रा♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १८८७.. 
●स्मृतिदिन :~ १७ ऑगष्ट १९०९

     “माझा असा विश्वास आहे कि, परकीय संगिनिच्या सहाय्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच राष्ट्र असते. नि:शस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे हे अश्यक्य होत असल्यामुळे धिंग्राने दबा धरून हल्ला चढविला. त्याला बंदुक मिळू शकली नाही. म्हणून मदनलालने पिस्तुल बाहेर काढले आणि ते झाडले.!” असे नि:संदिग्ध वक्तव्य फाशी पूर्वी करणारे मदनलाल धिंग्रा हे थोर क्रांतिकारक होते. भारतमातेविषयी जाज्ज्वल्य निष्ठा बाळगणार्या या वीराचा जन्म पंजाब मध्ये १८८७ साली झाला. त्यांचे वडील अमृतसर मध्ये सिव्हिल सर्जन होते. त्यांचे घराणे अत्यंत सुखवस्तू होते. मदनलाल २१ वर्ष्याचे असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांना पुत्ररत्न हि झाले.पण त्यांचे संसारात मन रमेना, क्रांती काळातील अनेक घटना त्याच्या मनास बेचैन करीत होत्या. अखेर१९०६ साली त्यांनी इंग्लंड गाठले त्याठिकाणी ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ मद्ये स्थापत शास्त्राचा विद्यार्थी म्हणून तीन वर्षे त्यांनी नाव कमाविले.

     इंग्लंड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासात मदनलाल आले. सावरकरांच्या क्रांती विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले. भारतमातेला बंधमुक्त करण्याच्या विषयावर ते अनेकदा सावरकरांशी गप्पा मारीत असत. अश्याच गप्पांच्या वेळी जपानी लोकांच्या शौर्याचे अनेकदा कौतुक होताना आणि हिंदुस्थानी वीरांचा तिरस्काराने उल्लेख होताना पाहून मदनलाल भडकले. ते म्हणाले, “त्यात विशेष काहीच नाही.! माझे हिंदू राष्ट्र हि तितकेच शूर आणि साहसी आहे.लवकरच आमच्या कीर्तीचे पोवाडे पण तुम्ही गाऊ लागाल, ” यावर प्रतिस्पर्ध्याने हा पोकळ डौल आहे असे म्हटले, मदनलालने त्वरित त्याला प्रचीती पाहण्याचे आव्हान केले. त्यांनी एक टोकदार टाचणी घेतली. आपल्या हाताच्या तळव्यावर खुपसून ती दुसर्या बाजूने बाहेर काढून दाखविली. हात रक्त बंबाल झाला……..पण त्यांनी हुं कि चूं  केले नाही !

      एकदा इंडिया मध्ये रासायनिक प्रात्यक्षिक चालले होते. भांड्यात रसायन उकळत होते. क्षणाधार्त ते भांडे खाली उतरविणे आवश्यक होते. अन्यथा स्पोटाची शक्यता होती. सावरकर मदनलालकडे पाहात होते.त्यांनी अडचण सांगताच मदनलालने निर्धाराने ते भांडे खाली उतरविले. रसरसीत लाल झालेल्या त्या भांड्याने धिंग्राच्या हाताचे चामडे सोलून निधाले………सावरकर या महान तरुणाकडे, व त्याच्या साहसाकडे पाहातच राहिले. साहस हा धिंग्राचा अंगभूत गुण होता.  २५ जानेवारी १९०९ त्यांना रिव्हाल्व्हरची परवानगी मिळाली. त्यांनी एका माणसा कडून तीन पाउंड पाच शिलिंगला एक स्वयंचलित रिव्हाल्व्ह्र विकत घेतली. नेमबाजीचा सराव केला. हिंदुस्थानातील जनतेवर ब्रीटीशांकडून होणार्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून तर ते जास्तच आसुसले होते. कर्झन वायली या ब्रिटीश अधिकार्या कडे त्यांचे लक्ष होते. कारण भारत आणि इंग्लंड मध्ये असणार्या क्रांतिकारका वरील त्यांची दडपशाही दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांचा धिंग्रांना काटा काढायचा होता.

     अखेर तो दिवस उजाडला १जुलै १९०९ हा तो दिवस होता. न्याशनल इंडियन असोशीएशनच्या मेळाव्यात लंडन मुक्कामी असलेल्या धिंग्रांनी कर्झन वायली वर ग्लीबार केला. वायली यमसदनाला गेला. पण वायलीचा कळवला बाळगणारे मुळचे मुंबईचे असलेले डॉ. कावसलाल काका हे आडवे झाले. धिंगराने एक गोळी त्यांच्या वरही चालविली. आणि भारतमातेच्या या शत्रूचा पण नायनाट केला. त्या वेळी रात्रीचे ११ वाजून १० मिनिटे झाली होती.

     या खळबळजनक प्रकारा नंतर धिंग्रांणा अटक झाली. त्यांना वाल्टन स्ट्रीट पोलिस ठाण्यावर नेण्यात आले. २ जुलैला हि बातमी सर्वत्र पसरली. आणि हिंदुस्थान हा तेजस्वी क्रांतीकारींचा देश आहे, हे सिद्ध झाले. पण धिंग्रांना फाशीची शिक्ष्या द्यायचे हि याच वेळी ठरले. कारागृहात त्यांना भेटायला अनेक लोक उत्सुक होते. कधी क्रांती- कारकांना संधी मिळायची, कधी नाही, एकदा ग्यानचद्र वर्मा धिंग्रानां भेटायला गेले होते . तेव्हा ते म्हणाले , “मदनलाल , मी तुझ्यासाठी काय करू ? ”
“आता काही दिवसात फासी होणारच आहे, भारतमातेचा चरणी प्राण अर्पण करतांना कसे नीटनेटके जायला हवे नाही ! पण चांगला पोशाख करण्यासाठी इथे अरे साधा आरसाही नाही. एक छानदार आरसा दे ना पाठवून !”

    हे ऐकून ग्यानचद्र वर्मा शहारलेच. मृत्यूचे अक्राळ विक्राळ रूप समोर उभे असतांनाही किती अविचल आहे हा! १७ ऑगस्ट १९०९ रोजी तो दुर्दैवी दिवस उजाडला . लंडनच्या पेटनव्हील तुरुंगात मदनलालला फासी . आली  या बातमीने स्वातंत्र आंदोलनाने पुन्हा पेट घेतला. अनेक ब्रिटीश अधिकारी त्यात मृत्युमुखी पडले. धिंग्राच्या बलिदानाचे फलक सर्वत्र लागले आणि ह्जार्रो तरूण मुले या क्रांतिकुंडात  समिधा बनायला सिद्ध झाली.

    आपल्या मृत्यूनंतर हिंदूपद्धतीने आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी धिंग्रांची इच्छा होती . पण क्रूर ब्रिटिशांनी त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ६७ वर्षांनी त्यांची शवपेटी विमानाने हिंदुस्तानात आणली. २५ डिसेंबर १९७६ला लाखो लोकांच्या उपस्तीतीत हरिद्वार येथे त्यांच्या अस्थिचे विसर्जन करण्यात आले.

     कोणतीही राष्ट्रे जिवंत राहतात, ती अशा बलिदान करणार्याच्या अखंड स्मृतीनेच होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शनिवार ~17/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment