17/10/24 गुरूवारचा परिपाठ
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *17.ऑक्टोबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन पोर्णिमा, नक्षत्र ~रेवती,
योग ~हर्षण , करण ~विष्टि,
सूर्योदय-06:33, सूर्यास्त-18:13
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
🔵🟢🔴
17. *द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
17. *आजा मेला नातू झाला*
★ अर्थ ::~ एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
17. *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
⭐अर्थ :: ~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *17. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक गरिबी निर्मूलन दिन
★ हा या वर्षातील २९० वा (लीप वर्षातील २९१ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान
●१९९६ : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
●१९७९ : मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : स्मिता पाटील – अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड
◆१९४७ : सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका
◆१९१७ : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार,
◆१८९२ : नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार,
◆१८१७ : सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक
●१९९३ : विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक,
●१९०६ : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली
*●१८८२ : दादोबा पांडुरंग तर्खडकर* – इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
17. *★स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला*
═════════
स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
===••◆◆●★●◆◆◆••===
17. *★दिवा पाहुनि लक्ष्मी येते*
━━━━━━━━━━
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करु तिची प्रार्थना, करु तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो,
शुभंकरोति म्हणा ॥
शुंभकरोति कल्याणम्,
शुभंकरोति कल्याणम् ॥१॥
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसती पाऊलखुणा –
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, … ॥२॥
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना –
शुभंकरोति म्हणा, मुलांनो,….॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
17. 💧 *निर्मळता* 💧
•◆•◆•◆★◆•◆•◆•
*एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले.* जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरुसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरुकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरुसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."
*🌀तात्पर्य ::~*
*भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत विचाराने निर्णय घ्यावे*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
17. *घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*
*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो..*
*म्हणून शिवतंत्र सांगते...*
*जोडता नाही आले तर जोडू नका*
*पण आपल्या लोकांना तोडू नका..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
17. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ रूपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
➜ शेरशहा सुरी.
✪ नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜ दिल्ली.
✪ सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचे आधारवर्ष कोणते आहे ?
➜ सन २०११- २०१२.
✪ औद्योगिकीकरणाबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
➜ दुसरा.
✪ आयात-निर्यात बॅंकेचे मुख्य कार्य कोणते ?
➜ आयात-निर्यात व्यापाराला कर्जपुरवठा करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
17.*❒सर सय्यद अहमद खान❒* ━═•●◆●★◆★●◆●•━━
●जन्म :~ १७ ऑक्टोबर १८१७
●मृत्यू :~ २७ मार्च १८९८
◆ सर सय्यद अहमद खान ◆
हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.
सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
२७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁गुरूवार~17/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment