*18/01/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. जानेवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.8, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~अश्विनी,
योग ~सिद्ध, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:22,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
18. *प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
18. *बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर*
★ अर्थ ::~
दोनपैकी एक पर्याय निवडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
18. *सहसा विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम्*
⭐अर्थ ::~
कोणतीही गोष्ट सारासार विचार न करता एकाएकी करू नये. अविवेक हा मोठ्या संकटांना कारणीभूत होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *★18. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील १८ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
●१९९९ : नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
●१९९७ : नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
●१९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
◆१९५२ : वीरप्पन – चंदन तस्कर
◆१८८९ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार
◆१८८९ : देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत
◆१८४२ : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१५ : *शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’* – चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.
●२००३ : हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी
●१९९६ : एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] 🔰 देशभक्ती गीत 🔰*
====••◆◆●★●◆◆••====
18. ✹विजयी विश्व तिरंगा प्यारा✹
●●●●००००००●●●●
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
- श्यामलाल गुप्त पार्षद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆••====
18. *✹ सिद्धगणेशा ✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
विनायका हो सिद्धगणेशा
रंगसभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरट्यामधुनी
आशीर्वच हो द्या तुम्ही द्या
नृत्यविशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशू तोमर
नाद कटीला बांधुनि या
अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या
आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभु गुण ग्राहक
प्रसाद हाती घेऊनि या
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
18. *❃❝ व्यवहारज्ञानाचे धडे ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे. त्यांची ख्याती एका धान्याच्या व्यापा-यानेही ऐकली होती. तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास आला. प्रवचन सुरु झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते. काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले,’’या जगात जितके प्राणी आहेत. त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो.’’ ही गोष्ट व्यापा-याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली. त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला. दुस-या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले. ते स्वत: दुस-या कामासाठी बाहेर निघून गेले. त्यानंतर काही वेळाने तेथे एक गाय आली. दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली. मुलाने त्या गायीला हाकलण्यासाठी लाकूड उचलले पण त्याच्या मनात विचार आला. गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे.मग भेदभाव का मानायचा? ती धान्य खात असेल तर खाऊ दे. तेवढयात व्यापारी तेथे आले त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले,’’ अरे तुझ्यासमोर ती गाय धान्य खाते आहे? आणि तू आंधळा झाल्यासारखा गप्प बसून का आहेस? आपले किती नुकसान होते आहे याची काही कल्पना आहे की नाही? तिला हाकलून का दिले नाहीस?’’ मुलगा म्हणाला,’’ बाबा, काल तर महाराज म्हणाले की, सगळे जीव एकसारखे आहेत, मी गायीमध्ये पण एक जीव पाहिला’’ तेव्हा व्यापारी म्हणाले,’’मूर्खा, अध्यात्म आणि व्यापार यात गल्लत एकसारखे करायची नसते.’’
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
सारासार बुद्धीचा वापर करून जीवन जगल्यास जीवन सुखदायी होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
18. "नशिबात असेल तर
मिळेल असे म्हणत राहू नका ...✍🏻
आयुष्यात नशिबाचा भाग हा ०% आणि परिश्रमाचा भाग १००% असतो.
*"नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहात आहे "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====
18. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
*■. विश्व मृदा दिवसकेव्हा साजरा केला जातो?*
➜ *5 डिसेंबर*
*■. भारतातील सर्वाच्च वीरता पुरस्कार ...?*
➜ *परमवीर चक्र*
*■. महात्मा गांधीजीचे राजनैतिक गुरू कोन होते?*
➜ *गोपाळकृष्ण गोखले*
*■. महात्मा गांधीजीनी दांडी यात्रा कधी केली ?*
➜ *1930*
*■ अकबर नामा चे रचनाकार ?*
➜ *अबुल फजल*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶व्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
18. *❒ शकुंतला महाजन ❒*
━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ १७ नोव्हेंबर१९३२
*●मृत्यू :~ १८ जानेवारी २०१५,* कोल्हापूर
◆शकुंतला महाजन
तथा ’बेबी शकुंतला’ ◆
लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. प्रभात फिल्म कंपनीचा 'दहा वाजता' (१९४२) हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे 'प्रभात'च्या 'रामशास्त्री प्रभुणे' सिनेमातील त्यांची भूमिका गाजली. बालकलाकार म्हणून अभिनयात ठसा उमटविलेल्या शकुंतला यांनी पुढील काळात हिंदी आणि मराठीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केले. भूमिका गाजवल्या. परदेस, कमल के फूल, शिकायत, भाग्यवान, बिंदिया, बचपन, बच्चों का खेल, मोती, पूजा, नन्हे मुन्हे, सपना अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांची कारकीर्द बहरली. १९५० मध्ये 'परदेस' हा सिनेमा लागला. मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही हा सिनेमा गाजला. हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या 'बिराज बहू' सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. गायक-कलाकार किशोरकुमार यांच्यासोबत फरेब, लहेरे या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी, सीता स्वयंवर, मोठी माणसं, श्रीकृष्ण दर्शन, मी दारू सोडली, अखेर जमलं, चिमणी पाखरे, मूठभर चणे, मालती माधव, संत बहिणाबाई, तोतयाचे बंड, तारामती या मराठी सिनेमातील भूमिका प्रामुख्याने गाजल्या.
सिनेकारकीर्द बहरात असताना १९५४ मध्ये त्यांचा गडहिंग्लज येथील इनामदार घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सिनेमात काम करायचे बंद करून संसाराला वाहून घेतले. राज्य सरकाने त्यांना १९९६ मध्ये विशेष सन्मान केला होता. कोल्हापूर भूषण, करवीरभूषण, कलाभूषण, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले.
प्रभात फिल्म कंपनीत बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर चमकलेल्या शकुंतला यांनी सहजसुंदर अभिनयाने स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. कारकीर्द बहरात असताना त्यांनी १९५४ मध्ये सिनेसृष्टीचा निरोप घेतला. मात्र, त्यांची प्रेक्षक आणि सिनेमाशी नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. या अभिनेत्रीची मोहिनी शेवटपर्यंत प्रेक्षकांवर राहिली. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁गुरूवार~18/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment