"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*18/02/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18.फेब्रुवारी:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.9, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~वैधृति, करण ~कौलव,
सूर्योदय-07:05, सूर्यास्त-18:39,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
18 . *काळ्या दगडावरची रेष*
           *★ अर्थ ::~*
    -कधीही न बदलणारी गोष्ट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
18.     शीलं परं भूषणम् ।
  ⭐अर्थ ::~ शील (चारित्र्य) हेच
         श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *18. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ४९ वा दिवस आहे.
★’गांबिया’चा स्वातंत्र्यदिन

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान
●१९९८ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
●१९७९ : सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१८९८ : एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर
●१८८३ : क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
●१८७१ : बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू
●१८३६ : रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू
●१८२३ : रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.  ’प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.
●१९९२ : नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार
●१९६७ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]     ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *✸ जनता येथे राज्य करी ✸*
   ●●●●००००००●●●●
हरिचे प्यारे हरिजन सारे समतेच्या मंदिरी
कुणी न मालक, कुणी न सेवक, जनता येथे राज्य करी

गगनभेदी उंच हवेली
तिथेच काही दीन झोपडी
शाल पांघरुन धनिक झोपतो
वस्‍त्राविण ही गरिबी उघडी
धनिक न कोणी, गरीब न कोणी, एक चूल ती घरोघरी

प्रत्येकाचे नाव प्रभू तो
कणाकणावर सदैव लिहितो
ज्याचे त्याला कण ते मिळता
कोण उपाशी कसा राहतो ?
कुणी न उपाशी, कुणी न अधाशी, नसेल जेथे कुणी भिकारी

मायपित्याचे दर्शन घ्याया
वंचित झालो आम्ही लेकरे
बंधमुक्त ही त्यास कराया
एकजुटीने चला चला रे
आम्ही न साधु, आम्ही न भोंदु, सत्यशांतीचे आम्ही पुजारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

18. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18.  *❃ मुंगी व कबुतर ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एका मुंगीला खुप तहान लागली म्हणून  ती  नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळचे झाडावर बसलेल्या कबुतरांने पाहिले बुडणा-या मुंगीची त्याला दया आली. पटकन त्यांने झाडाचे एक सुकलेले पानं मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला जाळे फेकणार  एवढ्या मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.  त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले.  अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळं त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    *संकटकाळी मदत करणारे हेच खरे मिञ*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✪★◆▣━┅━

18. *घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..*
     गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..
        *कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..*
*डोळे मागे न देता पुढे दिले आहेत...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━

18. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  पैराशूट रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
➜ शत्रूजीत.

✪  भारतातील सर्वांत मोठे प्रेक्षागृह कोणते आहे ?
➜ षन्मुखानंद.( मुंबई )

✪ केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ शिमला.( हिमाचल प्रदेश )

✪  भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
➜ गोपाळ कृष्ण गोखले.

✪  समर सौदामिनी हे प्रचलित नाव कोणाचे आहे ?
➜ अरूणा आसफ अली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18. *❒ गोपाळ हरी देशमुख ❒*
     ━═•●◆●★●◆●•═━
*●जन्म :~१८ फेब्रुवारी १८२३*
●मृत्यू :~ ९ आक्टोबर १८९२

  *☀रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी*
     हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून "लोकहितवादी" या टोपणनावाने यांनी समाजसुधारणा विषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

    🔷 अन्य सामाजिक कार्य
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राउन यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले  प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.

    🔷त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. सातार्‍याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपाती पणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली.    
 
   🔷 गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.

   🔶इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

          *💥समाजकार्य 💥*
🔹अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
🔸हितेच्छू ह्या गुजराती
नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
🔹गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
🔸पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग

              *💥इतर 💥*
🔹अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
🔸अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बाँबे
🔹अध्यक्ष, गुजराती बुद्धिवर्धक सभा
🔸१९७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
🔹सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य  झाले.

              *💥पुरस्कार 💥*
💧ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि 💧१८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
💧१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार~18/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment