"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*18/03/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. मार्च:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.9, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~सौभाग्य, करण ~बालव,
सूर्योदय-07:05, सूर्यास्त-18:39,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18. *नाकाचा बाल –*
   ★ अर्थ ::~  अत्यंत प्रिय व्यक्ती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

18.  क्षणश: कणशश्चैव विद्याम्
      अर्थम् च साधयेत् |
        क्षणे नष्टे कुतो विद्या,
      कणे नष्टे कुतो धनम् ||
⭐अर्थ ::~ क्षणोक्षणी मिळवा विद्या,
        कणाकणानी संपदा
        क्षण सरता कुठे विद्या,
        कण सरता कुठे धन?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★18. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७७ वा (लीप वर्षातील ७८ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’
●१९४४ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
●१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास
●१८५० : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३८ : बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता
●१९२१ : एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष
●१९१९ : इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते
●१९०१ : कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक
●१८८१ : वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,
●१८५८ : रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक
●१५९४ : शहाजी राजे भोसले

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : विश्वनाथ नागेशकर – चित्रकार
●१९०८ : सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *✸ हम धरती के लाल ✸*
       ●●●●●००००००●●●●●
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे
सौ-सौ स्वर्ग उतर आएँगे,
सूरज सोना बरसाएँगे,
दूध-पूत के लिए पहिनकर
जीवन की जयमाल,
रोज़ त्यौहार मनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

सुख सपनों के सुर गूँजेंगे,
मानव की मेहनत पूजेंगे
नई चेतना, नए विचारों की
हम लिए मशाल,
समय को राह दिखाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इंसान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥

एक करेंगे मनुष्यता को,
सींचेंगे ममता-समता को,
नई पौध के लिए, बदल
देंगे तारों की चाल,
नया भूगोल बनाएँगे,
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे।
देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल।
नया संसार बसाएँगे, नया इन्सान बनाएँगे॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

18. *❂ स्वातंत्र्याची घुमे तुतारी ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18. *❃ प्रामाणिकपणाची किंमत*
            ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली.गुरू द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांना ठार मारणार्यांच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?

     कृष्णाने उत्तर दिले "ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही,पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले"

*रुक्मिणीने विचारले "कोणते पाप??"*

    कृष्ण म्हणाला "जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते.दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सत्यमार्गी जगण्याला अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."

  *रुक्मिणीने विचारले "मग कर्णाचे काय?"*

     कृष्ण म्हणाला, "कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही.त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही,पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते, पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही,म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."

  *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिक पणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.                                                           ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

18. *दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही...*
    *यालाच जीवन म्हणतात...*

   *किती दिवसाचे आयुष्य असते..? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून...  कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...*
       *म्हणुन...  आनंदी रहा..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

18. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ ओझर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
  ➜संरक्षण साहित्य.

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोठे आहे ?
  ➜जळगाव.

◆ राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜कोल्हापूर.

◆ नाशिक जिल्ह्यात कांदा - लसूण उत्पादन केंद्र कोठे आहे ?
  ➜निफाड व लासलगाव.

◆ देऊळगाव - रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜अहमदनगर.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18. *❒ वामन गोपाळ जोशी ❒* 
  ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १८ मार्च १८८१
●मृत्यू :~ ३ जून, १९५६

   ★ वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी ★

     हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, कवी, लेखक व मराठी नाटककार, त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत.

     हे मूळचे समशेरपूरचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.

    अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर, १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी हे एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, इ.स. १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या जंगल सत्याग्रहात अग्रभागी राहिले. महात्मा गांधींच्या  चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेशसेवेसाठी त्यांना ४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे शासनाला परत केले होते.

   त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते.

   वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार~18/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment