"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*18/09/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. सप्टेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
         भाद्रपद पौर्णिमा,
     नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा,
योग ~गण्ड, करण ~बव,
सूर्योदय-06:26, सूर्यास्त-18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

18. *ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

18. *अडला हरी गाढवाचे पाय धरी*
               *★अर्थ ::~*
   संकटाच्या/अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची मनधरणी करावी लागते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *शीलं परं भूषणम् ।*
           ⭐अर्थ ::~
शील (चारित्र्य) हेच श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 18. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६१ वा (लीप वर्षातील २६२ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.
●१९४८ : निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.
●१९४७ : अमेरिकन गुप्तचर संघटना सी. आय. ए. (CIA) ची स्थापना.
●१९२७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना
●१९२४ : गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१२ : गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक
◆१९०६ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते.

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक
●२००२ : शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली.
●१९९५ : प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री  ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. 
●१९९३ : असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या
●१९९२ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

18. *✸ खरा तो एकची धर्म ✸*
   ●●●●००००००●●●●
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

18. *❂ देवाजीचं नाव घ्यावं ❂*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
रामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचा
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी

देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी

कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंगं रांगोळीचं नक्षीकाम दारी

फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18.  *❃ घुबड आणि फुलपाखरे ❃*
     ━━•●◆●★★●◆●•═━
    एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, "तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस ? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'

   त्यावर घुबड म्हणाले, "अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'

    पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.     

  *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
        बैल गेला नि झोपा केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *माणसाने आपल्या आयुष्यात*
                सुख-दुःख मानापमान,
          स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
     प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी
           *समान समजाव्यात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

18. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  डोगरा रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
➜ कर्तव्य अन्वात्मा.

✪  भारतातील सर्वांत मोठे सरोवर कोणते आहे ?
➜ वुलर सरोवर.

✪ केंद्रीय ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ लखनऊ.(उत्तरप्रदेश)

✪ रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
➜ स्वामी विवेकानंद.

✪ शहीद-ए-आजम हे प्रचलित नाव कोणाचे आहे ?
➜ भगतसिंग.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

18. *❒ ♦शिवाजी सावंत♦ ❒* 
   ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ ३१ ऑगस्ट १९४०
●मृत्यू :~ १८ सप्टेंबर २००२, गोवा

◆राष्ट्रीयत्व:~ भारतीय
◆कार्यक्षेत्र :~ अध्यापन, साहित्य
                 भाषा मराठी
◆साहित्य प्रकार :~ कादंबरी
◆प्रसिद्ध साहित्यकृती :~ मृत्युंजय
◆पुरस्कार :~ ज्ञानपीठ (१९९४)

    ◆ शिवाजी गोविंदराव सावंत ◆

    हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

*व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द*

    शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.

     पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

     शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते.

     मृत्युंजय(१९६७), या पौराणिक    कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.

     मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

    *’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही   ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.*

    शिवाजी सावंत यांची कादंबर्‍यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.

    मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६ व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

*■ सावंत यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार ■*

     *◆ मृत्यंजयसाठी ◆*
◆महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७)

◆पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -१९८६)

◆’मृत्युंजय’च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)

◆त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३)

*छावासाठी*
◆महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)

◆बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८३)

◆पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००)

◆‘कोल्हापूरभूषण’ पुरस्कार (२ मार्च २०००)

◆महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००)

◆नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा ’मूर्तिदेवी पुरस्कार' दि. ६ फेब्रुवारी १९९६ रोजी उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁बुधवार ~18/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment