"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

18/10/24 शुक्रवारचा परिपाठ

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18.ऑक्टोबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा,नक्षत्र ~अश्विनी,
योग ~वज्र, करण ~कौलव,
सूर्योदय-06:33, सूर्यास्त-18:13
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18.   *वरातीमागून घोडे –*
  ★ अर्थ ::~ एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
🔵🟢🔴
18. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~  सत्य बोलणे हे
   गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *18. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★  जागतिक रजोनिवृत्ती दिन
★ हा या वर्षातील २९१ वा (लीप वर्षातील २९२ वा) दिवस आहे.

     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
●१९६७ : सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९०६ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.
●१८७९ : थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : ओम पुरी – अभिनेता
◆१९२५ : इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक
◆१८६१ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली.
◆१८०४ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : वीरप्पन – चंदन तस्कर
●१९९३ : मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या .
●१९८३ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
●१९३१ : थॉमस अल्व्हा एडिसन – विजेच्या दिव्याचा शोध,  ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध
●१९०९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,
●१८७१ : चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

18.  *$ देश हीच माता $*
     ══════════
देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही
मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====
18. *$ तिमिरातुनी तेजाकडे $*
    ━━━━━━━━━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18.  *सिंह लाडंगा आणि कोल्हा*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?

    तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

    सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.

       *🌀तात्पर्य ::~*
  दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

18.   *चाळणीमध्ये सुध्दा पाणी, साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा...!*       

    *ज्यांची वेळ खराब आहे.त्यांची साथ कधीच सोडू नका...*
    *परंतु ज्यांची "नियत" खराब आहे, त्यांच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका...!!*      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

18 *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  शरीरातील सर्वांत मोठे हाड कोठे असते ?
  ➜ मांडीत.

✪  हाडात सर्वांत जास्त प्रमाणात कोणता रासायनिक घटक असतो ?
  ➜ कॅल्शियम.

✪  रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे ?
  ➜ तुळस.

✪  शरीरात कशाचे प्रमाण जास्त झाल्यास ह्रदयविकाराचा झटका येतो ?
  ➜ कोलेस्ट्राॅल.

✪  मनुष्याच्या शरीरात किती मुत्रपिंड असतात ?
  ➜ दोन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18. *❒ थॉमस अल्व्हा एडिसन ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•═━
_यांचा स्मृतिदीन त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🌷🌹🌺🌹🌷🙏
      *दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
      *तेथे कर माझे जुळती ..!!*
   🙏🥀🌷🌹🌷🥀🙏

●जन्म :~ ११ फेब्रुवारी, १८४७
*●मृत्यू :~ १८ ऑक्टोबर, १९३१*

     याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.

   जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.

    फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली.

    एडिसन घरी बसला. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.

     १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. एडिसनचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने त्याला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे एडिसनला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात  शास्त्रज्ञाने विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार~18/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment