"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

18/12/24 बुधवारचा परिपाठ

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. डिसेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.३, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~पुष्य,
योग ~इन्द्र, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:05, सूर्यास्त-18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18. *गाढवाला गुळाची चव काय –*
  ★ अर्थ ::~ अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

18. *बुद्धिर्यस्य बलं तस्य ।*
      ⭐अर्थ ::~ ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 18. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
*★ अस्पृश्यता निवारण दिन*
★ हा या वर्षातील ३५२ वा (लीप वर्षातील ३५३ वा) दिवस आहे.
★ अल्पसंख्याक हक्‍क दिन
★International Migrants Day

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
●१९८९ : सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९७८ : डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७१ : बरखा दत्त – पत्रकार
◆१९५५ : विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
◆१८९० : ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
◆१८८७ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
◆१८७८ : जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
◆१८५६ : सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ 

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : विजय हजारे – क्रिकेटपटू
●२००० : मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९५ : कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
●१९९३ : राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक.
●१९८० : अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *✸ उभवू उंच निशाण ✸*
    ●●●●००००००●●●●
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18.  *❃❝ वस्तूची उपयुक्तता ❞❃*
     ━━•●◆●★●◆●•═━
      एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    वस्तू लहान असो अथवा मोठी कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18.  आयुष्य म्हणजे  
    अनुभव+ प्रयोग+ अपेक्षा
     यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा "अनुभव" होता.
आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.
उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे ?
➜ रविंद्रनाथ टागोर.

✪  नकाशात वरच्या बाजूची दिशा कोणती असते ?
➜ उत्तर.

✪  १ ते १०० पर्यंतच्या संख्यांची एकूण बेरीज किती ?
➜ ५०५०.

✪  आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?
➜ राजाराम मोहन राॅय.

✪  सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
➜ महात्मा जोतीबा फुले
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18. *❒ ♦रमेश तेंडुलकर♦❒* 
     ━━•●◆●★●◆●•═━
कवी, लेखक आणि समीक्षक
●जन्म :~ १८ डिसेंबर १९३०
●मृत्यू :~१९ मे १९९९

     कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांनी 
एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. काही काळ तेथे अध्यापन केल्यानंतर पुढे ते १९६७ ला कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक या नात्याने शिकवू लागले. विद्यार्थीप्रिय असे ते प्राध्यापक होते. कॉलेजमध्ये शिकवत असताना ते नित्यनियमाने कविता लिखाण करू लागले. त्यांच्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रकाशित होऊ लागल्या. या कवितेवरील प्रेमातून आणि कवितेच्या अभ्यासातून ते काव्य समीक्षाही करू लागले.

    भा. रा. तांबे, अनंत काणेकर, पु. शि. रेगे, बा. भ. बोरकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्या विषयीच्या लेखांचा संग्रह ‘गीतभान’ रमेश तेंडुलकरांच्या रसिक आणि समीक्षा वृत्तीचा प्रत्यय देतो. तेंडुलकरांनी काही महत्त्वपूर्ण ग्रंथांचे संपादनही केले आहे. ‘चौकोनी आकाश’ (अनंत काणेकरांच्या कविता), ‘कविता दशकाची’ (१९८० च्या दशकातील महत्त्वपूर्ण अशा दहा कवींच्या कवितांचे संपादन), ‘मृण्मयी’ (इंदिरा संत यांच्या निवडक कविता), ‘मराठी संशोधन खंड – १३ व १४’, ‘आठवणीतल्या कविता’ (भाग १ ते ४) इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. त्यांच्या संपादनात एक मर्मग्राही समीक्षक प्रत्येक ठिकाणी दिसतो. ‘बालकवींची कविता ः तीन संदर्भ’ या त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या समीक्षात्मक ग्रंथात गोविदाग्रज आणि बालकवी, केशवसुत आणि बालकवी, मर्ढेकर आणि बालकवी अशी मांडणी करून केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितेचा आणि बालकवींच्या कवितेचा ऋणानुबंध शोधला आहे. आधुनिक मराठी कवितेविषयीचा रमेश तेंडुलकरांचा सखोल अभ्यास नियतकालिकातून प्रकाशित झालेले अनेक समीक्षात्मक लेखातून दिसून येतो.

    रमेश तेंडुलकरांची आणखी एक ओळख म्हणजे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर हे त्यांचे चिरंजीव आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁बुधवार ~18/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment