"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*18/11/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *18. नोव्हेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.३, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~मृगशीर्ष,
योग ~सिद्ध, करण ~वणिज,
सूर्योदय-06:46, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

18. *एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *दुष्काळात तेरावा महिना –*
  ★ अर्थ ::~ संकटात अधिक भर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।*   ⭐अर्थ ::~
      जेथे स्त्रियांना पूज्य मानले जाते तेथे देवता रममाण होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

   🛡 ★ 18. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३२२ वा (लीप वर्षातील ३२३ वा) दिवस आहे.
     
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६२ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.
●१९५५ : भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
●१९२८ : वॉल्ट डिस्‍ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
●१९०५ : लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
◆१९३१ : श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
◆१९१० : बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक
◆१९०१ : व्ही. शांताराम – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक  पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
◆१८९८ : प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. 
●१९९९ : रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी
●१९९८ : रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्‍याच्या  शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

18. *✸ जय भारता जय भारता ✸*
      ●●●●००००००●●●●
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

18. *❂ तुम्ही हो माता.. ❂*
   ━━═●✶✹★✹✶●═━
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।

तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो

तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो नईया, तुम्ही खिवईया,
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो

जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं।
जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं
दया की दृष्टि सदा ही रखना,

तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18. *❝साधु आणी जिज्ञासु तरुण❞*
     ━═•●◆●★●◆●•═━
       *‘एका साधूकडे एक जिज्ञासू* तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ साधू म्हणाला, ‘‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनक राजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्या वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला. त्याने त्याला तोच प्रश्न विचारला, ‘‘योगीराज, मुक्ती मिळवण्यासाठी घरादाराचा त्याग करून वनातच तपश्चर्येला गेले पाहिजे का ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘अर्थातच ! नाहीतर घरादाराचा त्याग करून शुक-सनकादी सारखे मोठमोठे साधक मुक्तीसाठी वनात गेले, ते काय मूर्ख होते ? ’’एकाच प्रश्नाला त्या साधूने दिलेली परस्पर विरोधी अशी उत्तरे ऐकून त्या साधूच्या सहवासात रहाणारा त्याचा शिष्य गोंधळात पडला. तो दुसरा तरुण तेथून निघून जाताच त्या शिष्याने त्या साधूला विचारले, ‘‘गुरुदेव, आपल्याकडे एका पाठोपाठ एक आलेल्या त्या दोन साधकांचा प्रश्न एकच असतांना आपण त्यांना परस्परविरोधी अशी दोन उत्तरे का दिलीत ? त्यातले सत्य उत्तर कोणते समजायचे ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘बाळ, मी दिलेली दोन्ही उत्तरे सत्य आहेत. माझ्याकडे जो पहिला प्रश्नार्थी आला होता तो एकीकडे प्रपंच करता करता जीवनमुक्तीसाठी आवश्यक असलेली साधना करू शकेल, अशा कुवतीचा होता; पण नंतर जो तरुण आला त्याला घरात राहून जीवनमुक्तीसाठी करावी लागणारी आवश्यक ती साधना करणे कठीण गेले असते; म्हणून मी त्या त्या प्रमाणे उदाहरणे देऊन त्यांना पटवून दिले.’’

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   योग्य वेळ आणि  परिस्थिती पाहुन योग्य तो सल्ला देणे अचुक ठरेल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

18.  *"आपण दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात"*

    *"म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

18. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ डिझेल इंजिनचा शोध १८९३ मध्ये कोणी लावला ?
  ➜ रूडाॅल्फ डिझेल.

✪  ईव्हीएम मशीन कशावर चालते ?
  ➜ सिंगल अल्काईन बॅटरी.

✪  निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारया शाईमध्ये कोणता घटक असतो ?
  ➜ सिल्व्हर नायट्रेट.

✪  कोणताही दाता एकाच वेळी किती रक्तदान करू शकतो ?
  ➜ ४५० मिली.

✪  मानवी डोळा कोणत्या भिंगासारखे कार्य करतो ?
  ➜ बहिर्वक्र भिंग.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

18. *❒ ♦बटुकेश्वर दत्त ♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•━═
    *_यांचा आज जन्म दिवस_*
           _त्यानिमित्त त्यांना_
      *_विनम्र अभिवादन..!!_*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ १८ नोव्हेंबर १९१०*
●मृत्यू :~ २० जुलै १९६५

     *◆ बटुकेश्वर दत्त ◆*
    एक भारतीय क्रातिकारी होते. बटुकेश्वर दत्त यांचा बंगाल मधील ओरी गावात झाला होता. यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत. नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.

      बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.

      या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

     पुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले. अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.

     त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली. पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह, सुखदेव, राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.
    *पंजाबात  हुसैनीवाला या ठिकाणी  भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव बटुकेश्वर दत्त‘ यांची स्मृतीस्थाने आहेत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 18/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment