*19/01/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. जानेवारी:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.9, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~भरणी,
योग ~साध्य, करण ~बालव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:23,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
19. *पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. *अति तेथे माती*
*★ अर्थ ::~*
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा शेवट वाईट होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।
⭐अर्थ ::~ कोणत्याही देवतेला भक्तिभावाने केलेला नमस्कार भगवान श्रीविष्णूंपर्यंत पोहोचतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *19. जानेवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड
●१९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
●१९६८ : पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
●१९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२० : झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस
◆१८९८ : *विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर* – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार
◆१८९२ : चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
◆१८८६ : रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू,
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष
●१९६० : रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
19 *★ भारत देश महान ★*
═══════════
भारत देश महान अमुचा भारत देश महान
स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कॄष्ण हनुमान॥धृ॥
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान॥१॥
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान॥२॥
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *✹ गणपती गजानान ✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
दाता तू गणपती गजानान
भजती तुजसी गुणीजन
मुक्ता माणिक किरिट शिरावर
गौरतनु वर कस्तुरी केशर
निर्गुण निरवधी सकळ कलानिधी
हे प्रभुवरा अमरनायका
हे शुभकरा भावे तुजसी आलो शरण
शुंडा उदरी वळली अभिनव
कांती मनोहर रूप नवोनव
रुणझुण चरणी वाजती किंकिणी
हे नटवरा ललित लाघवा
हे प्रियकरा व्हावे घडीघडी एक स्मरण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. 🔹 *मांजरे व उंदीर* 🔹
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एकदा मांजरे व उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती. त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले. एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो. तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले. प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले. त्याप्रमाणे केले गेले. नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले. पण मांजरांपुढे उंदराचे काय चालणार ? पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले. अशा प्रकारे शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले.
*🌀तात्पर्य ::~*
*मोठेपणा बरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते...... आणि*
*मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.”*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ अक्षय ऊर्जा दिन केव्हा साजरा केला जातो?
➜ 20 ऑगस्ट
■ जागतिक जलदीन केव्हा साजरा केला जातो ?
➜ 22 मार्च
■ पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे?
➜ 71 %
■ तांब्याचा द्रावनांक किती?
➜ 1082 ℃
■ पऱ्याचा उत्कलनांक किती?
➜ 357 ℃
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶व्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. *❒ वि. स. खांडेकर ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार लोकप्रिय साहित्यिक
अशा या महान साहित्यिकास त्यांच्या *जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
*●जन्म :~ १९ जानेवारी १८९८*
●मृत्यू :~ २ सप्टेंबर १९७६
■ "विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर" ■
यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली जाते .वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे होते. त्यांचा जन्म १८९८ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. मराठीतील श्रेष्ठ कांदबरी कारांपैकी ते एक होते. वि.स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यसेवेचा प्रारंभ कथालेखनापासून केला. त्यांनी अनेक लघुकथा व रुपकथा लिहिल्या आहेत. इ.स. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कांदबरी त्यांनी लिहिली.
रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांनी ’कुमार’ या टोपण नावाने कविता लेखन तर ’आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे.
खांडेकरांनी छाया, ज्वाला, देवता, अमृत, माझं बाळ, इत्यादी चित्रपट लिहिले असून त्यापैकी काही चित्रपट गाजले होते. खांडेकर हे जीवनवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘जीवनासाठी कला’हा साहित्यातील पक्ष त्यांनी उचलून धरला होता.
ते साहित्य अकादमीचे फ़ेलो होते. त्यांच्या ‘ययाती’या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारने इ.स. १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता .भारतीय ज्ञानपीठातर्फ़े १९७४ मध्ये ‘ज्ञानपीठ’पारितोषिक त्यांना मिळाले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शुक्रवार ~19/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment