"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*19/02/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19.फेब्रुवारी:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━       
पौष शु.10, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~मृगशीर्ष,
योग ~विष्कम्भ, करण ~गर,
सूर्योदय-07:04, सूर्यास्त-18:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

19. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]     ❂ म्हणी व अर्थ ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19.   आंधळा मागतो एक डोळा,
     देव देतो दोन डोळे
            ★ अर्थ ::~
   अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]       ❂ सुभाषीत ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
             ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]     ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

        🛡 *19. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ५० वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
●१८८४ : यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.
●१८७८ : थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६२ : हॅना मंडलिकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
◆१९२२ : सरदार बियंत सिंग – ‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री
◆१९१९ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले.
◆१९०६ : माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक
◆१६३० : छत्रपती शिवाजी महाराज (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)
◆१४७३ : निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : राम कदम – संगीतकार
●१९९७ : डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते
●१९५६ : केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक बुद्धीप्रामाण्य वादी विचारवंत.अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
●१९१५ : नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक (जन्म: ९ मे १८६६)
●१८१८ : पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे  निधन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]    ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

17. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्‍त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्‍त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]        ❂ प्रार्थना ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

19. *❂ तनमनाच्या मंदिरी या ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]       ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19. *❃❝कोकिळा,पोपट व घार❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एका गरीब भोळ्या कोकीळेला एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती.
        ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

19. तोंडातून बाहेर न पडलेल्या
     शब्दांवर आपली सत्ता असते.
   तोंडातून शब्द बाहेर पडले की
  *त्यांची तुमच्यावर सत्ता चालते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

19. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  आसाम रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
➜ आसाम विक्रम.

✪  भारतातील सर्वांत मोठे रेल्वेस्थानक कोणते आहे ?
➜ हावडा.( पश्चिम बंगाल )

✪ केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ इंदौर.( मध्यप्रदेश )

✪  आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
➜ पंडिता रमाबाई.

✪  लोकनायक हे प्रचलित नाव कोणाचे आहे ?
➜ जयप्रकाश नारायण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19. *❒ शिवाजी शहाजी भोसले ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर...
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या
प्रमाणावर...
राज्य करणारा राजा म्हणजे
       *राजा शिवछत्रपती*
    *यांना मानाचा मुजरा...!!*

●जन्म :~ १९ फेब्रुवारी १६३०
           शिवनेरी किल्ला, पुणे
●मृत्यू :~ ३ एप्रिल १६८०, रायगड
●राज्याभिषेक :~ ६ जून १६७४

         ★ अधिकारकाळ :~
【६ जून १६७४ ते ३ एप्रिल १६८०】
         ★ राज्यव्याप्ती :~
पश्चिममहाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

         💥 राजब्रीदवाक्य 💥
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।"

     ◆छत्रपती शिवाजीराजे भोसले◆

   हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

   महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजआणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजी महाराज्यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

    🔶शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

             💥 जन्म 💥
*शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ*

   पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.

  इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.

     💥 शिवाजी जयंती 💥

   भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन कॅलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.

    शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला  आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 19/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment