"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*19/04/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. एप्रिल:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━  

     🟢🔵🟣
चैत्र शु.11, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~मघा,
योग ~वृद्धि, करण ~वणिज,
सूर्योदय-06:18, सूर्यास्त-18:57,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

19. *प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

19. *कसायाला  गाय धार्जिणी*
      *★ अर्थ ::~* - खाष्ट माणसापुढे गरीब माणसे नमतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

19. *यथा राजा तथा प्रजा ।*
  ⭐अर्थ ::~ जसा राजा तशी प्रजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★19. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १०९ वा (लीप वर्षातील ११० वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७५ : ’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला.
●१५२६ : मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : मुकेश अंबानी – उद्योगपती
◆१९१२ : ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
◆१८९२ : *ताराबाई मोडक –* शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.  बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे.
◆१८६८ : पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू: २७ जानेवारी १९४७)

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
●१९९४ : मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री. पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडव ल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला..
●१९९३ : डॉ. उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता.
●१९१० : अनंत कान्हेरे – क्रांतिकारक
●१८८२ : चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *✸अमुचा भारत देश महान..!*
       ●●●●●००००००●●●●●
अमुचा भारत देश महान
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार

स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !

स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
       अमुचा भारत देश महान !

या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !

गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

19.  *❂ हे करुणाकरा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

19.    *❃❝ कुदळ ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━
     एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले? मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

19.  *मी* माझ्या *आयुष्यात*
*प्रत्येक* व्यक्तिला *किंमत* देतो..

              *" कारण"*

     जे चांगले आहेत ते *साथ* देतील
व जे *वाईट* असतील ते *अनुभव* देतील....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

19. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ स्वच्छ भारत मिशन योजना केव्हापासून सुरू झाली ?
➜२ ऑक्टोबर २०१४.

✪ ऑल इंडिया रेडिओचे घोषवाक्य काय आहे ?
➜बहुजनहिताय,बहुजनसुखाय.

✪ भारतातील कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
➜नारायण मेघाजी लोखंडे.

✪ गेम चेंजर हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
➜शाहिद आफ्रिदी.

✪  भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बॅंक कोणती ?
➜सारस्वत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

19.  *❒ ताराबाई मोडक ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅─
*●जन्म :~ १९ एप्रिल, १८९२*
                 इंदूर, भारत
●मृत्यू :~ ३१ ऑगस्ट, १९७३

             ◆ताराबाई मोडक◆
    🔹ह्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.

    🔸ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या.
       🔹प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. 

    🔸आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.
   🔹 बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!

         *_🎪पुरस्कार *
   🔸ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला.
    🔸शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६-इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

             *_♦निधन_*
   🔹ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.

        *_🎪दादरचेव शिशुविहार_*
    🔹इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.
    🔸  ' बालदेवो भव ' हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत, शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास मुभा देण्यात येते. मुलांना डबा, पाटीदप्तर, वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शुक्रवार~19/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment