"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*19/06/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. जून:: बुधवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━       
ज्येष्ठ शु.१२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~सिद्ध, करण ~बालव,
सूर्योदय-06:01, सूर्यास्त-19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

19. *तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19. *जिथे राबती हात तेथे हरी*-
   *★ अर्थ ::~* जिथे श्रम केले जातात तिथे देवाचा वास असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।*
*अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं च विद्यया ॥*
    ⭐अर्थ ::~ अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     *🛡 ★ 19. जून ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७० वा (लीप वर्षातील १७१ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
●१९८९ : इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६६ : ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
●१९१२ : अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
●१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.
●१६७६ : शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

        ~*★जन्मदिवस / जयंती★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : राहूल गांधी – काँग्रेसचे सरचिटणीस
◆१९४७ : सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक
◆१९४५ : आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी नेत्या
◆१८७७ : डॉ. पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ 

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील  चित्रपट अभिनेत्री
●१९९८ : रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
●१९९६ : कमलाबाई पाध्ये – समाजसेविका
●१९९३ : विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक
●१९५६ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *❂ हे करुणाकरा ईश्वरा ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19.  *❝ म्हातारि आणि चोर ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     *एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती* .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत

    एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
     ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले
अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
      म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

    शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे.

    ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.

    प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

     आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   एका पुण्यवान माणसाच्या आश्रयlमुळ आजही चार पापी माणस जगु शकतात पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात ही होऊ शकतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं. त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.*
       कोणत्याही क्षेत्रात जा
*उद्याचा भविष्यकाळ हा*
*वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

19. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  अरूणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
➜नेफा.

✪ विदर्भातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
➜नागपूर.

✪ 'हिंद केसरी' हा प्रसिद्ध चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜कुस्ती.

✪  'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवाजी महाराजांनी कोणाबद्दल काढले ?
➜तानाजी मालुसरे

✪  अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो ?
➜ कार्बन डायऑक्साईड
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

19.  *❒ चंद्रशेखर आझाद ❒* 
    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले.

       त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

     दिनांक २७ फेब्रुवारी १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे 'सुखदेव राज' या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ बुधवार ~19/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment