"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*19/08/24 सोमवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. ऑगस्ट:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण पौर्णिमा,  नक्षत्र ~श्रवण,
योग ~शोभन , करण ~विष्टि,
सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣━┅━

19. *दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

19. *वासरात लंगडी गाय शहाणी –*
   ★ अर्थ ::~  अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

19.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
             ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

     🛡 ★ 19. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक छायाचित्रण दिन
★ हा या वर्षातील २३१ वा (लीप वर्षातील २३२ वा) दिवस आहे.
★ विमान दिन

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९९९ : बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
●१९१९ : अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४६ : बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष
◆१९१८ : शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
◆१९०३ : गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.
◆१८८६ : मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरीअभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
◆१८७१ : ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते

   ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता]
●१९९३ : य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार
●१९९३ : उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

19. *✸ भारत अमुचा देश ✸*
   ●●●●००००००●●●●
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक

आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ

धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख

प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]     ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

19. *❂ क्षणभर उघड नयन ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
क्षणभर, उघड नयन देवा

करावया तव मंगल पूजा
देहदीप मी जाळिन माझा
भावभक्तिचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा

धूप जाळिते मी श्वासाचा
सुगंध पसरिल मंगलतेचा
कोमल पद हृदयावर ठेवित प्रभू माझा यावा

अभंग नाही, नाही ओवी
मूक जिवाने कशि रे गावी ?
नयनांमधले अश्रू करिती अखेरचा धावा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

19. *❃❝ विश्‍वासघातकीपणा ❞*
   ━━•●◆●★★●◆●•━━
      एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्‍वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा कुत्रा इतक्या विश्‍वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब, माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही?' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर आहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्‍वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या अर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले.

           *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     विश्‍वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्‍वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असेच म्हटले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....*
   *कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,*
       *जिथे 'तेल आणि वात 'जळते...*
*पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

19. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿* ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
  ➜ गुजरात.

✪  जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?
  ➜ १० डिसेंबर.

✪  सीताफळाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात कोठे होते ?
  ➜ दौलताबाद. ( औरंगाबाद )

✪  आकाशात दिसणारया इंद्रधनुष्यात हिरवा रंग कोठे असतो ?
  ➜मध्यभागी.

✪  'बटाट्याची चाळ' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे ?
  ➜पु.ल.देशपांडे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

19. *❒ ♦अप्पा पेंडसे ♦ ❒* 
   ━━•●◆●★★●◆●•━━
🔹जन्म :~ १७ ऑगस्ट १९१६;
*🔸मृत्यू :~ १९ ऑगस्ट १९८३*

    🔶 डॉ. विनायक विश्वनाथ ऊर्फ अप्पा पेंडसे  हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.

    ♦स्वामी श्रद्धानंदांची एका माथेफिरू माणसाने हत्या केल्यानंतर आपण श्रद्धानंदांची जागा घ्यायची असे अप्पा पेंडसे यांनी वयाच्या १०व्या वर्षी ठरवले.

    🔷 ब्रिटिशांनी भारतात पाठविलेले सर्व ब्रिटिश सभासद असलेले सायमन कमिशन जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्याचे काळ्या झेंड्यांनी स्वागत करणाऱ्यांमध्ये १२ वर्षांचे अप्पा पेंडसे होते. त्यावेळी जुन्या आणि नव्या हजारो कार्यकर्त्यांनी भर उन्हात सायमन कमिशनचा धिक्कार करणारा लांबलचक मोर्चा काढला होता. भारताचे भवितव्य ठरवणाऱ्या या कमिशनमध्ये एकही भारतीय का नसावा हा त्यांचा सवाल होता. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.

    🔶 अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते; भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात इ.स. १९३०मधे ते सामील झाले. १९३२मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बँड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्‍या भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता. अनेक वैचारिक मतभेद असणाऱ्या समाजगटांमध्ये व संस्थांच्या माध्यमातून काम करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे या एकाच विचाराने ते भारले गेले होते.

   ♦भारताला स्वातंत्र्य मिळताक्षणीच त्यांनी स्वतःला स्वतंत्र भारताच्या पुनरुत्थानाला वाहून घेतले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अप्पा पेंडसे यांनी प्रभावी संघटन व प्रेरणादायी विचार मांडून बुद्धिवान स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फौज जमवली आणि पुणे शहरात ज्ञान प्रबोधिनी नावाच्या शिक्षणसंस्थेची इ.स. १९६२ मध्ये स्थापना केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार~19/08/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment