"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*19/09/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. सप्टेंबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━       
भाद्रपद कृ.२, पक्ष :कृष्ण पक्ष, 
        तिथि ~द्वितीया,
     नक्षत्र ~उत्तराभाद्रपदा,
योग ~वृद्धिकरण ~वणिज
सूर्योदय-06:26, सूर्यास्त-18:37,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

19. *गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

19. *दाम करी काम*
            *★अर्थ ::~*
  पैशाने बऱ्याच गोष्टी साध्य होतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

19. *विद्वान् सर्वत्र पूज्यते ।*
      ⭐अर्थ ::~ विद्वान मनुष्य
   सगळीकडे पूजिला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

🛡 *★ 19. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६२ वा (लीप वर्षातील २६३ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
●२००० : भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.
●१९४६ : फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : सुनीता विल्यम्स – भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी, नासाअंतराळयात्री आहे.
◆१९२५ : बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार
◆१९१७ : अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक 
◆१८६७ : शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक.

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना
●२००२ : *प्रिया तेंडुलकर–* रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका,
●१९९३ : दिनशा के. मेहता – निसर्गोपचार तज्ञ, महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार व निकटचे सहकारी
●१९३६ : पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक
●१७२६ : खंडो बल्लाळ चिटणीस – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19.  *✸ शूर आम्ही सरदार ✸*
    ●●●●००००००●●●●
शूर आम्ही सरदार आम्हांला , काय कुणाची भीती
देव , देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती ll धृ ll
आईच्या गर्भात उमगली , झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत
लाख संकटे झेलुन घेईल , अशी पहाडी छाती ll १ ll
जिंकावं वा लढून मरावं , हेच आम्हांला ठाव
लढून मरावं मरून जगावं , हेच आम्हांला ठाव
देशापायी सारी विसरू , माया ममता नाती ll २ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. *❂ तनमनाच्या मंदिरी या ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

19.  *❃❝ सत्याची कास ❞❃*
━━•●◆●★◆★●◆●•━━
      एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे.

    त्याचप्रमाणे तो आपल्य वर्ग शिक्षिकाच्या छोटी छोटी कामे करत असे. त्यामुळे शिक्षकांना त्याच्या बद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते वह्या, पुस्तके देत असत. दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले, ''अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल'' पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला. त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते. त्यानीच आपले पोट कसे बसे भरत. मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार.

     आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले. दिनू सारखा विचार करू लागला. असे होतात तोच शिक्षक म्हणाले, ''आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे.'' दिनू म्हणाला, ''गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो.'' गुरुजी म्हणाले ठीक आहे. उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा.'' असे आवर्जून गुरुजीने सांगितले. ''ते पुस्तक तू वाच.'' दिनूने घाई घाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला. वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय? त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला. त्या पुस्तकात चक्क 500 रुपयांची कोरी नोट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. अरे पण मी तर पुस्तकात 500 रुपयांची नोट ठेवलेली नव्हती. मग कोठून आली ही नोट! तो विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की, ही नोट नक्की गुरुजींची आहे. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरुजींचे आहेत. पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत. असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला. पण त्याच्या मनात आले की, या पेश्याने स्कॉलरशिपची फी भरता येईल. कपडे, पुस्तके, आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील. हे आपणांस फारच उपयोगी आहेत. पण, 'हे पैसे आपले नाहीत.' तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला.

      गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते. तो तेथे दिनू पोहोचला. दिनू म्हणाला, ''गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात 500 रुपयाची नोट होती. ती आपली नोट आहे. ही घ्या.'' गुरुजी म्हणाले, ''धन्यवाद दिनू.'' एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवेले असते. तुझी अशी परिस्थिती त्यात तु फीचा अजिबात विचार केला नाहीस. तू ताबडतोब 500ची नोट माझ्याकडे घेऊन आलास. खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस. हे आज मला कळले''. शाब्बास! दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी 500 रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती. त्या परीक्षेत तु उत्तीर्ण झालास. 'धन्य तु दिनू''. असे आनंदाने उद्गगार गुरुजींनी काढले. कोणती परीक्षा गुरुजीँ '' दिनू म्हणाला. ''सत्त्वपरीक्षेत तू उत्तीर्ण झालास. ''असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले.'' हे काय गुरुजी, हे काय करता, मला इनाम कशामुळे. तू शिक. चांगला शहाणा हो. परीक्षा देत राहा. तुला ही पुस्तके, वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती.

    हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले. तो जोरात अभ्यास करू लागला. अन शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला. त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या. सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या. भाग्यवान दिनू.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     जो नेहमी सत्याने वागतो, प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते. 'सत्याची कास धरा. सत्य कधीही लपत नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. *जो दुसऱ्यांना मान देतो,मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो; कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. *✿ भारतातील पहिले ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■ *पहिले गव्हर्नर जनरल-*
    ➜ *लॉर्ड माऊंट बॅटन*

■ *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष-*
    ➜ *व्योमेशचंद्र बॅनर्जी*

■ *पहिले राष्ट्रपती-*
    ➜ *डॉ. राजेंद्र प्रसाद*

■ *पहिले पंतप्रधान-*
    ➜ *पं. जवाहरलाल नेहरू*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

14. *❒♦सुनीता विल्यम्स❒*
     ━═•●◆●★●◆●•═━
●जन्म :~ १९ सप्टेंबर १९६५
●भारतीय-अमेरिकन अंतराळवीर
*नासा अंतराळयात्री*

           ★ सुनिता विल्यम ★
   ही भारतीय वंशाची अमेरिकन  नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

    सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी आहे.

    सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेटस नेव्हल अकॅडेमि कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली .

         *◆ शिक्षण ◆*
• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

        *◆ मिलिटरी कारकीर्द ◆*
   सुनीता विल्यम्स मे १९८७ ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मियामी, फ्लोरिडा येथे झालेल्या रिलीफ ऑपेरेशनमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी पायलट पद भूषविले. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुतत असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासा मध्ये निवड झाली.

       *◆ नासा कारकीर्द ◆*
  सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार~19/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment