"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

19/12/24 गुरूवारचा परिपाठ

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *19. डिसेंबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━       
मार्गशीर्ष कृ.४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~वैधृति, करण ~बालव,
सूर्योदय-07:06, सूर्यास्त-18:05,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

19. *हसा, खेळा पण शिस्त पाळा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19.     *शीलं परं भूषणम् ।*
  ⭐अर्थ :: ~ शील (चारित्र्य) हेच
         श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 19. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ गोवा मुक्ती दिन
★ हा या वर्षातील ३५३ वा (लीप वर्षातील ३५४ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८३ : ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.
●१९६१ : पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
●१९२७ : राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३४ : * प्रतिभा पाटील –* भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
◆१८९९ : मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
◆१८९४ : कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९),

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक
●१९९८ : जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक
●१९९७ : डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक,
●१९२७ : राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक  `
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●००००००●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

19. *❂ अनंता तुला कोण पाहु ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"

फुले सृष्टीची मानसा रंजिती,
घरी सोयरी गुंगविती मती,
सुखे भिन्‍न ही, येथ प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषू शके ?

नवी भावपुष्पे तुला वाहिली,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू ! कल्पना जल्पना त्या हरो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

19.  *❃❝ "मनातील आवाज" ❞❃*
     ━═•●◆●★●◆●•═━
    नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
    अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

       तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास..!!"

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
       मित्रांनो, "मनातील आवाज" ही आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून ‘माकड‘ बनून राहावे लागेल... "
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

19. *ज्या दिवशी माणूस समजेल की, समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील....!!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

19. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  जगात न्यूट्राॅन बाॅम्ब सर्वप्रथम कोणत्या देशाने बनविला ?
  ➜ अमेरिका.

✪  हायड्रोजन बाॅम्बचा जनक कोण ?
  ➜ एडवर्ड टेलर.

✪  अणुबाॅम्बचा शोध कोणी लावला ?
  ➜ ऑटो हाॅन.
✪  अंघासाठी लिपी कोणी शोधून काढली ?
  ➜ लुईस ब्रेल.

✪ प्रकाशाचा वेग प्रथम कोणी मोजला ?
  ➜ रोमर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

19. *❒ प्रतिभा देवीसिंह पाटील ❒* 
     ━━•●◆●★●◆●•━━
   💎१२ व्या भारतीय राष्ट्रपती
              ◆ कार्यकाळ ◆
(२५ जुलै २००७ –  २४ जुलै २०१२)
*भारताच्या राष्ट्रपती पदावर नेमल्या गेलेल्या या पहिल्या महिला आहेत.*
    *_यांचा आज जन्म दिवस_*
        _त्यानिमित्त त्यांना_
*हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ १९ डिसेंबर १९३४*
    नंदगाव, जळगाव, महाराष्ट्र
◆पती :~ देवीसिंह राजसिंह पाटील

            *★ प्रतिभा पाटील ★*

     🔗या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती आहेत. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. *भारताच्या राष्ट्रपती पदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.*

    🔷राष्ट्रपतीपदापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होत्या.

          *💥स्वीकारलेली पदे*
          ~~~~~~~~~~~
🔻१९६२ पासून महाराष्ट्राच्या आमदार
🔹१९६७ ते ७२ : आरोग्य, पर्यटन, गृहनिर्माण, संसदीय कामकाज या खात्यांच्या राज्यमंत्री
🔸१९७२ ते ७४ : समाजकल्याण मंत्री
🔻१९७४ ते ७५ : आरोग्य आणि समाजकल्याण मंत्री
🔹१९७५ ते ७८ : शिक्षण, सांस्कृतिक, पुनर्वसन मंत्री
🔸१९७९ ते फेबुवारी १९८० : विधानसभेत विरोधी पक्षनेत्या
🔻१९८२ ते ८५ : शहरविकास आणि गृहनिर्माण मंत्री
🔹१९८३ ते ८५ : नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री
🔸१९८५ ते ९० : राज्यसभेवर निवड
🔻१९८८ ते ९० : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष
१८ नोव्हेंबर १९८६ ते ५ नोव्हेंबर
🔸१९८८ : राज्यसभेच्या उपसभापती
🔻१९९१ : लोकसभेच्या खासदार
८ नोव्हेंबर २००४ : राजस्थानच्या राज्यपाल

        *💠 दयाळू प्रतिभा पाटील*
    🔗यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्घृण गुन्हेगारांचे गुन्हे माफ केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू' राष्ट्रपती ठरल्या. त्यांनी २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. आधीच्या ३० वर्षांत म्हणजे १९८१ पासून मंजूर करण्यात आलेल्या दयेच्या अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण ९० टक्के होते.

    🔗सुशील मुर्मू याचा दयेचा अर्ज २००४पासून प्रलंबित होता. प्रतिभा पाटील यांनी मुर्मू याचा दयेचा अर्ज ९ फेब्रुवारी २०१२रोजी मंजूर केला आणि त्याची फाशी रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. मुर्मू याला नरबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. स्वतःच्या भरभराटीसाठी मुर्मू याने झारखंड येथे नऊ वर्षांच्या मुलाचा बळी दिला होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁गुरूवार ~19/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment