*19/11/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 19/11/2018 ❂*
*🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *19. नोव्हेंबर:: सोमवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
कार्तिक शु. ११
तिथी : शुक्ल पक्ष एकादशी,
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा,
योग : वज्र, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:47, सूर्यास्त : 18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
19. *आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
19. *दे माय धरणी धरणी ठाय*
*★अर्थ ::~* अतिशय त्रास देणे
➖➖➖➖➖➖➖➖
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *त्रैलोक्यदीपको धर्म: ।*
⭐अर्थ ::~ धर्म हा त्रिभुवनाचा दीपक (मार्गदर्शक) आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *★19. नोव्हेंबर★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय एकात्मता दिन
★ हा या वर्षातील ३२३ वा (लीप वर्षातील ३२४ वा) दिवस आहे.
★ आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा 'इंदिरा गांधी पुरस्कार' राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
●१९९८ : व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
●१९६९ : फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.
●१९६० : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७५ : सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
◆१९२८ : दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
◆१९१७ : *इंदिरा गांधी – भारताच्या
पंतप्रधान*
◆१९१४ : एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार.
◆१८३८ : केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक
◆१८२८ : मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक
●१९७१ : कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक,
●१८८३ : सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
19. *$ शतकांच्या यज्ञातुन $*
════════════
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थणा 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *सावळ्या विठ्ठला*
━━━━━━━━━━
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरून गेले देहभान ||
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाटला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहूनी नि:संग
तारिले अभंग तूच देवा ||
जगी कितिकांना तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा आता माझी
कृपा कटाक्षाचे पाजवी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंगा ||
➖➖➖➖➖➖➖➖
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. *💠 योग्य निर्णय 💠*
•◆•◆•◆★◆•◆•◆•
एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !
मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"
कुंभार म्हणाला, "मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"
मातीने म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"
*_🌀तात्पर्य_ ::~ जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
*मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या*
*विचारांची आवश्यकता असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
19. *▪"महाराष्ट्र"बाबत माहिती▪*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. *🏵इंदिरा गांधी🏵*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*जन्म : १९ नोव्हेंबर १९१७*
मृत्यू : ३१ ऑक्टोबर १९८४
🔵या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
🔴लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
🔷 इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
♦जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
🔶१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
*🔳१९७१ चे भारत पाक युद्घ🔳*
🎪भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी घाबरल्या नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ सोमवार ~ 19/11/2018 ◆*

No comments:
Post a Comment