"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*20/02/24मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20.फेब्रुवारी:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.11, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~प्रीति, करण ~विष्टि,
सूर्योदय-07:04, सूर्यास्त-18:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

20. *व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20.*दुरून डोंगर साजरे*
      *★ अर्थ ::~*
- लांबून दोष दिसत नाहीत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

20.     गुणाः पूजास्थानं गुणिषु
      न च लिंगं न च वयः ।
  ⭐अर्थ :: ~ गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *20. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक सामाजिक न्याय दिवस
★हा या वर्षातील ५१ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१४ : बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.
●१९८७ : मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
●१७९२ : जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात  झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६२ : *अतुल चिटणीस –* जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते.
◆१९५१ : गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८४४ : लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
●२००१ : इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते
●१९९७ : श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक
●१९९४ : त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
●१९५० : बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू
"●१९१० : ब्युट्रोस घाली – इजिप्तचे पंतप्रधान
●१९०५ : विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

20.  *✸ भारत अमुचा असे ✸*
     ●●●●●००००००●●●●●
  भारत अमुचा असे आम्हाला प्राणाहुनही प्यार
या देशाच्या कणाकणास्तव वाहिल शोणित धार ll धृ ll

🎹 ब्रीद आमुचे जरी शांतीचे
इथे तळपती सूर्य क्रांतिचे
नसात खेळे रक्त शिवाचे
या भूमिवर दानवतेचे
बीज न कधि रुजणार ll १ ll

🎹 ईश्वर अमुचा भोळा शंकर
क्षणात होईल प्रलयंकर
कंपित होईल धरणी अंबर
हिमालयाच्या बर्फातुनही
उफाळेत अंगार ll २ ll

🎹 विश्वबंधुता इथली शिकवण
मानवता हे इथले जीवन
दुष्टांचे परि येथे मर्दन
होतिल त्यांच्या समिधा
जे जे येतिल करण्या वार ll ३ ll

🎹 इतिहासाच्या पानोपानी
इथे स्फूर्तिच्या अक्षय खाणी
दुबळी नच ही भारत जननी
अणू अणुतून इथे शक्तीचा
घडेल आविष्कार ll ४ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *❂ हे दयाघना शक्ती दे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना

तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना

विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *❃ सम्राट आणि साधू ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता, साधू म्‍हणाला, राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो. राजा म्‍हणाला, माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात, साधूने उत्तर दिले, ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍या प्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील. साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना,भय,अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

20. मनाला जिंकायचे असते,
         "भावनेने"
  रागाला जिंकायचे असते,
            "प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
     "आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
             "धीराने"
संकटाला जिंकायचे असते,
              "धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,                             
         "माणुसकीने"...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?
➜ करम ही धरम.

✪ भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?
➜ ब्रम्हपुत्रा.

✪ केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?
➜ सांगोला.( महाराष्ट्र )

✪  मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?
➜ दादोबा पांडूरंग तर्खडकर.

✪  पंजाबचा सिंह हे प्रचलित नाव कोणाचे आहे ?
➜ राजा रणजीतसिंग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

20. *❒ ♦अतुल चिटणीस♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   *भारतीय संगणक अभियंता..*

*●जन्म :~ २० फेब्रुवारी १९६२*
●मृत्यू :~ ३ जून २०१३

    अतुल चिटणीस हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्ट'साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

     तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून कम्प्युटर तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली. सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁मंगळवार~20/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment