"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*20/03/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. मार्च:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.11, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~पुष्य,
योग ~अतिगण्ड, करण ~वणिज,
सूर्योदय-07:05, सूर्यास्त-18:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

20. *परमेश्वर खर्‍या भावनेला, उत्कट निश्चयाला साहाय्य करतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही*
    ★ अर्थ ::~  प्रत्यक्ष अनुभव
   घेतल्याशिवाय कळत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

20.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
              ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★20. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक चिमणी दिन
★ हा या वर्षातील ७९ वा (लीप वर्षातील ८० वा) दिवस आहे.
★ ट्युनिशियाचा स्वातंत्र्य दिन
★ आंतरराष्ट्रीय फ्रेन्च भाषा दिवस

  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~ 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५६ : ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९१७ : महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह
●१९१६ : अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.
●१८५४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.
●१६०२ : डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८७ : कंगना राणावत – सिनेकलाकार
◆१९६६ : अलका याज्ञिक – पार्श्वगायिका
◆१९२० : वसंत कानेटकर – नाटककार
◆१९०८ : सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता
◆१८२८ : हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५६ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(जन्म: १ डिसेंबर १९०९)
●१९२५ : लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
●१७२७ : सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

20.  *✹सूरज-सा तिरंगा✹*
     ●●●●●००००००●●●●●
चाँद, सूरज-सा तिरंगा
प्रेम की गंगा तिरंगा
विश्व में न्यारा तिरंगा
जान से प्यारा तिरंगा
सारे हिंदुस्तान की
बलिदान-गाथा गाएगा
ये तिरंगा आसमाँ पर
शान से लहराएगा।

शौर्य केसरिया हमारा
चक्र है गति का सितारा
श्वेत सब रंगों में प्यारा
शांति का करता इशारा
ये हरा, खुशियों भरा है
सोना उपजाती धरा है
हर धरम, हर जाति के
गुलशन को ये महकाएगा।

ये है आज़ादी का परचम
इसमें छह ऋतुओं के मौसम
इसकी रक्षा में लगे हम
इसका स्वर है वंदेमातरम
साथ हो सबके तिरंगा
हाथ हो सबके तिरंगा
ये तिरंगा सारी दुनिया
में उजाला लाएगा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

20.  *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्‍तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *❃ अस्‍सल नकलाकार ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     एका गावात एका नकलाकाराचे
दररोज कुठे ना कुठे कार्यक्रम होत
असत. त्‍याचे उंची कपडे, गोड व खुसखुशीत बोलणे व त्‍याने केलेल्‍या विविध नकलांमुळे तो प्रसिद्ध होता. त्‍याच्‍या या आवाज काढण्‍याच्‍या कलेमुळे तो लोकांचा आवडता बनला होता. एका कार्यक्रमामध्‍ये त्‍याने एकदा मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला.  लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
लोक वाहवा करू लागले त्‍याच
वेळी एक घोंगडी घेतलेला एक खेडूत शेतकरी उठून उभा राहिला व
म्‍हणाला,'' या कलाकाराने काढलेल्‍या आवाजापेक्षा मांजराच्‍या पिलाचा
आवाज हा वेगळा असतो. या कलाकारासारखा आवाज मांजर कधीच काढत नाही. मी अस्‍सल मांजराच्‍या पिलाचा आवाज काढू शकतो.'' लोक म्‍हणाले,''ठीक आहे, तू आवाज काढून दाखव.'' असे म्‍हणताच घोंगडीवाल्‍याने आपल्‍या डोक्‍यावरून पूर्ण घोंगडी
पांघरली व आतून मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला. आवाज ऐकून
लोक ओरडू लागले,''छे, छे, नाही, नाही, नकलाकाराने काढलेला आवाजच योग्‍य होता. तुला आवाज काढताच येत नाही.
तू चुकीचा आवाज काढतो आहे.'' हे ऐकताच घोंगडीवाला
म्‍हणाला,'' मित्रांनो मी तो आवाज मुळी काढलेलाच नाही.'' असे म्‍हणून त्‍याने घोंगडी अंगावरून काढून फेकली व लोक आश्‍चर्यचकित झाले कारण त्‍याने एका हातात मांजरीचे पिलू धरले होते.
तो पुढे म्‍हणाला,''मला माहित होते की तुम्‍ही लोक मी काढलेल्‍या आवाजाला नकार देणार म्‍हणून मी आवाज न
काढता या मांजरीच्‍या पिलाला दोन
चिमटे काढले व त्‍या पिलाने आवाज काढला. तुम्‍ही मला का नाकारले याचे कारण मी या नकलाकारासारखा सजूनढजून न येता, खुसखुशीत न
बोलता, बडेजाव न मिरवता साध्‍या
वेशात माझे सादरीकरण केले.''
लोकांना आता शेतक-याचे बोलणे
लक्षात आले.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  चुकीच्‍या गोष्‍टीही अत्‍यंत आकर्षकपणे मांडल्‍या की सहजपणे प्रसिद्ध होतात यातून लोकांची दिशाभुल होते. समाजानेही भपक्‍यापेक्षा सत्‍याची कास धरणे गरजेचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

20.   चला आज पासुन नविन सुरवात करूया छोट्या ग्लासाने पाणी पिऊया पाणी कमी पडले तर परत पाणी घेऊ शकतो....
    पण तहान कमी असेल तर मोठ्या ग्लासमध्ये ऊरलेले पाणी फेकुन द्यावे लागते...
*आज वाचवणार तर ऊद्या मिळ्णार.*

    *"वाणी"आणि "पाणी "जपून वापरा वाणीमुळे तुमचा "वर्तमानकाळ" व पाण्यामुळे तुमचा "भविष्यकाळ" सुरक्षीत राहणार आहे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ नाशिक जिल्ह्यातील यादवांचे मुख्य ठिकाण कोणते ?
  ➜ चांदवड.

◆ श्री.चक्रधरस्वामी व संत ज्ञानेश्वर हे थोर संतकवी कोणाच्या काळात होऊन गेले ?
  ➜ यादवांच्या.

◆ दिल्लीचे सुलतानपद भुषविणारी पहिली व एकमेव स्ञी कोण ?
  ➜ रझिया सुलताना.

◆ दिल्ली येथील कुतुबमिनारच्या बांधकामाला कोणी सुरूवात केली ?
  ➜ कुतुबुद्दीन ऐबक.

◆ पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली ?
  ➜ इब्राहीम लोदी आणि बाबर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20.  *❒ शाहीर साबळे ❒* 
     ━━═•●◆●★●◆●•═━━
*"जय जय महाराष्ट्र माझा"*  हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत गायनारे

●जन्म :~ ३ सप्टेंबर, १९२३*
             पसरणी-सातारा जिल्हा,
*●मृत्यू :~ २० मार्च, २०१५, मुंबई*

           शाहीर साबळे उर्फ
     कृष्णराव गणपतराव साबळे
 
        हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

  ♦सामाजिक व राजकीय कारकीर्द

     शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.

    पुढे तरुणपणी १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.

     *🔷शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती..*

          ◆ स्वातंत्र्य आंदोलन ◆
     १९४२मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सामील होऊ लागले. त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली.

  *_शाहीर साबळयांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते _*
🔸अरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
🔹अशी ही थट्टा (तमाशागीत)
🔸आज पेटली उत्तर सीमा
(देशभक्तिपर गीत)
🔹आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
🔸आम्ही गोंधळी गोंधळी.. (गोंधळगीत)
🔹जय जय महाराष्ट्र माझा (महाराष्ट्रगीत)
🔸जेजुरीच्या खंडेराया जागराला (जागरगीत)
🔹नवलाईचा हिंदुस्थान
🔸मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
🔹महाराज गौरीनंदना (गण)
🔸महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
🔹मुंबावतीची लावणी
🔸या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
🔹विंचू चावला (भारूड)
🔸सैनिक माझे नाव (स्फूर्तिगीत)

*_मिळालेले सन्मान आणि पुरस्कार_*
💧अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
💧अखिल भारतीय मराठी नाट्य
संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
💧भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
💧भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणार्‍या पथकात सहभाग
💧महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
💧दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
💧संत नामदेव पुरस्कार
💧महाराष्ट्र गौरव पुरस्कार
💧पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
💧१९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार~20/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment