"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*20/04/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. एप्रिल:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र शु.12, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~ध्रुव , करण ~बव,
सूर्योदय-06:18, सूर्यास्त-18:57,

🟢🔵🟣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

20. *जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *भिंतीला कान असतात*-
   *★ अर्थ ::~* कोणतीही गोष्ट लपून राहत नाही; ती कधीतरी माहित होतेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *सत्यं शिवं सुंदरम् ।*
   ⭐अर्थ ::~ (ईश्वर) सत्य, मंगल आणि सुंदर (आहे).
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★20. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११० वा (लीप वर्षातील १११ वा) दिवस आहे.
      
    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:
●१९४६ : राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली.
●१९३९ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.
●१७७० : प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
◆१९१४ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक
◆१८९६ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
●१९६० : अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार
●१९३८ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
20. *✸ चिरविजयाचे वारस आम्ही*
          ●●●●●००००००●●●●●

चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥

व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥

समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥

खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥

तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. ❂ *देह मंदिर चित्तमंदिर* ❂
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20.  *❃❝  खोटा पैसा  ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  एकदा दिनदयालजी बाजारात भाजी आणण्यासाठी गेले असता एका वृद्ध बाईकडून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर हिशोब लिहिताना त्यांच्या लक्षात आले कि आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या म्हाताऱ्या बाईला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण नकळत का होईना त्या बाईला फसविले. याचे त्यांना अपार दु:ख झाले. ते पुन्हा बाजारात गेले व त्या बाईसमोर जावून उभे राहिले व म्हणाले," बाई, मी नकळत का होईना तुम्हाला फसविले आहे. मी तुम्हाला खोटा पैसा दिला आहे." त्या बाईला त्यांच्याशी बोलायला वेळ नव्हता, ती त्यांना म्हणाली," अहो, राहू दे एका पैशाचे काय? मला इथे भाजी विकू दे" पण दिनदयालजी म्हणाले ," नाही बाई ! मी तुम्हाला फसविले हि गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझी चूक मला सुधारू द्या." त्या बाईने पण त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहिले व आपला गल्ला असलेली पेटी त्यांच्या समोर ठेवली. बाह्य जग विसरून दिनदयालजिनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला व त्यातील खोटा पैसा त्या बाईला सांगून परत घेतला व त्या जागी खरा पैसा त्या गल्ल्यात टाकला. त्या वृद्ध बाईने त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. पुढे याच दिनदयालजिनी 'एकात्म मानवतावाद' मांडला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  आदर्श आचरणाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *सुंदरता नसली तरी चालेल*
*सोज्ज्वळता असली पाहीजे*
        *सुगंध नसला तरी चालेल*
*दरवळ असायला हवा*
       *नातं नसलं तरीबंधन असायला पाहिजे...*
       *भेट नसली तरी संवाद असला पाहिजे..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?
➜पुणे.

✪ अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?
➜बाॅक्साईट.

✪  डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
➜अकोला.

✪  कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?
➜बॅरिस्टर अंतुले.

✪  तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?
➜तानसा नदी. ( ठाणे )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

20. *❒ डॉ. अनिल भारद्वाज ❒*
    ─┅━━●●★◆★●●━━┅─
     💥 ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना यंदा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे.

     💥 उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो.

     💥 सूर्याभोवतीच फिरणारे दोन ग्रह असले, तरी पृथ्वी व मंगळ यांच्यात फरक आहे. पृथ्वीवर नायट्रोजन व ऑक्सिजन भरपूर आहे तर मंगळावर कार्बन डायॉक्साइड जास्त आहे. मंगळावर नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मिथेनचे अस्तित्व असले, तरी त्यामुळे तेथे जीवसृष्टी असेलच असे म्हणता येत नाही, असे ते सांगतात. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत.

     💥 चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगडचा, त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली. त्यांनी आतापर्यंत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, युरोपा, गिनीमीड, ट्रिटॉन, टायटन या ग्रह व उपग्रहांवर .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शनिवार~20/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment