"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*20/08/24 मंगळवार परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. ऑगस्ट:: मंगळवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ. १, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~शतभिषज,
योग ~अतिगण्ड, करण ~बालव,
सूर्योदय-06:10, सूर्यास्त-19:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

20. *एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

20.  *आयत्या बिळावर नागोबा*
   ★ अर्थ ::~ दुसऱ्याच्या श्रमाचा आयता फायदा घेणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20.   *दुर्जनः परिहर्तव्यः*
    *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
  ⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

     🛡 ★ 20. ऑगस्ट ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ अक्षय ऊर्जा दिवस
★ हा या वर्षातील २३२ वा (लीप वर्षातील २३३ वा) दिवस आहे.
★ लोकशाही दिन
★ सद्‍भावना दिन
★ जागतिक डास दिन
     
    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●२००८ : भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
●१९८८ : इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
●१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.
●१८२८ : राजा राम मोहन रॉय यांनी तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ’ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४६ : एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक
◆१९४४ :  *"राजीव गांधी* – भारताचे ६ वे पंतप्रधान, भारतरत्‍न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१)

  ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : डॉ. नरेन्द्र दाभोळकर -- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या
●१९८८ : माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक.  दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.
●१९८४ : रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. *✸ गे मायभू तुझे मी फेडीन*
      ●●●●०००००●●●●
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. *❂विद्यालय हे मंदिर सुंदर❂*
   ━═●✶✹★★✹✶●═━
           विद्यालय हे मंदिर सुंदर
             प्रयाग जणू हे प्रज्ञेचे
            ज्ञान दिवाळी शोभा उजळी
              प्रसन्न गुरु हे विद्येचे....

            समता ममता त्याग बंधूता
             सेवा गुण हे नित्य स्मरा
          मातृभूमीच्या जयजयकारा
            ज्ञान धनाची आस धरा...

         इथे भारती ज्ञान आरती
            उन्मेशाची अध्र्येफुले
       अर्पित सजले विद्या मंदिर
          मांगल्याची ज्योत जळे

       भागिरथ होऊनी हिच प्रतिज्ञा
         चैतन्याचा फूलवू मळा
          देवी शारदा प्रसन्न होवो
        हाच सापडे बोध खरा...।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

20.  *❃ खरे काय नि खोटे काय*
 ━═•●◆●★★●◆●•━━
   एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, आता एक बोलतील आणि नंतर वेगळेच बोलतील. यांच्‍या मनातले खरे काय आणि खोटे काय हे ब्रह्मदेवाचा बापसुद्धा सांगू शकणार नाही.''

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   जिभेवर एक आणि मनात एक असणा-यां माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. *वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे.* 
  *तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करीत असतो ?
  ➜ लहान मेंदू.

✪  मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते ?
➜  ३३.

✪  मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते ?
  ➜ २४.

✪  शरीरातील सर्वांत लहान हाडाला काय म्हणतात ?
  ➜ स्टीरप.

✪  शरीरातील सर्वांत मोठ्या हाडाला काय म्हणतात ?
  ➜ फिमर.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂व्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

20. *❒ ♦राजीव गांधी♦ ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•━━
    *९ वे भारतीय पंतप्रधान*
            ◆ कार्यकाळ ◆
   (३१ ऑक्टोबर १९८४ ते
                     २ डिसेंबर १९८९)

*●जन्म :~ २० ऑगस्ट १९४४*
मुंबई, ब्रिटिश भारत
●मृत्यू  :~ २१ मे १९९१
       श्रीपेरुमबुदूर,तमिळनाडू

            ★ राजीव गांधी ★
    हे भारताचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

     राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.

     राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.

    इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
     
     *राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.*

          *■ पंतप्रधानपद ■*
     ३१ ऑक्टोंबर इ.स. १९८४ रोजी इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधीवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इंदिराजींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या. सुमारे २७०० शीख यात मारले गेले. याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले. याबाबत दिल्लीत एका समारोहात राजीवगांधी काढलेले उद्गार पुढील प्रमाणे. "जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजुबाजुची जमीन हादरणे सहाजिकच आहे." या व्यक्तव्यावरून राजीव गांधीवर प्रचंड टीका झाली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधीनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठया बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झालाच. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.

      *■ आर्थिक धोरणे ■*
   राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. खासकरुन संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले.

               *■ हत्या ■*
    इ.स. १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचारसभे दरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींच्या सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दीतून पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवून धनूला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

 *❁मंगळवार~20/08/2024*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment