"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*20/09/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. सप्टेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.३,पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~अश्विनी,
योग ~ध्रुव, करण ~वणिज,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:36,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

20.  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

20.  *दुरून डोंगर साजरे--*
★ अर्थ ::~ लांबून दोष दिसत नाहीत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

20.  *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
               ⭐अर्थ ::~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 20. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २६३ वा (लीप वर्षातील २६४ वा) दिवस आहे.      

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).
१९७७ : व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
●१९१३ : वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
●१८५७ : १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०९ : गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष
◆१९४९ : महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक
◆१९२२ : द. न. गोखले – चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक,
◆१८९८ : नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ )
●१९३३ : अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या,  १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)
●१९१५ : संत गुलाबराव महाराज
●१८१० : मीर तकी मीर – ऊर्दू शायर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. *✸ शतकांच्या यज्ञातुन ✸*
   ●●●●००००००●●●●
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी
ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌ उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्‍नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂  प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20.  *❂ भारत अमुचा देश ❂*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक

आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ

धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख

प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

20.  *❃❝ पुण्यवान माणस ❞❃*
  ━━•●◆●★★●◆●•═━
     एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .

    एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .

    अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.

    शेवटी म्हतारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*

    प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

    आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात  पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; 
   ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही
       हरलेली असते आणि
*ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  'इंडिया विन्स फ्रिडम' या पुस्तकाचे लेखक कोण ?
  ➜ मौलाना आझाद.

✪  'यंग इंडिया' हे वर्तमानपत्र कोण चालवित ?
  ➜ महात्मा गांधी.

✪  स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?
➜ लाॅर्ड माऊंटबॅटन.

✪ विदर्भातील ' आनंदवन' ह्या संकल्पनेचे प्रवर्तक कोण होते.
  ➜ बाबा आमटे.

✪  'सुधारक' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
  ➜ गो.ग.आगरकर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

20. *❒ नानासाहेब परुळेकर ❒* 
   ━═•●◆●★★●◆●•═━
भारतीय पत्रकारितेचे पितामह
   ◆यांचा आज जन्म दिवस◆
          त्यानिमित्त त्यांना
      *विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*● जन्म :~ २० सप्टेंबर १८९८*
● मृत्यू :~ ८ जानेवारी १९७३

           नारायण भिकाजी तथा
    'नानासाहेब' परुळेकर

     ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले.

     त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शुक्रवार ~20/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment