20/10/24 रविवारचा परिपाठ
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20.ऑक्टोबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.३/४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~कृत्तिका,
योग ~व्यतीपात, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:34, सूर्यास्त-18:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
20. *एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
20. *आजा मेला नातू झाला*
★ अर्थ ::~ एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
20. *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
⭐अर्थ :: ~ योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *20. ऑक्टोबर* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय एकात्मता दिन
★ हा या वर्षातील २९३ वा (लीप वर्षातील २९४ वा) दिवस आहे.
★ लोकशक्ती दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर
●१९९१ : उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
●१९७० : हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर
●१९६२ : चीनने भारतावर आक्रमण केले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज
◆१९६३ : नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
◆१९१६ : मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर
◆१८९१ : सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल ◆१९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक,
●१९९६ : दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
●१९८४ : पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
●१९७४ : कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार,
=====================
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
20. *$ उषःकाल होता होता $*
════════════
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
20. *$ असो तुला देवा माझा $*
━━━━━━━━━━
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
20. *💠शेवटी मी आई आहे!!💠*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही. ती त्याची सेवा करतच राहिली. एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली. नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे."
शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते, शेवटी मी आई आहे !!
*🌀तात्पर्य ::~*
आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रुप आहे. स्वत:च्या मुलासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते. मग ती आपली असो किंवा दुसर्याची ती दूखावली जाणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहीजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
20. सत्य आणि स्पष्ट बोलणारा
'कडू' वाटत असला
तरी तो 'धोकेबाज' कधीच नसतो.
त्यामुळेच तर
चांगल्या रस्त्याला 'गतिरोधक'...
आणि
चांगल्या व्यक्तिला विरोधक
हे असतातंच…!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ बंदुका तयार करण्यासाठी कोणत्या झाडाच्या लाकडाचा उपयोग करतात ?
➜ अक्रोड.
✪ पाव ( ब्रेड ) तयार करतांना कशाचा उपयोग करतात ?
➜ यीस्ट.
✪ ' फ्लेम ट्री' कोणत्या झाडाला म्हणतात ?
➜ गुलमोहर.
✪ समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात ?
➜ फॅदोमीटर.
✪ 'हवामानाचा' अभ्यास करणा-या शास्त्रास काय म्हणतात ?
➜ मेट्राॅलाॅजी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
20. *❒ ♦सम्राट अशोक♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
हा मौर्य घराण्यातील प्रसिद्ध सम्राट होता. त्याने भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले.
आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपला राज्य विस्तार केला.
सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते.
भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये (रामायण, महाभारत इत्यादी) आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. (नहुष, युधिष्ठिर इत्यादी). असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा *चक्रवर्ती सम्राट* झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.
*पाकिस्तान ,अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ* पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.
कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व पाटणा म्हणून ओळखली जाणारी *पाटलीपुत्र* ही त्याची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्याने *हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा* स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁रविवार ~20/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment