◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. डिसेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.५, पक्ष :कष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~मघा,
योग ~विष्कम्भ, करण ~तैतिल,
सूर्योदय-07:06, सूर्यास्त-18:05,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
20. *मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
20. *अडला हरी गाढवाचे पाय धरी*
★ अर्थ ::~ अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *दुर्जनः परिहर्तव्यः विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
⭐अर्थ ::~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 ★ 20. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३५४ वा (लीप वर्षातील ३५५ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
●१९९४ : राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
●१९७१ : झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
◆१९४० : यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री
◆१८९० : जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक
●१९९३ : वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार
●१९५६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ *’संत गाडगे महाराज’* –अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
●१९३३ : विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक,
●१७३१ : छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
●●●●००००००●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया
थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी
चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
20. *❂ मराठीची गौरव गाथा.. ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
कथा,कविता,सुंदर गाणी
ओवी,भारूड,अभंगवाणी
दासांसंगे श्लोक मनाचे
नित्य गाते मराठी वाणी
केशवसुतांचा शूर शिपाई
बालकवीची ती फुलराणी
तांबे,बोरकर,कांतांसवे
गाणी गाते बहिणाबाई
शूरांच्या त्या शौर्य गाथा
बिरबल सांगे चतूर कथा
रहस्य,विज्ञान,विनोद,अवकाश
मराठीचा भरला भाता
सोळा स्वरांची दुनिया सगळी
व्यंजन चौतीस सारी सजली
शब्दांपुढती विभक्ती प्रत्यय
मराठी भाषा ऐसी बनली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
20. *❝ भिञा व शूर मिञ ❞*
━━•●◆●★●◆●•━━
एक चोर दोन मिञांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्ञ करतो. हे पाहून डरपोक, भिञा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेले असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हणाला 'थांब आता मी तुला माझी बहादूरी दाखवतो. त्याला माहित होते कीं, चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता.त्यामुळे भिञ्या मिञांने परिस्थितीचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला.शूर मित्र त्याला म्हणाला, तूं आता शौर्याचे नाटक नको करूस.स्वतःच्या हातातील लाकूड फेकून दे . तू अशा वागण्याने दुस-यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता .मी पाहिले आहे तूं किती भिञा आहे. तूं तुझा जीव वाचवून पळून गेलास. कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे ऐकून भिञा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला.
*_🌀तात्पर्य_ ::~*
*विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *काही माणसे "श्रीमंतीला" सलाम करतात.. काही माणसे "गरिबीला" गुलाम करतात.. माञ... जी माणसं "माणुसकीला" प्रणाम करतात.. तीच माणसं खऱ्या "जीवनाचा" सन्मान करतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारताची बुलबुल कोणाला म्हणतात ?
➜ सरोजिनी नायडू .
✪ संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला ?
➜ नेवासा.
✪ सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह कोणता ?
➜ पृथ्वी.
✪ लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती सभासद निवडले जातात ?
➜ अठ्ठेचाळीस.
✪ अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे कितवे अध्यक्ष होते ?
➜ सोळावे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
20. *❒ गाडगे महाराज ❒*
─┅━●●★●●━┅─
डेबूजी झिंगराजी जानोरकर
"संत गाडगे महाराज अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
अशा या महान संतास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!!
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ २३ फेब्रुवारी १८७६
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
*●मृत्यू :~ २० डिंसेंबर १९५६*
वलगांव (अमरावती)
◆गाडगे महाराज◆
हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शुक्रवार~20/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment