*20/11/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *20. नोव्हेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक कृ.५, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~पुनर्वसु,
योग ~शुभ, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:49, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
20. *अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
20. *टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही –*
★ अर्थ ::~
कष्टाशिवाय यश मिळत नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *आरोग्यं धनसम्पदा ।*
⭐अर्थ ::~
आरोग्य ही मोठी संपत्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 ★ 20. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★लोकशिक्षण दिन
★हा या वर्षातील ३२४ वा (लीप वर्षातील ३२५ वा) दिवस आहे.
★Universal Children's Day
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ’हॅरी होल्ट पुरस्कार’ लता जोशी यांना जाहीर.
●१९९८ : ’इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.
●१९९७ : अमेरिकेच्या ‘कोलंबिया‘ या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
●१९९४ : भारताची ऐश्वर्या राय ’मिस वर्ल्ड’ किताबाची मानकरी बनली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : वसंत पोतदार – मराठी साहित्यिक
◆१९२७ : चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण
◆१९०५ : मिनोचर रुस्तुम तथा ’मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते
◆१७५० : शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान – हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी – संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक
●१९९७ : शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक हिन्दू महासभेचे अध्यक्ष
●१९८४ : फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *✸ भारत अमुचा असे ✸*
●●●●००००००●●●●
भारत अमुचा असे आम्हाला प्राणाहुनही प्यार
या देशाच्या कणाकणास्तव वाहिल शोणित धार ll धृ ll
🎹 ब्रीद आमुचे जरी शांतीचे
इथे तळपती सूर्य क्रांतिचे
नसात खेळे रक्त शिवाचे
या भूमिवर दानवतेचे
बीज न कधि रुजणार ll १ ll
🎹 ईश्वर अमुचा भोळा शंकर
क्षणात होईल प्रलयंकर
कंपित होईल धरणी अंबर
हिमालयाच्या बर्फातुनही
उफाळेत अंगार ll २ ll
🎹 विश्वबंधुता इथली शिकवण
मानवता हे इथले जीवन
दुष्टांचे परि येथे मर्दन
होतिल त्यांच्या समिधा
जे जे येतिल करण्या वार ll ३ ll
🎹 इतिहासाच्या पानोपानी
इथे स्फूर्तिच्या अक्षय खाणी
दुबळी नच ही भारत जननी
अणू अणुतून इथे शक्तीचा
घडेल आविष्कार ll ४ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
20. *❂ तेजोमय नादब्रह्म हे ❂*
━═●✶✹★✹✶●═━
तेजोमय नादब्रह्म हे
रुणझुणले काळजात, लखलखले लोचनांत
अंबरात, अंतरात, एकरूप हे
सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे
कुसुमांच्या हृदयातून स्नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
20. *❃❝ दैव आणि कर्म ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.
एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
20. स्वता: बदला जग बदलेल..!!
मोठ्यांशी बोलण्याची पध्दत तुमची रित सांगते...
आणि लहानांशी बोलण्याची पध्दत तुमचे संस्कार सांगतात..!!
आपल्या शब्दावर जोर दया, आवाजावर नाही, कारण पावसात फुलं उगवतात, वादळात नाही...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
20. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➜ सहा वर्ष.
✪ मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?
➜ लोकरी.
✪ भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?
➜ बिहार.
✪ इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?
➜ दिल्ली.
✪ गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?
➜ मुंबई
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
20. ❒ झाशीची राणी लक्ष्मीबाई ❒
━═•●◆●★●◆●•═━
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई
●जन्म :~ १९ नोव्हेंबर १८३५
●मृत्यू :~ १७ जून १८५८
या एकोणिसाव्या शतकातील झाशीराज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्याब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्धझालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना *‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’* म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
बालपण लक्ष्मीबाईंचे मूळ नावमणिकर्णिका तांबेहोते. यांचे वडीलमोरोपंत तांबेहे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचेसाताराजिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटीउत्तर प्रदेशातीलकाशीयेथे झाला होता.व्यक्तिमत्त्वधोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.
अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंतनानासाहेब पेशवे,जयाजी शिंदेव लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठीमल्लखांबनावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~ 20/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment