"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*21/01/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21. जानेवारी:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.11,  पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~शुक्ल, करण ~वणिज,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:24,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

21.  *प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *आधीच नव्हती हौस,त्यात पडला पाऊस.*
    *★ अर्थ ::~*
*एखादे काम मनापासून करायचे नसल्यास काहीही कारण पुढे करून ते काम टाळणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

21. *सा विद्या या विमुक्तये ।*
      ⭐अर्थ ::~ मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *21. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २१ वा दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.
●१९७२ : मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.
●१९६१ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट
●१८०५ : होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
●१७६१ : थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३ : पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक
◆१९२४ : प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)
◆१९१० : शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’
◆१८९४ : माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते
◆१८८२ : वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख
●१९५९ : सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
●१९४५ : रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
●१९४३ : क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
●१९२४ : ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. *स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला*
     ●●●●००००००●●●●
स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष

या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष

श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश

हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

21.   *मंगल देशासाठी*
      ==••◆◆●★●◆◆••==
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21.  🔰 *मातेचा उपदेश* 🔰
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
  *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते*. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.

        *🌀तात्पर्य ::~*
  *जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

21. *आत्मविश्वासाने केलेल्या*
. . *कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते*,
. .  . . *मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची*
. . . . *परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत*
. . . .  *जो उत्तीर्ण होतो तो*      
*जिवनात यशस्वी होतोच...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

21. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?
➜बेसाल्ट.

✪  हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती ?
➜मधुशाला.

✪  पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते ?
➜राजस्थान.

✪  अमेरिका देशाचे चलन कोणते ?
➜डाॅलर.

✪  जगातील सर्वांत जुना खेळ कोणता ?
➜पोलो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21.  *❒ माधव जूलियन  ❒*
    ━═•●◆●★●◆●•═━
●नाव :~ माधव त्रिंबक पटवर्धन
●टोपणनाव :~ माधव जूलियन
●जन्म :~ २१ जानेवारी १८९४
                   बडोदा
●मृत्यू :~ २९ नोव्हेंबर १९३९
●कार्यक्षेत्र :~ साहित्य
●भाषा :~ मराठी
●साहित्य प्रकार :~कविता

      *डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन
               ऊर्फ माधव जूलियन*
      हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

*गझल व रुबाई हे काव्यप्रकार*
    फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. *माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

    पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

         *व्यक्तीगत जीवन*
   पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.

   माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे

🔹स्वप्नभूमी माधव ज्यूलियन :-शंकर केशव कानेटकर
🔸डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन :- दत्तात्रेय नरसिंह गोखले
🔹माधव ज्यूलियन : गंगाधर देवराम खानोलकर

🏵 *पुरस्कार आणि गौरव* 🏵

   इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.

  इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.

    इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष होते.

   "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)

   पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁रविवार~21/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment