"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*21/03/24 गुरूवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21. मार्च:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन शु.12, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~सुकर्मा, करण ~बव,
सूर्योदय-07:05, सूर्यास्त-18:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

21. *बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21. *गरज सरो वैद्य मरो*
      *★ अर्थ ::~*
- आपले काम झाल्यावर उपकारकर्त्याला विसरणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

21.  *न मातु: परं दैवतम् ।*
           ⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★21. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन
★ वंशभेद निर्मूलन दिन
★ जागतिक अरण्य दिन
★ आंतरराष्ट्रीय कविता दिन
★ हा या वर्षातील ८० वा (लीप वर्षातील ८१ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
●१९७७ : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
●१६८० : शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७८ : राणी मुखर्जी – अभिनेत्री
◆१९१६ : बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६)
◆१८८७ : मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक
◆१८४७ : बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
●२००५ : दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
●१९७३ : यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं. ग. कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21.  *✸ गाउ त्यांना आरती ✸*
       ●●●●●००००००●●●●●
संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्‍तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती

देह जावो, देह राहो, नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृति, गा तयांची आरती."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21.     *❃ कालिदास ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    *कालिदासांना*कालिदास ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक *वृद्ध स्त्री* विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

   कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.
वृद्ध स्त्री म्हणाली *प्रवासी तर फक्त दोनच आहेत* एक चंद्र 🌕 आणि दुसरा सूर्य🌞 जे दिवस रात्र चालतच असतात.

    कालिदास म्हणाले मी  *अतिथी* आहे. पाणी मिळेल ?

   वृद्ध स्त्री म्हणाली अरे *अतिथी तर फक्त दोनच* आहेत एक *धन* आणि दुसर *तारुण्य* ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

     कालिदास म्हणाले मी *सहनशील* आहे. आता तरी पाणी मिळेल ?
वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर *फक्त दोनच* आहेत एक *धरती* 🌍 आणि दुसर *झाडं* धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील *ओझं* घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती *मधुर फळच* देतात.

*कालिदास आता हतबल झाले,*     
कालिदास म्हणाले *मी हट्टी आहे.*

     वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, *हट्टी तर फक्त दोनच* आहेत *एक नख*💅🏻ं आणि *दुसरे केस*, कितीही *कापले* तरी परत वाढतातच.

    कालिदास आता कंटाळले  आणि 
*म्हणाले मी मूर्ख आहे*.

    वृद्ध स्त्री म्हणाली *मूर्ख तर  फक्त दोनच* आहेत एक *राजा* ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो. 

   कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

    वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या *स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी* उभी होती, कालिदास आता *नतमस्तक*🙏 झाले.

    सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, *शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही.* शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *"श्रध्देने"* ज्ञान मिळते,
          *"नम्रतेने"* मान मिळतो,
              *"योग्यतेने"* स्थान मिळते.

वरील तिन्ही गोष्ट एकत्रीत असल्यास
   त्या व्यक्तिला *"सन्मान"* मिळतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

21. *✿महाराष्ट्र विषयी माहिती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆  नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

◆  सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.

◆  महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.

◆  कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.

◆  कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

21. *❒♦मानवेंद्रनाथ रॉय♦❒* 
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
🔹मूळ नाव :~ नरेंद्रनाथ भट्टाचार्य
●जन्म :~ २१ मार्च, इ.स. १८८७
●मृत्यू :~ २५ डिसेंबर, इ.स. १९५४
                देहरादून, भारत
🔸चळवळ : ~ भारतीय स्वातंत्र्यलढा
आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळ
🔹प्रभाव :~ जतीन मुखर्जी लेनीन

      *🔺मानवेंद्रनाथ रॉय🔺*
 
     हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली-भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते. पूर्वायुष्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठीच्या सशस्त्र क्रांतिकार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको, रशिया, अफगाणिस्तान, चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली. यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हियेत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता. यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद  पुरस्कारला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁गुरूवार~21/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment