*21/06/19 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
*❁ दिनांक :~ 21/06/2019 ❁*
*🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲◆🇸◆🇵●═━━
🍥 *21. जून:: शुक्रवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
जेष्ठ कृ. ४
तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी
नक्षत्र : श्रावण
योग : वैद्रुति, करण : बव,
सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
21. *जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
21. *जिथे राबती हात तेथे हरी*-
*★ अर्थ ::~* जिथे श्रम केले जातात तिथे देवाचा वास असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
*🛡 ★ 21. जून ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय योग दिवस
★जागतिक संगीत दिन
★हा या वर्षातील १७२ वा (लीप वर्षातील १७३ वा) दिवस आहे.
★हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस असतो.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००६ : नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.
●१९९१ : भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९६१ : अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.
●१९४९ : राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना
●१९४८ : पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५३ : बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान
◆१९२३ : सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
◆१९१६ : सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख
◆१९०५ : जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार
●१९४० : *डॉ. केशव बळीराम हेडगेवार* – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
●१९२८ : द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
●●●●●००००००●●●●●
उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला
वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *❂अजाण आम्ही तुझी लेकरे❂*
━━═●✶✹★●★✹✶●═━━
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा
सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे
अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर
खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
21. *❃❝ आयुष्यं...!! ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*
पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.
एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.
*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....
वाघ जोरात झेप घेतो...
आणि तितक्यात वीज चमकते...
त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...
माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं...
आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...
एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...
मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...
आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...
कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...
'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?
'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?
'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'
तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?
एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?
त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?
कोण सांगेल? कोण सांगेल कोण??
कुणीच नाही...
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!
*यालाच जीवन म्हणतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,
*तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,*
*कारण झाड नेहमी 'पान' बदलतात 'मूळ्या' नाही...*
*""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय...*
*निराश होऊ नकॊ 'कमजोर' तुझी वेळ आहे "तु" नाहीस...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
■ महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
■ महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
■ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
■ महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?
👉 ३४
■ महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
21. ❒ केशव बळीराम हेडगेवार ❒
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
🔸टोपणनाव :~ डाँ. हेडगेवार
🔹जन्म :~ १ एप्रिल १८८९
नागपूर, महाराष्ट्र, भारत
*🔸मृत्यू :~ २१ जून १९४०*
नागपूर, महाराष्ट्र, भारत
🔹चळवळ :~ हिंदू धर्म पुनरुज्जीवनवाद व सुधारणा
🔸संघटना :~ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
◆ केशव बळीराम हेडगेवार ◆
🔶हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. डाँ. हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला १ एप्रिल १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावाता झाला.
🔷हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी - व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.
🔶देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी इ.स. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी (दि. २७ सप्टेंबर, इ.स. १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती - या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते. दरम्यान इ.स. १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले.
🔷चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.
🔶सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्र्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁ शुक्रवार ~ 21/06/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment