"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*21/07/19 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 21/07/2019 ❁*
      *🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *21. जुलै:: रविवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ कृ. ४
     तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी,
         नक्षत्र : शतभिषा,
   योग : सौभाग्य, करण : बलव,
सूर्योदय : 06:11, सूर्यास्त : 19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

21. *प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21. *बुडणाऱ्याला काठीचा आधार*
             *★अर्थ ::~*
   घोर संकटाच्या प्रसंगी दुसऱ्याचे थोडेसे साहाय्यदेखील महत्त्वाचे वाटते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21.   *जयतु जयतु भारती ।*
            ⭐अर्थ ::~
    भारतमातेचा विजय असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

         🛡 *21. जुलै* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २०२ वा (लीप वर्षातील २०३ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८३ : अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
●१९६० : सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
●१९४४ : २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४७ : चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
◆१९३४ : चंदू बोर्डे – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष
◆१९३० : डॉ. रा. चिं. ढेरे – सांस्कृतिक संशोधक
◆१९२० : आनंद बक्षी – गीतकार
◆१९१० : *वि.स. पागे -- स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक*
◆१८५३ : शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००९ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
●२००१ : विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
●१९९५ : सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक
●१९९७ : राजा राजवाडे – साहित्यिक
●१९९४ : डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21. *✸ उधळीत शतकिरणां ✸*
        ●●●●●००००००●●●●●
उधळीत शतकिरणां उजळीत जनहृदया
नभात आला रे प्रभात रवि उदया
तिमिराची रजनी गेली रे गेली लया

थरकति चंचल जललहरी, नटली सजली वसुंधरा
मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा
धिंधिंधिंता धिंधिंधिंता दुंदुभीच्या नादासंगे
अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई
जय जय बोला, जय जय बोला कोटीकोटी कंठांनि
भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी
रे संपली ती शर्वरी, ये हा रवि या अंबरी

चल करि वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसि न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी
दिडदिडदारा दिडदिडदारा, प्राण आता झंकारती
तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे
या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे
पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे
ही प्रार्थना, ही कामना, ही भावना, ही अर्चना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21.  *❃❝ प्रारब्धाचा हिशेब ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही. मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल.....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले.......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं. तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ... मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला.....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला ....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला....
तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला....
तरीही तू काही बोलत नाही,
    असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता.  तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला...!!
    दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात.
    मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ?? ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती देवाची कृपा होती. 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21.   *"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते*
        *आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते."*
     *म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

21. *✿इतिहास सामान्य माहिती✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ *भारतात येणारा पहिला ब्रिटिश व्यक्ती कोण?*
    ➜  कॅप्टन हाॅकिन्स(1607)

■  *प्लासीचे युद्ध केव्हा झाले?*
    ➜ २३जून १७५७

■ *भारताचा पहिला गवर्नर जनरल कोण* ?
  ➜ लाॅर्ड विल्यम बेंटीक(1833-35)

■ *भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हटले जाते ?*
    ➜ लाॅर्ड रिपन

■ *जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?*
    ➜ अमृतसर

■  *अलिगढ आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण ?*
   ➜ सर सय्यद खान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21. *❒ देशभक्त वि. स. पागे ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,  महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक...*
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
  🌸🥀💐🌹🌹🥀💐🌸

*●जन्म :~ २१ जुलै १९१०* बागणी ता. वाळवा, जि. सांगली
●मृत्यू :~ १६ मार्च १९९०

    *◆ विठ्ठल सखाराम पागे
ऊर्फ वि. स. पागे ◆*

     प्राथमिक शिक्षण तासगाव येथे घेऊन विलिंग्डन महाविद्यालयातून सांगली येथील महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत या विषयात बी.ए. ऑनर्स पदवी प्राप्त केली. सन 1929 मध्ये देशात यूथ लीगची चळवळ सुरू होती. त्या चळवळीत विद्यार्थी नेते या नात्याने विलिंग्डन महाविद्यालयावर तिरंगा फडकवण्यात ते यशस्वी झाले. 1930 मध्ये जंगल सत्याग्रह, 1931 चा मिठाचा सत्याग्रह यात भाग घेतल्याबद्दल त्यांना सहा महिने कारावास व 100 रुपये दंड करण्यात आला.

      सन 1935 ते 36 या काळात त्यांनी कोल्हापूर येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली व कऱ्हाड येथे वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ केला, परंतु त्यांच्या मनात व्यवसायापेक्षा गरीब समाजाची वकिली करून त्यांचे प्रश्‍न, समस्या सोडवण्यात काळ व्यथित करावा असे वाटले. त्यामुळे ते पुन्हा आपल्या मूळ गावी परत आले व कॉंग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. म. गांधींनी "चले जाव'ची घोषणा केली. यामध्ये प्रत्येक गावचावडीवर एकत्र तिरंगा फडकवणे व गाव मुक्त करणे असा कार्यक्रम आखण्यात आला.

     3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव तालुक्‍यातील पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांचा विराट मोर्चा तासगाव येथील दिवाणी कोर्टावर व तहसील कचेरीवर नेण्यात आला. मोर्चाची मिरवणूक प्रथम दिवाणी कोर्टाच्या दारात आली. त्या वेळी न्यायाधीश एच. एस. पाटील हे स्वतः गांधी टोपी घालून न्यायदानास बसत असत. त्यांनी स्वतः राष्ट्रीय निशाण लावून स्वातंत्र्यसैनिकासह झेंड्याला सलामी दिली. त्यानंतर हा मोर्चा तहसीलदार कचेरीवर गेला, त्या वेळी असलेले तहसीलदार निकम यांनी दिवाणी न्यायाधीश पाटील यांच्या चिठ्ठीवरील सूचनेनुसार तहसील कचेरीवरचा युनियन जॅक खाली उतरविला. नंतर आपले राष्ट्रीय निशाण फडकवून सर्व सैनिकांसह स्वतः झेंड्याला सलामी दिली व तालुका मुक्त झाल्याचे घोषित केले. यानंतर अत्यंत प्रेरणादायी भाषण वि. स. पागे यांनी केले.

     पुढे 1952 ते 1978 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यातील 1960 ते 1978 या कालखंडात ते विधान परिषदेचे सभापती होते. सन 1961 ते 1979 या कालखंडात ते राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. सन 1979 ते 90 ते रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष या होते. या काळात शासनाने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा, सेवासुविधा, बंगला, गाडी, भत्ते देऊ केले; परंतु त्यांनी केवळ मासिक एक रुपया एवढ्याच मानधनावर काम केले. बागणी या मूळ गावी असणारी सुमारे 21 एकर जमीन आपल्या कुळांना दिली. राहते घर, वाडा बागणी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून दिला.

      1972 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्‍न पडला होता. विसापूर (ता. तासगाव) येथे आमच्या हातास काम द्या, पोटाला अन्न द्या, अशी मागणी पागेसाहेबांकडे लोकांनी केली व संपूर्ण देशातील श्रमिकांना वरदान ठरलेली "रोजगार हमी योजना' तेथेच जन्माला आली.
आज राज्यात 365 दिवसांची हमी आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना कामाची हमी देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. दारिद्य्रनिर्मूलन व ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनीदेखील या योजनेचे कौतुक केले. महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची कामे या योजनेमधून झाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ रविवार ~ 21/07/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment