"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*21/09/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21. सप्टेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद कृ.४,पक्ष :कृष्ण पक्ष, 
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~भरणी,
योग ~व्याघात, करण ~बव,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:35,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

21. *मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

21.   थोरा घरचे श्वान त्याला
             सर्व देती मान--
  ★ अर्थ ::~ मोठ्या माणसांच्या आश्रयाखाली असणाऱ्या लहान व्यक्तिनाही मान मिळतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. *त्रैलोक्यदीपको धर्म: ।*
  ⭐अर्थ ::~ धर्म हा त्रिभुवनाचा दीपक (मार्गदर्शक) आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 21. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ आंतरराष्ट्रीय शांतता दिन
★ हा या वर्षातील २६४ वा (लीप वर्षातील २६५ वा) दिवस आहे.
★जागतिक अल्झायमर जागरुकता दिन

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°•••◆•••°°~°°•••🔹
●१९९१ : आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.
●१९८४ : ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
●१९६८ : रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
●१९६५ : गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
●१७९२ : अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.

     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
●१९८० : करीना कपूर – अभिनेत्री
●१९७९ : ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू
●१९२९ : पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक
●१९४४ : राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते
●१९२६ : ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०१२ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
◆१९९८ : फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची  धावपटू
◆१९९२ : ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स]
◆१९८२ : सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

21.   *✹ उठो सोने वालों ✹*
     ●●●●००००००●●●●
उठो सोने वालों सबेरा हुआ है।
वतन के फ़क़ीरों का फेरा हुआ है।।
उठो अब निराशा निशा खो रही है
सुनहली-सी पूरब दिशा हो रही है
उषा की किरण जगमगी हो रही है
विहंगों की ध्वनि नींद तम धो रही है
तुम्हें किसलिए मोह घेरा हुआ है
उठो सोने वालों सबेरा हुआ है।।

उठो बूढ़ों बच्चों वतन दान माँगो
जवानों नई ज़िंदगी ज्ञान माँगो
पड़े किसलिए देश उत्थान माँगो
शहीदों से भारत का अभिमान माँगो
घरों में दिलों में उजाला हुआ है।
उठो सोने वालों सबेरा हुआ है।

उठो देवियों वक्त खोने न दो तुम
जगे तो उन्हें फिर से सोने न दो तुम
कोई फूट के बीज बोने न दो तुम
कहीं देश अपमान होने न दो तुम
घडी शुभ महूरत का फेरा हुआ है।
उठो सोने वालों सबेरा हुआ है।

हवा क्रांति की आ रही ले उजाली
बदल जाने वाली है शासन प्रणाली
जगो देख लो मस्त फूलों की डाली
सितारे भगे आ रहा अंशुमाली
दरख़्तों पे चिड़ियों का फेरा हुआ है।
उठो सोने वालों सबेरा हुआ है।
                       ~ वंशीधर शुक्ल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

21.  *❂ हरि ॐ प्रणव ओंकार❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हरि ॐ हरि ॐ !
प्रणव ओंकार शिवा
हृदयांत उजळू दे सूर्यदेवा
हरि ॐ हरि ॐ !

स्वरचक्र उलगडे तानांचे
हे बोल खोल मम प्राणांचे
प्रतिभेचा हुंकार नवा
हरि ॐ हरि ॐ !

तिमिरांत सभोंती गगनप्रभा
ज्योतीर्मय त्यातून दिव्य सभा
विलसू दे रुपेरी चंद्रथवा
हरि ॐ हरि ॐ !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

21.  *❃❝ हक्काची रोटी ❞❃*
━═•●◆●★★●◆●•═━
     एका राजाकडे एक संतपुरुष आले. प्रसंगवश गोष्ट निघाली हक्काचा रोटीची. राजाने विचारले , "महाराज , हक्काची रोटी कशी असते ? "महाराज म्हणाले, "आपल्या नगरीत अमुक ठिकाणी एक वृद्ध आजी राहतात त्या वृद्ध मातेला जाऊन विचार"

    राजा तिथे गेला व त्याने म्हटले.  "माते हक्काची रोटी पाहिजे." वृद्ध आजी म्हणाली, " राजन, माझ्याजवळ एक रोटी आहे , परंतु तिच्यातली अर्धी हक्काची आणि अर्धी बिना हक्काची." त्यावर राजाने विचारले अर्धी बिना हक्काची कशी? 

     वृद्ध आजी म्हणाली , " एक दिवस मी चरखा कातत होते. संध्याकाळची वेळ होती  अंधार पडला होता. इतक्यात तिकडून एक मिरवणूक निघाली.तिच्यात मशाली जळत होत्या. मी आपली अलग दिवा न जाळता त्या प्रकाशात अर्धी सुतगुंडी कातली. अर्धी गुंडी आधीची कातलेली होती. ती गुंडी विकली आणि पीठ आणले आणि रोटी बनवली. यासाठी अर्धी रोटी हक्काची आहे आणि अर्धी बिना हक्काची. या अर्धीवर मिरवणूक वाल्याचा हक्क आहे." राजाने हे ऐकून त्या वृद्ध  मातेपुढे मस्तक नमविले.

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली संपत्ती हीच तेवढी हक्काची संपत्ती जिच्यात दुसऱ्याचाही वाटा आहे, ती संपत्ती आपल्या हक्काची नाही, तेव्हाच समाजाची स्थिती सुधारेल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

21. *आनंदी मन, सुदृढ शरीर*
  आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे
       *अमृत मिळणं...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

21. *✿ भारतातील पहिले ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
■ *भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?
    ➜ *मुंबई (१९२७)*

■  *भारतातील पहिला बोलपट? 
   ➜ *आलमआरा (१९३१)*

■  *भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?
    ➜ *१९५१*

■  *भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?
    ➜ *१९५२*

■ *भारतातील पहिली परमाणु चाचणी?
    ➜ *पोखरण, राजस्थान*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

21.  *❒ अ‍ॅनी बेझंट ❒* 
   ━━═•●◆★◆●•═━━
●जन्म :~ १ ऑक्टोबर १८४७
*●मृत्यू :~  २० सप्टेंबर १९३३*

     ही इंग्लंडमध्ये जन्मलेली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होती.

• भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला.
• १८९३ मध्ये भारतात आगमन.
• १९१४ 'न्यू इंडिया' वृत्तपत्र काढले.
• १९०७ 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.

    अ‍ॅनी बेझंट या इंग्लंडमध्ये १ ऑक्टोबर, १८४७ साली जन्मल्या. त्यांचे जीवन भारतीय अध्यात्माने फुलले. 'थिऑसॉफिकल सोसायटी' ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. १९१५ च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यांचे वडील विल्यम पेजवुड हे त्या ८-९ वर्षांच्या असतानाच वारले. आई एम्पिल आर्थिक संकटात सापडली. तिच्या मैत्रिणीने अ‍ॅनीला आपल्या घरी नेऊन तिचे पालनपोषण केले. रेव्हरंड फ्रँक या प्रोटेस्टंट पंथाच्या धर्मगुरूरूशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुलेही झाली. पण ती दोघेही वारंवार आजारी पडू लागली. ईश्वरभक्ती व सदाचरणी असूनही मुले आजारी पडतात यामुळे त्यांची ईश्वरावरील श्रद्धा पार उडाली. पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला व त्यांनी घटस्फोट घेतला. अ‍ॅनी बेझंट आईकडे राहायला आल्या. तीही अ‍ॅनीच्या दुःखाने खचली व मरण पावली.
     याच काळात विचारवंत चार्ल्स ब्रॅडला यांच्याशी अ‍ॅनीशी गाठ पडली. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या. ब्रॅडला यांच्या नॅशनल रिफॉर्मरमध्ये त्यांनी सहसंपादिका या नात्याने अनेक लेख लिहिले. मॅडम हेलेना ब्लाव्हॅटस्की या थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याशी ‌अ‍ॅनीची गाठ पडली. त्यांचा 'सीक्रेट डॉक्ट्रिन' हा ग्रंथ अ‍ॅनीने वाचला. जगाचा सांभाळ करणारी एक अदृश्य शक्ती आहे व ती सदैव सावध आहे. यावर अ‍ॅनीचा विश्वास बसला व त्या विचारप्रचारासाठी १८९३ साली त्या भारतात आल्या. 'जन्माने ख्रिश्चन व मनाने हिंदू' असे त्या स्वतःबद्दल नेहमी म्हणत. लोकमान्य टिळकां प्रमाणेच त्यांनी 'होमरूल' आंदोलन उभारले. भारताच्या स्वातंत्र्याचा त्यांनी सदैव पुरस्कार केला. अ‍ॅनी बेझंट यांना भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

      जन्माने ब्रिटिश असूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्या समाजवादी विचार सरणीच्या होत्या. इ.स. १८७५ मध्ये चार्ल्स ब्रॅडलाफ या समाजवादी विचारवंताबरोबर त्यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा 'द फ्रुटस ऑफ फिलॉसॉफी' हा प्रबंध लिहिला. या लिखाणाबद्दल दोघांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर अपिलात ही शिक्षा रद्द करण्यात आली. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. जे. कृष्णमूर्तींना त्यांनी आपला मानसपुत्र मानले. भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. शिक्षण, समाजसुधारणा, स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी भाग घेतला व २० सप्टेंबर, १९३३ रोजी या जगाचा निरोप घेतला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁शनिवार ~21/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment