*21/10/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/xCSUZ5
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21.ऑक्टोबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.५, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~रोहिणी,
योग ~वरीयान्, करण ~कौलव,
सूर्योदय-06:34, सूर्यास्त-18:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
21. *साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *पाण्यात राहून माशाशी वॆर –*
*★ अर्थ ::~*
बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
⭐अर्थ :: ~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *21. ऑक्टोबर* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ "पोलीस स्मृती दिन' हा दिवस 21 ऑक्टोबर 1959 रोजी चीनच्या सीमेचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या दहा CRPF जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतो.
★ हा या वर्षातील २९४ वा (लीप वर्षातील २९५ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८९ : जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
●१९५१ : डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
●१९४५ : फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
●१९४३ : सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
●१९३४ : जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४९ : बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान
◆१९३१ : शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता
◆१९२० : धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यासक
◆१८३३ : अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माते
●१९८१ : दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे–ज्ञान पीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी
●१८३५ : मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार
●१४२२ : चार्ल्स(सहावा)–फ्रान्सचा राजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *पाऊल पुढेच टाका*
════════════
झडल्या भेरी झडतो डंका
पुढचे पाऊल पुढेच टाका
तोंड लागले आज लढ्याला
चहूबाजूंनी येईल घाला
छातीवरती शस्त्रे झेला
फिरू नका रे डरू नका, डरू नका
शपथ तुम्हाला शिवरायाची
मराठमोळ्या मर्दुमकीची
समर्थ गुरु केसरी टिळकांची
विजयाच्या या ऐका हाका, ऐका हाका
निशाण अपुले उंच धरा
शूरपणाची शर्थ करा
कराच किंवा रणी मरा
बहाद्दरांनो मरणा जिंका, मरणा जिंका
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *$ तिमिरातुनी तेजाकडे $*
━━━━━━━━━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *💠 देवतांचा अहंकार 💠*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
उपनिषदातील एक प्रसंग आहे. परमेश्वराने देवांवर कृपा केली आणि त्यांनी शक्तिशाली असुरांवर विजय मिळविला. विजयी झाल्यावर प्रत्येक देवतेला अहंकार निर्माण झाला. त्यातील प्रत्येक जण विजयाचे श्रेय स्वत:कडे घेत आणि दुस-याचे योगदान तुच्छ मानत असे. यामुळे देवतांमध्ये विनाकारण वाद चालु झाले. त्यातून कटूता निर्माण होऊ लागली. हे पाहून परमेश्वराने विचार केला की असेच जर होत राहिले तर असुर परत देवांवर चढाई करतील आणि यांच्यातील वैमनस्य यांना पराजित करेल. ही समस्या सोडविण्यासाठी ईश्वर एक विशाल यक्षाच्या रूपात देवतांच्या समोर हजर झाले. देवतांनी आश्चर्याने त्यांना पाहिले आणि त्यांचा परिचय करून घेण्यासाठी सर्वात प्रथम अग्नि देवतेकडे गेले. यक्षाने त्यांना विचारले,''आपण कोण आहात?'' अग्नि देवतेने स्वाभिमानाने उत्तर दिले,'' आपण मला ओळखत नाही? मी तेजस्वी अग्नि आहे. मी ठरवल्यास सारी पृथ्वी जाळून भस्म करून टाकीन.'' यक्षाने त्यांना एक वाळलेली गवताची काडी ती जाळण्यास सांगितले. परंतु अग्नी देवता ती जाळू शकले नाहीत. मग पवन देवता यक्षाचा परिचय जाणून घेण्यासाठी गेले. तेव्हाने यक्षाने त्यांनाही परिचय विचारला मग पवन देव म्हणाले,'' मी पवन आहे, मी ठरवले तर संपूर्ण ब्रह्मांड उडवून देईन.'' यक्षाने तीच वाळलेली काडी त्यांना उडवण्यास सांगितले. पण पूर्ण जोर लावूनसुद्धा पवनराज ती काडी उडवू शकले नाही. त्यानंतर इंद्र या देवतेकडे निघाले, तोपर्यंत यक्ष निघून गेले होते. आता तेथे पार्वती प्रकट झाली आणि इंद्राला यक्षरूपी परमेश्वराचा परिचय दिला. आता देवतांना त्यांच्या शक्तीचा अंदाज दिला होता आणि त्यांचा अहंकार नष्ट झाला.
*_🌀तात्पर्य_ ::~*
अहंकार आणि अहंकार्याचे पतन निश्चीतच होत असते. आपली शक्ति योग्य कार्याला लावल्यास सार्थक होत असते.
➖➖➖➖➖➖➖➖
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *" प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..."*
-- लिओ टॉलस्टॉय
➖➖➖➖➖➖➖➖
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ राज्यात नदी संवर्धन आणि सरंक्षणासाठी कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?
➜चला जाणूया नदीला.
✪ संगणक ( कॉम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?
➜चार्ल्स बॅबेज.
✪ पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा काय आहे ?
➜H2O.
✪ पंचायत राज हे कोणत्या भारतीय नेत्याचे स्वप्न होते ?
➜महात्मा गांधी.
✪ भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ?
➜कर्नाटक
➖➖➖➖➖➖➖➖
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
*●जन्म - २१ ऑक्टोबर १८३३*
स्टॉकहोम
●मृत्यु - १० डिसेंबर १८९६
*हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते.*
नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.
डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.
इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.
आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजेच १० डिसेंबर, इ.स. १९०१ पासून ही पारितोषिके देण्यास आरंभ झाला. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
*नोबेल याच्या मृत्युपत्रातील तरतुदी*
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.
*💠आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये*
1)भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,
2)वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,
3)साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि
4)शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी
या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~ 21/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment