"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

21/12/24 शनिवारचा परिपाठ

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21. डिसेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.६, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~प्रीति, करण ~वणिज,
सूर्योदय-07:07, सूर्यास्त-18:06,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

21. *ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21. *वासरात लंगडी गाय शहाणी–*
  ★ अर्थ ::~ अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।
   ⭐अर्थ ::~ कोणत्याही देवतेला भक्तिभावाने केलेला नमस्कार भगवान श्रीविष्णूंपर्यंत पोहोचतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 21. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३५५ वा (लीप वर्षातील ३५६ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८६ : रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९०९ : अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
●१९०५ : स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार
◆१९५९ : कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
◆१९२१ : पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
◆१९१८ : कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस
◆१९०३ : भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे –प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण,

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.
●१९९७ : पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक
●१९९३ : मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
●१९७९ : नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

21.     *✹सूरज-सा तिरंगा✹*
      ●●●●००००००●●●●
चाँद, सूरज-सा तिरंगा
प्रेम की गंगा तिरंगा
विश्व में न्यारा तिरंगा
जान से प्यारा तिरंगा
सारे हिंदुस्तान की
बलिदान-गाथा गाएगा
ये तिरंगा आसमाँ पर
शान से लहराएगा।

शौर्य केसरिया हमारा
चक्र है गति का सितारा
श्वेत सब रंगों में प्यारा
शांति का करता इशारा
ये हरा, खुशियों भरा है
सोना उपजाती धरा है
हर धरम, हर जाति के
गुलशन को ये महकाएगा।

ये है आज़ादी का परचम
इसमें छह ऋतुओं के मौसम
इसकी रक्षा में लगे हम
इसका स्वर है वंदेमातरम
साथ हो सबके तिरंगा
हाथ हो सबके तिरंगा
ये तिरंगा सारी दुनिया
में उजाला लाएगा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

21. *❂ सर्वात्मका सर्वेश्वरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥

आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

21.  *❃❝ सिंहाचा सल्ला ❞❃*
     ━━•●◆●★●◆●•═━
     गाढव वाघाला बोलतो गवत पिवळं असतं. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरवं असतं. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांसमोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळं असतं आणि हा वाघ बोलतो कि हिरवं असतं आता तुम्ही सांगा कि खरं काय आणि खोटं काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांसमोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळं असतं. आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जाते.

    सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरवं असतं तरीही का मला शिक्षा केली. सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
ध्येय गाठायचं असेल तर वाटेत येऊन भुंकणारया कुत्र्यांकडे दगड न फेकता बिस्कीट फेका. आणि पुढे व्हा कारण पुढे वाटेत अशी भरपूर कुत्री भेटणार आहेत. ध्येय महत्वाचं आहे कुत्र्यांबरोबरचा वाद नाही..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. *हसणे फार सुंदर आहे !*
*दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..*
*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.*

*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...*
*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.*

*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

21. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  'अभिनव भारत' या संघटनेची स्थापना कोणी केली ?
➜ विनायक दामोदर सावरकर.

✪  सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ?
➜ महात्मा जोतीबा फुले.

✪  कोणत्या किरणांना वस्तुमान नसते ?
➜ गॅमा.

✪  नकाशातील  खालच्या बाजूची दिशा कोणती ?
➜ दक्षिण.

✪  पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला काय म्हणतात ?
➜ जीवावरण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

21. *❒♦शाहीर पठ्ठे बापूराव ❒* 
     ━━•●◆●★●◆●•━━
●जन्म :~ ११ नोव्हेंबर १८८६, रेठरेहरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली
●मृत्यू :~ २२ डिसेंबर १९४५

     संत वाङ्मयाबरोबरच शाहिरी वाङ्मयाने मराठी भाषा अधिक समृद्ध केली, लोकप्रिय केली. संतांच्या बरोबरीने महाराष्ट्रात शाहिरी परंपरा अवतरली. अभंग, ओवी, भारुडे, आर्या ह्या संतवाङ्मयाच्या जोडीला शाहिरांची शाहिरी महाराष्ट्रात दुमदूमू लागली. लावणी, पोवाडा, भेदिक, कवने, वग हे वाङ्मय प्रकार लोकप्रिय झाले. शाहीर हे खरे लोकशिक्षकच ! सामाजिक वाईट रुढी, परंपरा, द्वेष यांवर जोरदार हल्ला करुन त्यांनी नीतीमूल्यांचा जोरदार प्रसार केला.

  शाहीर पठ्ठे बापूराव हे मराठी शाहिरांचे मुकुटमणी समजले जातात. असंख्य लावण्या, कवने, पदे भेदिक लिहून मराठी सारस्वतात मोलाची भेट घातली. संत साहित्याच्या खालोखाल लावणीतून, अध्यात्माची जाणीव देणारे पठ्ठे बापूराव हे खरे `लावणीसम्राट' होत. `तमाशा ` ही महाराष्ट्राची लोककला. त्यालाच पुढे नाट्यकलेचे आवरण, रुप मिळाले व तमाशा, लोकनाट्य बनला. `वगात’ पौराणिक कथांचा सहभाग करुन तो खेडूत जनतेपर्यंत ह्या पुराणातील कथा पठ्ठे बापूरावांनी पोहोचविल्या.

`माझ्या दोन प्रतिज्ञा आहेत. त्यापैकी एक म्हणजे कागदावर ठेवलेली लेखणी संपूर्ण लावणी लिहून झाल्या खेरीज वर उचलायची नाही. आणि आज मिळविलेला पैसा उद्याकरिता राखून ठेवायचा नाही ` असे पठ्ठे बापूराव म्हणत.

    पठ्ठे बापूरावांचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरेहरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला. लहानपणापासून श्रीधरला तमाशाचा नाद लागला.

     गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. बापूरावांचे स्वत:चे काव्य, योग्यसाथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. ` दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी `असा स्वत:च्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामाधुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पण पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करुन स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असं नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्‍या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ` कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळीला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर पुहा एकदा `शाहीर पठ्ठे बापूराव आणि नामचंद पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा या नावाने नव्या जोमाने सुरु झाला. खर्‍या अर्थाने पवळा बापूरावांशी एकरुप झाली होती. ६ डिसेंबर १९३९ साली पवळा काळाच्या पडद्याआड गेली. लक्ष्मी गेली, लोकप्रियता गेली. एकेकाळचा तमाशा सम्राटाला अखेरचे दिवस विपन्नावस्थेत कंठावे लागले. त्यांच्याच तमाशात काम करणार्‍या `ताई परिंचेकर' ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. याच काळात पुण्यातील बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावंना आधार दिला. त्यातूनच या जिंतीकरांनी बापूरावांच्या कवनाचे संकलन केले. १९४२ साली श्रीमंत आबासाहेबांच्या हस्ते जॉन स्मॉल मेमोरियल पुणे येथे जाहीर सत्कार झाला. श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हा शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होता. आजही रातधुंदीत जागवा म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात. असा हा शाहीर त्यांच्या कवनातून आजही आपल्यात आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~21/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment