"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*21/11/23 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *21. नोव्हेंबर:: मंगळवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═
कार्तिक शु.९, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~शतभिषज,
योग ~व्याघात, करण ~बालव,
सूर्योदय-06:49, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

21. *हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

21.    *कामापुरता मामा –*
              ★ अर्थ ::~
काम साधण्यापुरते गोड बोलणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. *श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् ।*
         ⭐अर्थ ::~
श्रद्धावंतालाच ज्ञान मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 21. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★भाषिक सुसंवाद दिन
★हा या वर्षातील ३२५ वा (लीप वर्षातील ३२६ वा) दिवस आहे.
★महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
★सेना दिवस (बांगला देश)
★सेना दिवस (ग्रीस)
★World Television Day
      
    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७२ : दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
●१९७१ : बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
●१९६२ : भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८७ : ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
◆१९२७ : शं. ना. नवरे – लेखक
◆१९२६ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
◆१६९४ : व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते
●१९७० : *सर चंद्रशेखर वेंकट रमण* – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
●१९६३ : चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21.  *✸ जिंकू किंवा मरू ✸*
  ●●●●००००००●●●●
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21. *❂ जय शारदे वागीश्वरी ❂*
     ━═●✶✹★✹✶●═━
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी

वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

21.  *❃❝ विचित्र परिक्षा ❞❃*
     ━━•●◆●★●◆●•═━
       बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली .त्याने आपल्या सरदाराना माजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली .
तो म्हणाला आज पासून बरोबर सहा  महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल. प्रत्येक सरदार आपलेल्या मिळाल्या मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले .घरातल्या माणसाना त्यांनी बादशहा नि लावलेल्या बक्षीस बदल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरतल्या माणसांना सूचना दिली .प्रत्येक सरदाराच्या घरी सरदाराच्या घरी मांजराना खुराक चालू झाला .हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागल ती चांगली गुबगुबीत दिसू लागली .मात्र बिरबलान आपलेल्या मिळालेल्या असा खुराक दिला नाही.

    घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवील उंदीर पकडायला शिकवलं बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले .मात्र ते हडकुळे राहिले .
अकबर बादशाहने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले .प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले.आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला "बिरबल सर्व सरदाराची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का ? बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला
"खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या .उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे .त्यात ते पटाईत  असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले .प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली .बिरबलाच्या मांजराने
तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन तीन उंदीर मारले देखील इतर गलेलठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली.  त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची तयारी नव्हती .बादशाहने बिरबल च्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भल मोठ बक्षीस दिल. 

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     *प्रत्येकाने आपापल्या कामात तरबेज असले पाहिजे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

21.  "जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे *जबाबदारी...!*
     "एकदा घेतलं की माणूस
     *आयुष्यभर थकत नाही."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

21. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  चहामध्ये कोणते अपायकारक द्रव्य असते ?
  ➜ टॅनिन

✪  पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात ?
  ➜ पोटॅशियम परमॅंगनेट.

✪  अँनेमिया कशाशी संबंधित आहे ?
  ➜ रक्तपेशी.

✪  बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
  ➜ 'ब' जीवनसत्व.

✪  पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
  ➜ हिरड्या
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

21. *❒ चंद्रशेखर वेंकट रामन ❒* 
     ━━•●◆●★●◆●•═━
_*🐾यांची आज पुण्यतिथी*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏
🔹जन्म :~ ७ नोव्हेंबर १८८८
       तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
*🔺मृत्यू :~ २१ नोव्हेंबर १९७०*
       बंगळूर, कर्नाटक, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ भौतिकशास्त्र
🔹ख्याती :~ रामन् परिणाम
            *🔸पुरस्कार :~*
      🔺भौतिकशास्त्राचे  नोबेल,
               🔺भारतरत्न,
    🔺लेनिन शांतता पारितोषिक

    🚦 चंद्रशेखर वेंकट रामन् 🚦
    हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

         💎 संशोधन 💎
    त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

              💎 सन्मान 💎
   चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

   सर सी. व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार ~ 21/11/2023❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment