"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*22/04/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. एप्रिल:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

🟢🔵🟣
चैत्र शु.14, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~हस्त,
योग ~हर्षण, करण ~गर,
सूर्योदय-06:16, सूर्यास्त-18:57,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

22. *जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22. *गाढवाला दिला मान नि त्याने केले उंच कान*-  
*★ अर्थ ::~* एखाद्या मूर्खाला मान दिला की,तो गोंधळ घालतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

22. *बुद्धिः कर्मानुसारिणी ।*
            ⭐अर्थ ::~
बुद्धी ही कर्माचे अनुसरण करणारी असते. (आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी बनते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★22. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक वसुंधरा दिन
★ हा या वर्षातील ११२ वा (लीप वर्षातील ११३ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.
●१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर
●१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक
◆१९२९ : उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल
◆१९१६ : यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक
◆१९०४ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
◆१८१२ : लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल , मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला.

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
●२०१३ : जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश
●२००३ : बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार
●१९९४ : आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
22. *❂ सर्वात्मका सर्वेश्वरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥

आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

22.      *❃❝ सत्कृत्य ❞❃*
     ━━═•●◆●★★●◆●•═━━
    एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

22.   एक विचित्र सत्य ....
आपण जेव्हा *आनंददायी* परिस्थितीच्या सहवासात असतो तेव्हा नकळत का होईना टाळी वाजविण्यासाठी आपली *दहा बोटे* पटकन *एकत्र* येतात ना...
     पण जेव्हा जेव्हा आपल्या नयनी एखादा *दुःखाचा* अश्रू येतो ना, तेव्हा त्याला टिपायला फक्त *एखादेच बोट* धजावते; अन् बाकीची मात्र सहजरित्या *अलिप्त* होतात...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?
➜भारत.

✪  सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला देश कोणता ?
➜व्हॅटीकन सीटी.

✪  सूर्यमालेतील सूर्याला सर्वांत जवळचा ग्रह कोणता ?
➜बुध.

✪  भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
➜कर्नाळा. ( रायगड )

✪  महाराष्ट्रात चादरी उत्पादनासी कोणते ठिकाणी प्रसिद्ध आहे ?
➜सोलापूर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
22. *❒ झाशीची राणी लक्ष्मीबाई ❒*
       ─┅━━●●★◆★●●━━┅─
  *लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई*

        या एकोणिसाव्या शतकातील झाशीराज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्याब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्धझालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना *‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’* म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

        बालपण लक्ष्मीबाईंचे मूळ नावमणिकर्णिका तांबेहोते. यांचे वडीलमोरोपंत तांबेहे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचेसाताराजिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटीउत्तर प्रदेशातीलकाशीयेथे झाला होता.व्यक्तिमत्त्वधोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या.

     अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंतनानासाहेब पेशवे,जयाजी शिंदेव लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठीमल्लखांबनावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ सोमवार~22/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment