"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*22/06/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. जून:: शनिवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्ठ पौर्णिमा, नक्षत्र ~मूळ,
योग ~शुक्ल ,  करण ~बव,
सूर्योदय-06:02, सूर्यास्त-19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

22. *जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22. *हातावर कमवावे,पानावर खावे*-
   *★ अर्थ ::~* रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
          ⭐अर्थ ::~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   *🛡 ★ 22. जून ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७३ वा (लीप वर्षातील १७४ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९४ : महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण
●१९७६ : कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
●१९४० : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
●१७५७ : प्लासीची लढाई सुरू झाली.
●१६३३ : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
◆१९०८ : डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
◆१८९६ : नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.

         ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९९३ : विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते (पहिली मंगळागौर - लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट)
●१९५५ : सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *✸ जय जय महाराष्ट्र माझा ✸*
       ●●●●●००००००●●●●●
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा

भीति न आम्हां तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *❂ मन विजय करें  ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना..

भेदभाव, भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके,
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सकें, 
झूठ से बचे रहें, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना …

मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर 
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें 
हम को मन की शक्ति देना मन विजय करें
दूसरों की जय से पहले खुद को जय करें
हम को मन की शक्ति देना...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22. *❝ लहान झाड व मोठे झाड ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    *नदीच्या काठी मोठे झाड होते* ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे, तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्‍याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22.   *सृष्टी कितीही बदलली तरी*
*माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!*
       *पण दृष्टी बदलली तर*
*नक्कीच सुखी होतो....!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ कोरोना विषाणूचा फैलाव कोणत्या देशातून आला आहे ?
➜चीन.

✪ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➜रूडाल्फ डिझेल.

✪  भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा पहिला कर्णधार कोण ?
➜सी.के नायडू.

✪  अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे ?
➜वेरूळ. ( औरंगाबाद )

✪ ऑलम्पिक ध्वजावरील कड्यांची संख्या किती आहे ?
➜पाच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

22.   *❒ वासुदेव चापेकर ❒* 
      ━━═•●◆●★●◆●•═━━
      *वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.*

      वासुदेव चापेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.

     वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.

      पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले.

     इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली  ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला.

       रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता,

       रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल  चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

      चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.

        ◆ आधारित चित्रपट ◆
   चापेकर बंधूंवर आणि रँडच्या खुनाच्या घटनेवर *'२२ जून १८९७'* हा मराठी चित्रपट निघाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शनिवार ~ 22/06/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment