"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*22/07/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. जुलै:: सोमवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ कृ. १, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~श्रवण,
योग ~प्रीति, करण ~कौलव,
सूर्योदय-06:11, सूर्यास्त-19:18,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

22. *हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

22.       *शेरास सव्वाशेर –*     
   ★ अर्थ ::~   प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22. सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।
   ⭐अर्थ ::~ कोणत्याही देवतेला भक्तिभावाने केलेला नमस्कार भगवान श्रीविष्णूंपर्यंत पोहोचतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

         🛡 *22. जुलै* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★रस्ता सुरक्षा दिन
★हा या वर्षातील २०३ वा (लीप वर्षातील २०४ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°••◆•••°°°~°°•••🔹
●२०२२: द्रौपदी मुर्मु भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या.
●२०१९ : भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ अवकाशयानाचे २२ जुलै रोजी दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण झाले.
●१९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.
●१९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
●१९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.
●१९०८ : ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : देवेंद्र गंगाधर फडणवीस–  भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री
◆१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
◆१९२३ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला.
◆१८९८ : पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔹
●१९९५ : हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू
●१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक
●१९१८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

22. *✸ ऐ मेरे वतन के लोगों ✸*
    ●●●●००००००●●●●
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो..
जो लौट के घर न आये
जो लौट के घर न आये..

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद...

जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो आपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद...

कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पवर्अत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद...

थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद...

तुम भूल न जाओ उनको
इस लिये कही ये कहानी
जो शहीद...

जय हिन्द... जय हिन्द की सेना..
जय हिन्द... जय हिन्द की सेना..
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22. *❂  तुझिया चिंतनात ❂*
  ━━●✶✹★●★✹✶●═━
त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतु दे
गीताच्या एकसरी भावफुले गुंफु दे

श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे

भाव एक नवनवा
गंध धुंद करि जिवा
जीवशीव संगतीत मन कलिका उमलूदे

छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिनरजनी
गीत तुझे आळवूनी तुजसाठी गाउ दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

22.  *❃❝ देशभक्तीची परीक्षा ❞❃*
━━•●◆●★◆★●◆●•━━
    ही गोष्‍ट आहे स्‍वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढूनच, प्रसंगी रक्त सांडूनच, हक्कासाठी भांडूनच स्‍वातंत्र्य मिळेल अशा विचारसरणीचे काही क्रांतीकारक होते. तर अहिंसेच्‍या मार्गानेच देश स्‍वतंत्र करता येईल असा काहींना विश्र्वास होता. एक लहान मुलगाही हे सगळे पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्‍या मुलामध्‍ये देशभक्ती ठासून भरलेली असल्‍याचे त्‍याच्‍या आईलाही जाणवले तेव्‍हा तिला खूप आनंद झाला. देश गुलामीच्‍या जोखडातून मुक्त झाला तर बरे होईल अशी भावना होती. पण मुलगा जर पोलीसांच्‍या तावडीत कधी सापडला तर जे देशासाठी भूमिगत राहून लढा देत आहेत त्‍यांची नावे व ठिकाणे तो उघड करेल अशी भीती तिला वाटत राहायची. यासाठी तिने त्‍या मुलाची परीक्षा घ्‍यायचे ठरवले. आईने मुलाला जवळ बोलावले व आपल्‍या मनातील ही भावना त्‍याला सांगितली. आईने मुलाला परीक्षा घेणार असल्‍याचेही सांगितले. मुलाने परीक्षेसाठी होकार दिला. आईने दिवा पेटवला व त्‍याच्‍या ज्‍योतीवर त्‍या मुलाला बोट धरायला सांगितले. त्‍या मुलाने जराही न घाबरता त्‍या ज्योतीवर हात धरला. हाताला पोळत असताना आईने त्‍याला क्रांतीकारकांची नावे सांगण्‍यास सांगितले पण मुलाने हुं की चूं सुद्धा केले नाही. मुलाचे हे धाडस पाहून आईने मुलाला कवटाळले. हाच मुलगा मोठेपणी एक महान क्रांतीकारक झाला. त्‍या मुलाचे नाव होते- अशफाक उल्लाह खान.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  असंख्य देशभक्तांनी केलेल्या त्यागामुळे,बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

22.       *माणसे प्रेम*
       करण्यासाठी असतात.
               आणि 
    *पैसा  वापरण्यासाठी असतो.*
हल्ली गडबड  अशी  झाली आहे की,
     *पैशावर  प्रेम* केले  जाते.
                आणि
  *माणसे  वापरली जातात..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

22. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  भारतातील सर्वांत मोठे प्रेक्षागृह कोणते ?
➜ षण्मुखानंद सभागृह मुंबई.

✪  आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
➜ दयानंद सरस्वती.

✪  'थाॅमस कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ बॅडमिंटन.

✪  'मेळघाट व्याघ्र प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे ?
➜ अमरावती.

✪  गुरूत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ?
➜ न्यूटन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

22. *❒ देवेंद्रजी फडवणीस ❒* 
━━•●◆●★★●◆●•═━
महाराष्टाचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस
    *_यांचा आज जन्म दिवस_*
        _त्यानिमित्त त्यांना_
   *_हार्दिक~हार्दिक शुभेच्छा..!!_*
   🙏🐾🌷🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २२ जुलै १९७०

    *स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस...*

    संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला हा मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने *‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र*’ ही घोषणा प्रत्यक्षात अवतरली.

    फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. त्यांनी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तथापि त्यांनी वडिलांप्रमाणे राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून वकील होणे निश्चित केले.

    देवेंद्र फडणवीस विधी महाविद्यालयात शिकून त्यात सुवर्ण पदक मिळवले. परंतु वकिली केली नाही त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)चे पॅनेल होते. ज्या विधी महाविद्यालयाच्या राजकारणात त्यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्रीपदावर आहेत.

    देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.

    त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

    विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.

    नागपूरच्या प्रसिद्ध डॉक्टरांची मुलगी आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्‍न झाले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. देवेन्द्र आणि अमृता यांना देविजा नावाची मुलगी आहे.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
••◎◑★✹🔅✹★◑◎••
        *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱7875840444♦
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
█║▌║█❃❂❃█║▌█

*❁सोमवार ~22/07/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment